What is the BMS course?|बीएमएस कोर्स बद्दल संपूर्ण माहिती

बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडी

आज आपण बी एम एस बद्दल जाणून घेणार आहोत. बीएमएस म्हणजे बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडी. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या हे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये स्वतःला सिद्ध करायचे असल्यास आपल्याला काहीतरी वेगळे करणे गरजेचे आहे. जर आपण पारंपरिक अभ्यासक्रम स्वीकारला तर इतरांसारखेच आपण भविष्यात बनू शकतो परंतु आज काळ बदललेला आहे. माहिती तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर विकसित झालेले आहे. इंटरनेटचा विकास झालेला आहे.

जागतिकीकरण आणि औद्योगीकरण यामुळे व्यवसाय क्षेत्रात देखील मोठे बदल झालेले आहे आणि म्हणूनच सध्याच्या तरुणांनी भविष्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळेल या अनुषंगाने प्रयत्न केले पाहिजे. आज आपण अशा एका महत्त्वाच्या अभ्यासक्रमाबद्दल जाणून घेणार आहोत, तो अभ्यासक्रम तुम्हाला व्यावसायिक दृष्ट्या संपन्न तर बनवणार आहे. पण त्याचबरोबर विविध कलागुणांनी व्यावसायिक बनण्याच्या दृष्टिकोनातून कोणकोणते गुण आवश्यक आहेत याचे तुम्हाला बाळकडू देखील देणार आहे.

हल्ली अनेकजण रिझल्ट लागल्यानंतर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या शाखांचा प्रामुख्याने स्वीकार करत असतात परंतु या शाखा व्यतिरिक्त देखील विद्यापीठांमध्ये वेगवेगळे कोर्स विद्यार्थ्यांना शिकवले जातात. 

हा अभ्यासक्रम एक व्यवसायिक अभ्यासक्रम असला तरी या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःला व्यवसायिक दृष्ट्या संपन्न बनवू शकतो. फक्त ग्रॅज्युएशन करून विद्यार्थ्यांचे कल्याण होत नाही. मास्टर पीएचडी स्पर्धा परीक्षा देऊनच स्वतःला सिद्ध करावे लागते परंतु जर आपण पारंपारिक अभ्यासक्रम निवडन्याऐवजी जर व्यवसायिक बीएमएस हा अभ्यास क्रम निवडला तर तुम्हाला भविष्यात चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळू शकते.

बॅचलर ऑफ मॅनेजमेंट हा जो अभ्यासक्रम आहे तो विद्यार्थ्यांना अंडरग्रॅज्युएट कोर्स म्हणून ओळखला जातो. या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट स्तरावर अनेक विषयांचा अभ्यास शिकविला जातो. या अभ्यासाच्या माध्यमातून विद्यार्थी व्यावसायिक क्षेत्रात स्वतःचे उज्वल करिअर करू शकतात. बी एम एस म्हणजेच बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडी मध्ये विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट नेमके कसे करायचे? संशोधन मनुष्य बाळ विकास आर्थिक गोष्टी या सर्वांचे नियोजन कशा प्रकारे करायचे याचा अभ्यास देखील करून घेतला जातो.

पात्रता: 

जर तुम्हाला बी एम एस या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. हा व्यवसायिक अभ्यासक्रम असल्याने या अभ्यासासाठी मेरिट लिस्ट देखील मोठ्या प्रमाणावर लागते आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना चांगले गुण बारावीला असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला कमीत कमी 60 ते 70 टक्के मिळाले असतील तर तुम्हाला बी एम एस या अभ्यासक्रमामध्ये सहजच प्रवेश मिळू शकतो. या अभ्यासक्रमासाठी मेरिट लिस्ट महत्त्वाची ठरते. वेगवेगळ्या महाविद्यालयाच्या व विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीनुसार मेरिट लिस्ट ठरविले जाते.

कोणत्याही शाखेतील विद्यार्थी बी एम एस या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ शकतो परंतु जर कॉमर्स असेल व सायन्स असेल तर उत्तम.

या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेकदा सीईटी देखील द्यावी लागते. ही सीईटी राज्यस्तरीय किंवा विद्यापीठ व महाविद्यालय पातळीवर अनेकदा घेता येते.

अनेक महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम कॉमर्स शाखेमध्ये समाविष्ट केलेला आहे आणि म्हणूनच बीकॉम इन मॅनेजमेंट स्टडी हा पर्याय देखील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून देखील तुम्ही बी एम एस चा अभ्यास शिकू शकता. फक्त डिग्री च्या नावांमध्ये बदल करण्यात आलेला आहे.

