What is the Course of LLB?|एलएलबी कोर्सची संपूर्ण माहिती

एलएलबी Introduction

मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे 10 वी 12 वी नंतर विद्यार्थ्यांना करिअरचे वेध लागलेले असते आणि म्हणूनच पारंपारिक अभ्यासक्रम शिकण्याऐवजी तुम्हाला वेगवेगळ्या अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहेत. विद्यापीठ व महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थ्यांना भविष्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळायला हवी, याकरिता चांगले अभ्यासक्रम डिझाईन तर केले जातात पण त्याचबरोबर सामाजिक जबाबदारी बांधिलकी याचे भान राखून विद्यार्थी सामाजिक जबाबदारी कशा पद्धतीने पाडू शकतात तसेच समाजामध्ये कायदा सुव्यवस्था शांतता स्थापित राहावी याकरिता विद्यापीठ व महाविद्यालय काही अभ्यासक्रमाची आखणी करत असतात. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःचे उज्वल करिअर देखील घडवू शकतात.

आज आपण अशा एका अभ्यासक्रमाबद्दल जाणून घेणार आहोत. या अभ्यासक्रमाला समाजामध्ये मान्यता आहे. या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदी वेगळा आहे. आजही समाजामध्ये अनेक लोक आहेत जे अन्याय सहन करत आहेत. पीडित आहेत. शोषित आहेत त्या सर्वांना न्याय देण्याचे कार्य हा अभ्यासक्रम देण्याचा प्रयत्न करतो चला तर मग जाणून घेऊया या अभ्यासाबद्दल..

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहायला मिळतात जे काही काळे कोट घालतात म्हणजे की वकील. अनेकदा आपण चित्रपटांमध्ये कोर्टाचे सीन पाहत असतो त्या कोर्टात वकील न्यायाधीश आरोपी व पिढीजांचे म्हणणे ऐकत असतात आणि योग्य तो निर्णय देखील देत असतात परंतु जर आपल्याला भविष्यात एडवोकेट म्हणजेच वकील बनायचे असेल तर त्यासाठी नेमके काय करावे लागते याबद्दल अनेकांना माहिती नसते.

अनेकांना लॉ क्षेत्रामध्ये स्वतःचे करिअर बनवायचं असते परंतु योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळे करिअर त्यांना बनवता येत नाही. जर तुमच्या बाबतीत देखील असे काही होत असेल तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला एल एल बी या अभ्यासक्रमाबद्दल सांगणार आहोत तसेच जर तुम्हाला ऍडव्होकेट भरायचे असेल तर तुमच्या अंगी नेमके कोणते गुण कौशल्य असायला हवे. कोणत्या सामाजिक जबाबदारीची जाणीव तुम्हाला असायला हवी याबद्दल देखील समजावून सांगणार आहोत.

एलएलबी अभ्यासक्रमाला बॅचलर ऑफ लॉ असे देखील म्हटले जाते. या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने कायद्यासंदर्भातील शिक्षण विद्यार्थ्यांना पुरविले जाते. तुम्हा सर्वांना माहिती आहे देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याकरिता कायदा सुव्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणूनच जर विद्यार्थ्यांना कायद्याबद्दल शिक्षण दिले तर भविष्यात चांगल्या गुणवत्तेचे एडवोकेट म्हणजेच वकील निर्माण होऊ शकतात.

उमेदवारांना कायद्यासंदर्भातील छोट्या-मोठ्या गोष्टीचे तसेच महत्त्वाच्या बाबींचे ज्ञान देणारा अभ्यासक्रम मध्ये देखील लॉ या पदवीकडे पाहिले जाते. उमेदवाराने हा अभ्यास पूर्ण केल्यानंतर वकील क्षेत्रामध्ये उमेदवार आपले करिअर बनू शकतो तसेच न्यायाधीश म्हणून देखील करिअरच्या दिशेने वाटचाल करू शकतो. हल्ली न्यायाधीश व वकील या पदांना खूपच महत्त्व आहे. दिवसेंदिवस घडणारे अपघात, हल्ले, कौटुंबिक अत्याचार, हिंसाचार या सर्वांमधून बाहेर काढण्याचे मार्ग कायदा क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे वकील करतात.

