आयटीआय म्हणजे काय?
मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या अभ्यासक्रमाबद्दल जाणून घेणार आहोत. त्या अभ्यासक्रमाचे नाव आहे आयटीआय. अनेकांनी आयटीआय हा शब्द ऐकला असेल.आयटीआय याचा फुल फॉर्म असा आहे की इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. अनेकांना या क्षेत्रामध्ये करिअर देखील करायचे असते. आयटीआय म्हटले की अनेकांना वेगवेगळ्या मनामध्ये शंका असतात. बहुतेक वेळा या क्षेत्राबद्दल अनेकांना फारशी माहिती नसल्याने अनेक गैरसमजुरी देखील या क्षेत्रांबद्दल पसरवल्या जातात. अनेक अफवा सांगितले जातात परंतु असे अजिबात नाही म्हणूनच जर तुम्हाला देखील भविष्यात आयटीआय या क्षेत्रामध्ये स्वतःचे करिअर करायचे असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. दहावी, बारावी झाल्यानंतर प्रत्येकाला असे वाटत असते की, आपले स्वप्न साकार व्हावे.
आपले भवितव्य उज्वल व्हावे आणि आपल्याला एक चांगला अभ्यासक्रम शिकत असताना व्यवसायिक उद्योजक होण्याची शक्ती युक्ती मिळावी आणि एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून आपण भविष्यात स्वतःला घडवावे असे अनेकांचे स्वप्न असते. जर तुमच्या मनात देखील असेच काही असेल तर आयटीआय हा अभ्यासक्रम तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. आयटीआयच्या माध्यमातून तुम्ही व्यवसायिकदृष्ट्या स्वतःला संपन्न समृद्ध करू शकतात. आपल्या सर्वांना माहिती आहे काळ बदललेला आहे. जागतिकीकरण आणि औद्योगीकरणामुळे मोठ्या प्रमाणात कंपन्या निर्माण होऊ लागलेल्या आहेत. औद्योगिक क्षेत्रात नवनवीन संशोधन निर्माण होत आहेत गाडी कार मोटार वाहतूक सेवा तसेच माहिती तंत्रज्ञान यांचा मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे आणि म्हणूनच सध्या आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे, चला तर मग जाणून घेऊया…
आयटीआय नेमके काय असते आयटीआय मध्ये कशाप्रकारे विद्यार्थी करिअर करू शकतो? भविष्यात आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेमके वेतन काय असते ? आयटीआय अभ्यासक्रम कोणकोणत्या संस्थेमधून शिकविला जातो याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
हा एक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना व्यावसायिक दृष्ट्या व औद्योगिक दृष्ट्या शिक्षण देण्याचे कार्य करतो. या अभ्यासक्रमाला मराठीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था असेदेखील म्हटले जाते. नावावरूनच आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना काय काय शिकवले जाते याचा अंदाज येतो आणि म्हणूनच अनेक विद्यार्थी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेऊन स्वतःला सिद्ध करण्यास सक्षम होतात.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेबद्दल अधिक माहिती जाणून घेतले असल्यास तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की, ही एक शासकीय संस्था आहे ही संस्था विद्यार्थ्यांना अनुदानित व विनाअनुदानित तत्वावर शिक्षण पुरविते. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त व्यवसायिक व औद्योगिक ज्ञान कसे देता येईल याचा विचार केला जातो तसेच या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देण्यावर भर दिला जातो. पुस्तके ज्ञान खूप कमी प्रमाणात दिले जाते तसेच हा अभ्यासक्रम शासकीय तसेच खाजगी संस्थांमध्ये देखील सुरू करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच विद्यार्थी त्यांच्या क्षमतेनुसार शासकीय संस्था व खाजगी संस्थेमध्ये प्रवेश घेऊ शकतात.
आपल्या सर्वांना माहिती आहे की, महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेर अनेक औद्योगिक संस्था दिवसेंदिवस उदयास येत आहेत आणि या संस्थांमध्ये आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आणि म्हणूनच हा अभ्यासक्रम विद्यार्थी वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होताना देखील दिसून येत आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना भविष्यात वेगवेगळ्या पदांवर काम करता येते तसेच हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळते. अनेकदा शासकीय संस्थांमध्ये देखील विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी नोकरी लागण्याची शक्यता असते आणि म्हणूनच अनेक विद्यार्थी हा अभ्यासक्रम निवडण्यासाठी इच्छुक असतात.
आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी फिटर इलेक्ट्रिशियन, वेल्डर, वायरमन, टर्नर अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम करू शकतात.