फी

जसे की आपणा सर्वांना माहिती आहे की, बीएमएस हा एक व्यावसायिक अभ्यासक्रम आहे आणि म्हणूनच व्यावसायिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना तयार करणे या कोर्स ची प्रमुख जबाबदारी आहे. या कोर्स व म्हणजेच अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट स्तरावर दिले जाणारे शिक्षण पुरविले जाते आणि म्हणूनच महाविद्यालय व विद्यापीठ पातळीवर विद्यार्थ्यांना दिले जाणाऱ्या सुविधा या अनुषंगानेच विद्यार्थ्यांकडून फी देखील आकार सर्वसाधारणपणे तीन वर्षाचा हा अभ्यासक्रम असल्याने 19 000 पासून ते 1 लाखापर्यंत या अभ्यासक्रमाची फी असते.

बी एम एस पूर्ण केल्यानंतर भविष्यात असणाऱ्या संधी.

बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना भविष्यात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मागणी असते. विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देत असतानाच विद्यार्थ्यांना पायाभूत अभ्यासक्रमाचे सखोल ज्ञान या अभ्यासातून दिले जाते तसेच अनेकदा हा अभ्यासक्रम शिकवणारे शिक्षक देखील कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ञ मंडळी असल्याने विद्यार्थ्यांना थेट इंटर्नशिप व प्लेसमेंट दिली जाते या इंटर्नशिप ऑफ प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळते.

बी एम एस या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये दोन वर्ष विद्यार्थ्यांना महत्त्वाचे विषय शिकविले जातात त्याचबरोबर तृतीय वर्षाला विद्यार्थ्यांना स्पेशलायझेशन देखील निवडले जाते. विद्यार्थी त्यांच्या आवडीनिवडीनुसार स्पेशलायझेशन विषय निवडतात जसे की मार्केटिंग, एच आर, फायनान्स च्या माध्यमातून विद्यार्थी अभ्यासक्रम निवडत असतात. हा अभ्यासक्रम एकंदरीत सहा सेमिस्टर मध्ये विभागलेला आहे. सहा सेमिस्टर मध्ये विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा व तोंडी परीक्षा म्हणजेच इंटरनल च्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयाच्या अनुसार काही असाइन्मेंट दिल्या जातात. या असाइन्मेंट चे मार्क विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनामध्ये महत्त्वाचे ठरतात. शेवटच्या वर्षी विद्यार्थ्यांना एक प्रकल्प दिला जातो. विशिष्ट विषय ठरवून ब्लॅक-बुक म्हणजेच प्रबंध विद्यार्थ्यांना बनवावा लागतो हा प्रबंध विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

विद्यार्थ्यांच्या अंगी संशोधन गुण कौशल्य विकसित व्हावे या अनुषंगाने विद्यापीठाने व बोर्ड ऑफ स्टडीने प्रबंध बनवण्याचे ठरवलेले आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या संशोधनाला चालना मिळावी संशोधन कृती करता यावी म्हणूनच विद्यार्थ्यांना संशोधन हा विषय देखील शिकविला जातो. मीडिया प्लानिंग, मॅनेजमेंट, रिसर्च, प्रमोशन, मार्केटिंग या सर्वांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम बनवले जाते.

एच आर म्हणजेच ह्यूमन रिसोर्स : या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला अनेकदा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे. जेव्हा एखाद्या व्यक्ती एखाद्या कंपनीमध्ये मुलाखतीसाठी जात होते तेव्हा एच आर च्या माध्यमातूनच त्या व्यक्तीचे इंटरव्यू घेतले जातात आणि म्हणूनच एखाद्या संस्थेमध्ये मनुष्यबळ अशा प्रकारे असायला हवा याची काळजी करण्याचे कार्य विचार म्हणजेच ह्युमन रिसोर्स पदावर काम करणाऱ्या व्यक्ती प्रामुख्याने करत असतात.

मार्केटिंग मॅनेजमेंट : सध्या मार्केटिंग अत्यंत महत्त्वाची आहे. मार्केटिंगच्या माध्यमातून उत्पादन सर्वसाधारण ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातात आणि अशावेळी आपल्या उत्पादनाची जाहिरात व मार्केटिंग जास्तीत जास्त लोकांपर्यंत करता यावी यासाठी लागणारे साधन माध्यम याचा विचार करण्याचे कार्य मार्केटिंग मॅनेजमेंट या पदावर काम करणारी व्यक्ती म्हणजेच मार्केटिंग मॅनेजर करत असते.

 फायनान्स मॅनेजमेंट : एखादी संस्था योग्य पद्धतीने कार्य करावी याकरिता फायनान्स मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचे ठरते. संस्थेमध्ये काम करणारे व्यक्ती संस्थेसाठी आवश्यक असणारा पैसा, स्टेक होल्डर, गुंतवणूकदार इत्यादींचा विचार पॉलिसी मेकिंग करण्याचे कार्य फायनान्स मॅनेजर यांना करावे लागते.