पात्रता 

जर तुम्हाला एलएलबी करायचे असेल तर त्या संदर्भातील पात्रता देखील जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. प्रवेश घेण्यासाठी दोन पद्धती प्रामुख्याने फॉलो केले जातात. एक तर तुम्ही बारावीनंतर एलएलबी चा ऍडमिशन घेऊ शकता किंवा पदवीनंतर देखील बारावी एलएलबी पुढील पदवी करिता आवश्यक असणारे शिक्षण करता येते

बारावीनंतर तीन वर्षाचा हा अभ्यासक्रम असतो.

एलएलबी हा अभ्यासक्रम करताना विद्यार्थ्यांना कायदे संदर्भातील शिक्षण तर दिले जाते पण त्याचबरोबर अर्थशास्त्र राज्यशास्त्र नागरिकशास्त्र यांचे सखोल ज्ञानदेखील दिले जाते.

एलएलबी मध्ये प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्याला कमीत कमी 50 टक्के मार्क असणे गरजेचे आहे.

 त्याचबरोबर या अभ्यासक्रमामध्ये जातीनिहाय आरक्षण देखील उपलब्ध करण्यात आलेले आहे.

जर तुम्हाला भारताबाहेर परदेशात एलएलबी शिक्षण घ्यायचे असेल तर कमीत कमी तुम्हाला 60 टक्के मार्क असणे गरजेचे आहे तरच तुम्ही एलएलबी पदवी चे शिक्षण घेऊ शकता.

एल एल बी ला प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांना सीईटी देखील द्यावी लागते. ही सीईटी राज्यस्तरीय आहे वर्षभरातून एकदा या परीक्षेचे अर्ज निघतात. परीक्षा नोंदणी करून विद्यार्थी सीईटीची तयारी करून देखील एलएलबी मध्ये प्रवेश घेऊ शकतात.

एलएलबी ची सीईटी दिल्यानंतर मेरिट लिस्ट लागते आणि त्यानंतरच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. परीक्षेमध्ये मिळालेले मार्क व गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काही कॉलेज निवडायचे असतात. त्या कॉलेजच्या माध्यमातून देखील विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतात.

एलएलबी हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम असल्या जरी या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सेमिस्टर पॅटर्न नुसार परीक्षा द्यावे लागतात. प्रत्येक सेमिस्टर ला विषय देखील वेगळे असतात. हे सगळे विषय कायदा संदर्भात असल्यामुळे विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान दिले जाते.

तसेच अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक प्राध्यापक वर्ग देखील अनुभवी असतात. हे प्राध्यापक विद्यार्थ्यांना भविष्यात वकिली कशी करायची वकिली करत असताना नेमके कोणकोणते नीती तत्व यांच्या बद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.

त्याचबरोबर वकील एडवोकेट व कायदा हे एक सार्वजनिक तसेच व्यावसायिक पदवी असल्याने सामाजिक भान देखील बाळगणे गरजेचे आहे. आपण घेतलेली केस आणि त्या केस वर केलेला अभ्यास यामुळे एखाद्या व्यक्तीचे आयुष्य सुधारू शकते आणि म्हणूनच या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील तितकाच महत्त्वाचा असतो लोक या क्षेत्राकडे आदराने पाहतात. हा आदर विद्यार्थ्याने जपणं गरजेचं आहे चुकीच्या पद्धतीने जर या क्षेत्रामध्ये तुम्ही काही कार्य करण्याचा प्रयत्न केला तर तुमचे लायसन्स देखील बाद केले जाते.

इंटर्नशिप 

तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर किंवा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना अनेक विद्यार्थी इंटर्नशिप देखील करत असतात. या इंटर्नशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऍडव्होकेट असोसिएशन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळते. अनेक विद्यार्थी तज्ञ एडवोकेट यांच्यासोबत काम करून वेगवेगळे प्रकरण हाताळण्याची सराव करत असतात.

या इंटरशिप मुळे विद्यार्थ्यांना भविष्यात कशाप्रकारे कार्य करायचे याचे सखोल नंतर मिळते पण त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांना स्टाय पॅड देखील मिळत असतो.

