कॉम्प्युटर इंफॉर्मेशन
मित्रांनो, आपण 21व्या शतकात जगत आहोत. हे इंटरनेटचे युग आहे. जसे की सर्वांना माहिती आहे की या इंटरनेटच्या जाळ्यात आज आपण इतके अडकलो आहोत की आपल्याला व्यक्तिगत कोणत्याही गोष्टी माहिती नाही. सगळ्या गोष्टी आपण इंटरनेटच्या माध्यमातून प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो.
पूर्वीच्या काळी एखादी माहिती जर आपल्याला हवी असल्यास आपण लायब्ररी जाऊन तास न तास माहिती शोधायचो परंतु आता तसं राहिले नाही. आपल्याला हवी असलेली माहिती आपण एका क्लिकवर घरबसल्या प्राप्त करत असतो आणि म्हणूनच संगणक इंटरनेट हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेला आहे. जर आपला लॅपटॉप खराब झाला असेल किंवा काही सेकंदासाठी जरी नेट चालत नसेल तर जीव कावराबावरा होतो.
संपूर्ण जगापासून आपले संपर्क तुटले की काय अशी भावना देखील मनामध्ये येत असते आणि म्हणूनच आजच्या या इंटरनेटच्या जगामध्ये प्रत्येकाला कॉम्प्युटर, लॅपटॉप वापरता आला पाहिजे. जर तुम्हाला कॉम्प्युटर लॅपटॉप संगणकीय गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल आणि भविष्यात जर करिअर करायचे असेल तर आजची माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
आजच्या या लेखांमध्ये आपण कॉम्प्युटर क्षेत्रात आपण स्वतःचे उज्वल भविष्य कसे करू शकतो तसेच नेमके असे कोणकोणते अभ्यासक्रमात आहेत जे तुम्हाला कॉम्प्युटर संदर्भातील ज्ञान प्राप्त करण्यासाठी उपयुक्त ठरतात. हे अभ्यासक्रम शिकून तुम्ही या व्यवसाय जगामध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करू शकता आणि कॉम्प्युटरच्या आवडीमुळे तुम्हाला कोणताही जास्त त्रास येणार नाही. आपली आवडती गोष्ट करत असताना मनुष्याला आनंदच होत असतो आणि म्हणूनच आज आपण कॉम्प्युटर संदर्भातील जे अभ्यासक्रम आहेत त्या संदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी अभ्यासक्रम जाणून घेणार आहोत…
कॉम्प्युटरचा शोध चार्लस बार्बर यांनी लावला. पूर्वीच्या काळी कॉम्प्युटरचा आकार अगदी मोठा होता परंतु कालांतराने खूप सारे तांत्रिक बदल होऊन आज अगदी हाताएवढा कॉम्प्युटर देखील झालेला आहे. लॅपटॉप तर विचारायलाच नको हवे असलेल्या ठिकाणी आपण घेऊन जातो त्यानंतर स्मार्टफोन या सर्वांमुळे कॉम्प्युटर म्हणजेच आपल्या हाताचा खेळ असे देखील म्हणायला हरकत नाही परंतु आज अनेक विद्यापीठ आणि महाविद्यालय कॉम्प्युटर शिक्षण वाढीस लागावे याकरिता नवीन अभ्यासक्रम देखील घेऊन आलेले आहेत या सर्व अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण घेऊन स्वतःचे करिअर अगदी योग्यरीत्या बनवू शकतात.
हल्ली आपण वेब 3.0 या काळामध्ये जगत आहोत आणि म्हणूनच कॉम्प्युटर शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. कॉम्प्युटर शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी अनेक गोष्टी शिकू शकतात. माहिती, संवाद, संपर्क तंत्रज्ञान यांच्या विकासासाठी कॉम्प्युटर एज्युकेशन अत्यंत गरजेचे आहे. जर तुमच्याकडे कॉम्प्युटर एज्युकेशन नसेल तर तुम्ही कोणतेही कार्य सध्याच्या काळात पूर्ण करू शकत नाही आणि म्हणूनच पायाभूत ज्ञान म्हणजेच बेसिक नॉलेज असणे गरजेचे आहे.
हल्ली इयत्ता पहिलीपासूनच शाळेमध्ये संगणक संदर्भातील ज्ञान शिकवायला सुरुवात केली जाते. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर संदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्यानंतर तुम्ही दहावी व बारावीनंतर कॉम्प्युटर संदर्भातील महत्त्वाचे कोर्सेस अभ्यासक्रम डिप्लोमा कोर्स सर्टिफिकेट कोर्स सहजच करू शकतात तसेच बाजारामध्ये अनेक महाविद्यालय व विद्यापीठ तसेच प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन आहेत जे तुम्हाला कॉम्प्युटर संदर्भातील महत्त्वाचे शिक्षण पुरविण्याचे कार्य करतात.