 इव्हेंट मॅनेजमेंट हल्ली मोठ्या प्रमाणावर उस्तव साजरा केला जातात आणि म्हणूनच सेलिब्रिटी असो किंवा इव्हेंट असो यासाठी मॅनेजमेंट अत्यंत गरजेचे ठरते. इव्हेंट मॅनेजर एखाद्या कार्यक्रमाचे सर्व गोष्टी हाताळत असतात तसेच ग्राहकांना हवे असणाऱ्या गरजा अपेक्षा यांचे पूर्तता करण्याचे कार्य देखील मॅनेजमेंट मध्ये असणाऱ्या व्यक्ती करत असतात.

 ट्रॅव्हलिंग मॅनेजमेंट : हल्ली अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी प्रदेशात फिरण्याचे ठरवत असतात. लॉन्ग ट्रिप करताना अनेकदा आपल्याला वेगवेगळ्या ट्रॅव्हल एजन्सी कंपनीचा आधार देखील घ्यावा लागतो आणि म्हणूनच होतकरू तरुण या क्षेत्रामध्ये स्वतःचे करिअर बनवण्यासाठी इच्छुक असतात. तुम्ही देखील बीएमएस पूर्ण केल्यानंतर ट्रॅव्हलिंग मॅनेजर म्हणून देखील काम करू शकता आणि त्याचबरोबर स्वतःची ट्रॅव्हलिंग एजन्सी ओपन करून ट्रॅव्हलिंग मॅनेजमेंट करू शकता.

 कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट : एखादा व्यवसाय प्रस्थापित करण्यासाठी कस्टमर रिलेशनशिप अत्यंत महत्त्वाचे असते. ग्राहक नातेसंबंध जपण्याकरिता आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. तुम्ही बी एम एस पूर्ण केल्यानंतर कस्टमर देखील काम करू शकता. ग्राहकांच्या मागण्या इच्छा अपेक्षा ग्राहकांच्या तक्रारी या सर्व गोष्टींचे योग्य व्यवस्थापन करण्याचे कार्य कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट मध्ये येते.

प्रोजेक्ट मॅनेजमेंट : संस्थेमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या प्रकल्पाचे आपल्याला काही गोष्टी योग्य पद्धतीने हाताळावे लागतात. एखादा प्रोजेक्ट आल्यानंतर त्याच्यासाठी असणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींचे नियोजन करण्याचे कार्य प्रोजेक्ट मॅनेजरला करावे लागते.

ऍडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट : महाविद्यालय, शाळा, हॉस्पिटल, प्रशासकीय संस्था या सर्वांचे योग्य व्यवस्थापन करण्याचे कार्य ऍडमिनिस्ट्रेशन मॅनेजरला करावे लागते.

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी : इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये देखील बीएमएस पूर्ण असणाऱ्या उमेदवारांना योग्य ती संधी असते जसे की वेगवेगळ्या प्रोग्राम लैंग्वेज एचटीएमएल, पायथॉन, कोडिंग यासारख्या गोष्टींमुळे संस्था स्वतःचे प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनवू शकता.

 हेल्थ मॅनेजमेंट : आरोग्य संस्था यांचा मोठ्या प्रमाणावर विकास होत आहेत. वेगवेगळे औषध संशोधन आणि नियोजन या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला हेल्थ मॅनेजमेंट उपयोगी ठरते. आरोग्यसेवा त्यांचे व्यवस्थापन करण्याचे कार्य हेल्थ मॅनेजरला मोठ्या प्रमाणावर करावे लागते आणि म्हणूनच बी एम एस शिक्षण पूर्ण केल्यानंतर हेल्प मॅनेजमेंट देखील तुम्ही करू शकता. हेल्थ मॅनेजमेंट म्हणजेच मानवी आरोग्य संस्था व वेगवेगळे आजार झाल्यावर कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, खबरदारी घ्यायची त्याचे व्यवस्थापन करण्याचे कार्य हेल्प मॅनेजमेंट मध्ये शिकवले जाते.

यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये बी एम एस डिग्री मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी असते तसेच वेगवेगळ्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या पदावर काम करताना विद्यार्थ्यांना चांगला पगार देखील दिला जातो विद्यार्थ्यांना अनुभवानुसार व त्यांच्या अंगी असणाऱ्या गुण कौशल्य यांच्या आधारावर चांगले वेतन दिले जाते.

हे पण वाचा: बीएससी शिक्षण म्हणजे काय?