अनेक विद्यार्थ्यांचा कल हा प्रामुख्याने प्रॅक्टिस करण्यावर दिसून येतो. या उमेदवारांना हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट यासारख्या न्यायालयामध्ये जाऊन वेगवेगळे प्रकरण हाताळावे लागतात तसेच जे काही कार्बनी काम आहे ते देखील करावे लागतात. प्रत्येक केस हाताळताना त्या केसमधील बारकावे पाहणे देखील वकिलांचे महत्त्वाचे कार्य असते.

आर्ग्युमेंट करताना नेमकी कोणकोणते मुद्दे हाताळायचे आहेत तसेच आपल्या अशिलाला कशाप्रकारे न्याय मिळवता येईल, याचा देखील विचार करावा लागतो. इंटरशिप प्रामुख्याने सहा महिने ते एक वर्ष असते. या इंटरशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पगार देखील दिला जातो.

विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य बार कौन्सिल कडे नोंदणी करावी लागते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑल इंडिया बार कौन्सिलची एक परीक्षा देखील द्यावी लागते व त्यानंतर एक प्रमाणपत्र मिळते. या प्रमाणपत्राच्या आधारावरच तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात तसेच हायकोर्ट व न्यायालयामध्ये जाऊन केस हाताळू शकतात.

एलएलबी अभ्यासक्रम फी 

या अभ्यासक्रमाची फी देखील अनेक विद्यापीठ व महाविद्यालय वेगवेगळ्या पद्धतीने घेत असतात. बहुतेक वेळा तुम्ही एलएलबी चे शिक्षण पाच वर्षांमध्ये करत आहात की तीन वर्षांमध्ये करत आहात यावर देखील फी अवलंबून असते. सर्वसाधारणपणे वीस हजार ते दोन लाख रुपये हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना फी मोजावी लागते.त्याचबरोबर महाविद्यालय व विद्यापीठ तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या सुविधा देतात त्यावर देखील फी असते.

जर तुम्हाला जातीनिहाय आरक्षण उपलब्ध असेल तर अशावेळी फी देखील कमी प्रमाणात असते. शासकीय महाविद्यालय व प्रायव्हेट महाविद्यालय यांच्या एकंदरीत संरचनेवर देखील विद्यार्थ्यांकडून फी आकारले जाते.

एलएलबी चा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना व शिक्षण घेत असताना विषय नेमके कोणकोणते असतात याबद्दल देखील जाणून घेणे गरजेचे आहे. एलएलबी चा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना सहा सेमिस्टरचा अभ्यास करावा लागतो. या सेमिस्टर मध्ये वेगवेगळे विषय नुसार परीक्षा देखील घेतली जाते. ही परीक्षा विद्यापीठ पातळीवर आयोजित केली जाते. 

एलएलबी प्रथम वर्ष विषय : 

  1. LLB Subjects- Semester 1 
  2. Law of Torts including Consumer Protection Law
  3. Law of Crimes
  4. Family Law I
  5. Legal Methods

LLB Subjects- Semester 2    

  • Criminal Procedure Code, Juvenile Justice Act, and Probation of Offenders Act
  • Law of Contract II
  • Constitutional Law I
  • Constitutional Law II

एलएलबी द्वितीय वर्ष विषय 

LLB Subjects- Semester 3

  • Property Law
  • Public International Law
  • Moot Court and Trial Advocacy
  • Company Law

  LLB Subjects- Semester 4 

  • Law of Taxation
  • Labour Law I
  • Interpretation of Statutes and Judicial Process
  • Civil Procedure Code and Law of Limitation

एलएलबी तृतीय वर्ष विषय 

LLB Subjects- Semester 5                

  • Drafting, Pleading and Conveyancing
  • Human Rights Law and Theory
  • Law, Poverty and Development
  • Intellectual Property Rights

  LLB Subjects- Semester 6                                          

  • Professional Ethics and Bar-Bench Relations
  •  Banking and Insurance Law
  •  Environmental Law
  •  Dissertation and Project

अशाप्रकारे विविध महत्त्वाच्या विषयांचा अभ्यास करून तुम्ही कायद्याची पदवी मिळवू शकतात. या सर्व विषयांचा अभ्यास केल्यानंतर परीक्षा देखील विद्यापीठ पातळीवर घेतली जाते. विद्यापीठ परीक्षांमध्ये तुम्ही चांगले मार्क मिळवून उत्तम दर्जाची पदवी मिळवून उत्तम वकील होऊ शकता.

B.Ed म्हणजे काय?