पात्रता
तसे पाहायला गेले तर संगणकीय शिक्षण घेण्याकरिता विद्यार्थ्यांना फारशी पात्रताची गरज नाही परंतु पुढील गोष्टी समजण्याकरिता तुमचा मेंदू परिपक्व असणे गरजेचे आहे. जसे की एका विशिष्ट वयामध्ये व्यक्तीला सांगितलेल्या गोष्टी समजत असतात त्याच पद्धतीने जर विद्यार्थ्यांचे वय जास्त असेल तर विद्यार्थी शिकवलेल्या गोष्टी देखील चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो म्हणूनच आपण पात्रतेबद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा विद्यार्थी कमीत कमी दहावी व बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे यामुळे विद्यार्थ्यांचे बेसिक एज्युकेशन पूर्ण झाल्यामुळे भविष्यात चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळू शकते.
आता आपण काही संगणक संदर्भातील महत्त्वाचे अभ्यासक्रम जाणून घेणार आहोत. हे अभ्यासक्रम तुम्ही इयत्ता दहावी व बारावी झाल्यावर सहज करू शकतात.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. या अभ्यासक्रमाची सध्या चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या काही वर्षापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर अनेक तज्ञांनी अभ्यास देखील केलेला आहे तसेच इंटेलिजन्स अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना खूप चांगल्या संधी देखील आहेत. विद्यार्थी ए आय चा वापर करून सॉफ्टवेअर हार्डवेअर सारख्या महत्त्वाच्या गोष्टीवर काम करू शकतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून तुम्हाला हवे असलेल्या गोष्टी तुम्ही सहजच प्राप्त करू शकता त्यासाठी असणारे कोणी इंग्लिश प्रोग्रामिंग इत्यादी गोष्टी सहज शक्य आहे. इंटेलिजन्स चा वापर अनेक क्षेत्रांमध्ये केला जात आहे. आरोग्य, शिक्षण, फायनान्स, सामाजिक क्षेत्र या अनेक ठिकाणी लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. तुम्ही हा अभ्यासक्रम पूर्ण करून लोकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू शकता.
इंटेलिज आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता विद्यार्थ्यांना बारावी व दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. अनेक आयटी इन्स्टिट्यूशन हा कोर्स राबवतात जसे की टाटा इन्फोसिस, टीसीएस यासारख्या संस्था मध्ये तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण करू शकता.
वेब डेव्हलपमेंट
इंटरनेट हे एक जाळे आहे आणि या जाळ्याचा वापर करून आपण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात स्वतःचा विकास आणि वाढ देखील मोठ्या प्रमाणावर करत आहोत. जर तुम्हाला वेब डेव्हलपमेंट मध्ये भविष्यात करिअर करायचे असेल तर वेब डेव्हलपमेंट अभ्यासक्रम देखील विद्यार्थ्यांना अनेक महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये शिकवला जातो. तुम्हा सर्वांना माहिती आहे की, एखाद्या संस्थेची प्रगती पाहायची असेल तर त्याची वेबसाईट पाहणं गरजेचं ठरतं आणि म्हणूनच वेब डेव्हलपमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विचार मंथन करण्याची कला प्रश्नांची उत्तरे सोडवण्याची कला इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींवर कार्य केले जाते.
सध्या ई-कॉमर्स, मेडिकल, फायनान्स, हॉस्पिटल, हेल्थ सर्विस यासारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या लक्षात ग्राहक वर्गांना टार्गेट केले जाते आणि म्हणूनच प्रत्येक क्षेत्राची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेब डेव्हलपमेंट महत्त्वाची ठरते. वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही अनेक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचू शकतात. जर तुम्हाला वेब डेव्हलपमेंट करायचे असेल तर तुम्ही देखील हा अभ्यासक्रम करू शकता यासाठी देखील दहावी व बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे
सायबर सेक्युरिटी
इंटरनेटचा वापर करत असताना अनेकदा आपण चुकीच्या मार्गाने काही गोष्टी हाताळत असतो, अशावेळी सायबर सेक्युरिटी अत्यंत महत्त्वाची ठरते. इंटरनेट हाताळत असताना अनेकदा आपल्या व्यक्तिगत स्वरूपाची माहिती म्हणजे मोबाईल नंबर, एटीएम पिन, आधार कार्ड यासारख्या माहितीचा उपयोग सरासर केल्याने फसगत होण्याची शक्यता असते तसेच सध्या मोठ्या प्रमाणावर बँकेचे फ्रॉड देखील पाहायला मिळतात आणि म्हणूनच जर तुम्हाला सायबर सेक्युरिटी मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता. या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही सायबर इंटेलिजन्स सेक्युरिटी एक्सपर्ट म्हणून स्वतःला सिद्ध करू शकतात. हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी दहावी व बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
डेटा ऍनॅलिसिस
संगणक क्षेत्राचा अभ्यास करत असताना डेटा हा अत्यंत महत्त्वाचा असतो, अशावेळी आलेल्या डेटा व त्याचे विश्लेषण करणे महत्त्वाचे असतात. डेटा एनालिसिस या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचा डेटा हाताळण्याचे कार्य डेटा अनालिसिस क्षेत्रात कार्य करणारे विश्लेषक करत असतात. जर तुम्हाला देखील डेटा अनालिसिस करण्याची आवड असेल तर तुम्ही देखील हा अभ्यासक्रम शिकवू शकतात. डेटा एनसीसीच्या माध्यमातून आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये झालेले बदल, लँग्वेज मध्ये असलेले एरर सहजरित्या कळतात व आपण डेटा कशाप्रकारे सुरक्षित ठेवू शकतो. डेटाची गुणवत्ता कशाप्रकारे ठेवू शकतो याचे ज्ञानदेखील या अभ्यासक्रमात दिले जाते.
डेटा बेस सायन्स
इयत्ता दहावी व बारावी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना डिप्लोमा व डिग्री अभ्यासक्रमानुन डेटाबेस सायन्स उपलब्ध आहे. बारावीनंतर तीन वर्षाचा डिग्री चा अभ्यासक्रम देखील तुम्ही करू शकता. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वेब टेक्नॉलॉजी, सायबर सेक्युरिटी, हार्ड वर्क नेटवर्किंग प्रोग्रामिंग लँग्वेज इत्यादी घटकांचे ज्ञान दिले जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी भविष्यात आयटी कंपनीमध्ये स्वतःचे चांगले स्थान निर्माण करू शकतो व चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळू शकतो.
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
इयत्ता दहावी नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम जर आपल्याला करायचा असेल तर काही डिप्लोमा कोर्सेस देखील उपलब्ध असतात. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंग लँग्वेज शिकविले जातात तसेच वेबसाईट वेबसाईट संदर्भातील घटक इत्यादींचे ज्ञान दिले जातात. जर तुम्हाला बारावीनंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये करिअर करायचं असेल तर बीएससी आयटी हा एक चांगला पर्याय आहे. या पर्यायाच्या माध्यमातून तुम्ही तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून आयटी कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम करू शकतात. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रात काम केल्यानंतर टेस्टर डेव्हलपर, प्रोग्रामर यासारख्या अनेक महत्त्वाच्या पदावर काम करता येते.
कॉम्प्युटर एप्लीकेशन
सध्या कॉम्प्युटर एप्लीकेशन या अभ्यासक्रमाची देखील चर्चा मोठ्या प्रमाणावर केली जाते. कॉम्प्युटर एप्लीकेशनच्या माध्यमातून तुम्ही दहावीनंतर एका वर्षाचा डिप्लोमा कोर्स करू शकता किंवा बारावीनंतर तीन वर्षाचा कॉम्प्युटर सायन्स व कॉम्प्युटर एप्लीकेशन डिग्री कोर्स करू शकतात. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना डेटाबेस सायन्स डेटा हार्डवर्क नेटवर्क पायथॉन सायबर सेक्युरिटी सी प्लस प्लस यासारख्या विषयांचे ज्ञान दिले जाते.
फी
कॉम्प्युटर एज्युकेशन पूर्ण केल्यानंतर आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळत असते अशावेळी विद्यार्थ्यांना डिप्लोमा कोर्स व डिग्री कोर्स अभ्यासक्रम पूर्ण करत असताना त्यांची फी देखील वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट यांच्यावर अवलंबून असते. अनेकदा इन्स्टिट्यूट तुम्हाला ज्या पद्धतीच्या सुविधा पुरवितात त्यानुसार फी देखील घेतात अनेक महाविद्यालय कॉलेज विद्यार्थ्यांना शंभर टक्के प्लेसमेंट देखील देत असल्याकारणाने त्यांच्याद्वारे आकारले जाणारे फी देखील जास्त असते. सर्वसाधारणपणे पाहायचे झाल्यास कॉम्प्युटर एज्युकेशन अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरता विद्यार्थ्यांना कमीत कमी दहा हजार ते एक लाख रुपये इतकी फी भरावी लागते.