पात्रता:
विद्यार्थी ट्रेड नुसार विषय निवडतात आणि त्या पद्धतीनेच विषयानुसार विद्यार्थ्यांना ज्ञानदेखील दिले जाते वेगवेगळ्या विषयानुसार व विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार विषय निवडीचे स्वातंत्र्य या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध असते.
हा अभ्यासक्रम निवडण्यासाठी शासकीय संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा द्यावी लागते. या ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. परीक्षा देखील घेतली जाते.
डी व्ही इ टी ( DTEV) या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरून विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज करू शकतात.
अर्ज केल्यानंतर विद्यार्थी आवश्यकतेनुसार महाविद्यालय व ट्रेड निवडू शकतात.
आयटीआय हा अभ्यासक्रम निवडताना विद्यार्थ्यांना ट्रेड अत्यंत महत्त्वाचा असतो. आता ट्रेड म्हणजे नेमकं काय ? की ज्या पद्धतीने विद्यार्थी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करत असतात तेव्हा त्यांना इंजीनियरिंग मध्ये उपलब्ध असणाऱ्या काही ब्रांचेस निवड करणे गरजेचे असतात त्याच पद्धतीने आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील काही शाखा निवडावे लागतात यालाच आपण ट्रेड असे म्हणतो.
या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थीला दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
जर विद्यार्थी बारावीला उत्तीर्ण नसेल तर तो देखील आयटीआय अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ शकतो परंतु त्या विद्यार्थ्याला दहावीच्या मार्कांवर प्रवेश घ्यावा लागतो. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज केल्यावर प्रवेश प्रक्रिया पूर्ण होते.
अर्ज भरताना म्हणजेच या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतेवेळी विद्यार्थ्यांचे कमीत कमी वय 14 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.
विद्यार्थी निवडीनुसार ट्रेड निवड करतात आणि त्यानंतर मेरिट लिस्ट लागते पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये काही कॉलेज विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जातात. विद्यार्थी आवडीनुसार ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे तेथे प्रवेश घेऊ शकतात. नाही तर दुसऱ्या मेरिट लिस्ट साठी देखील वाट पाहू शकतात अशा प्रकारे एकंदरीत तीन मेरिट लिस्ट लागतात.
प्रकार :
इंजीनियरिंग ट्रेड
आयटीआयचा अभ्यासक्रम शिकत असताना विद्यार्थ्यांना इंजीनियरिंग ट्रेड निवडण्याचे स्वातंत्र्य देखील असते. या ट्रेड मध्ये विद्यार्थी गणित विज्ञान तंत्रज्ञान कॉम्प्युटर इंटरनेट या विषयासंदर्भातील माहितीचे अभ्यास करतात. या विषयानुसार विद्यार्थ्यांना भविष्या शिक्षण देखील पुरविले जाते. विद्यार्थ्यांनी इंजीनियरिंग ट्रेंड निवडल्यानंतर हार्डवेअर नेटवर्क, कॉम्प्युटर सायन्स, नेटवर्क मेंटेनन्स, डेस्कटॉप ऑपरेटर , टेक्नॉलॉजी मेंटेनन्स यासारख्या अनेक गोष्टी यांचा अभ्यास करावा लागतो तसेच भविष्यात विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देखील पुरविले जाते.
नॉन इंजीनियरिंग ट्रेड
आयटीआय चा अभ्यासक्रम निवडत असताना विद्यार्थ्यांना नॉन इंजीनियरिंग ट्रेड हा पर्याय देखील उपलब्ध असतो. या पर्यायांमध्ये विद्यार्थ्यांना जर तांत्रिक गोष्टींमध्ये आवड नसेल किंवा तांत्रिक गोष्टी त्यांना जमत नसतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा पर्याय अत्यंत उपयुक्त ठरतो. या पर्यायांमध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अभ्यासक्रमात तांत्रिक माहितीचे व संगणक गणित विज्ञान यांचे ज्ञान दिले जात नाही. या नॉन इंजिनिअरिंग ट्रेड मध्ये विद्यार्थ्यांना शिवणकाम, पेंटिंग, सुतारकाम, ड्रेस मेकिंग यासारख्या क्षेत्राबद्दल शिक्षण पुरविले जाते.
फी
जसे की आपणास माहिती आहे की आयटीआय हा एक व्यावसायिक दृष्ट्या व औद्योगिकदृष्ट्या संपन्न असलेला अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना औद्योगिक दृष्ट्या सक्षम बनवण्याचे कार्य केले जाते आणि म्हणूनच या अभ्यासक्रमाची फी देखील वेगळी असते सर्वसाधारणपणे हा अभ्यासक्रम खाजगी तसेच शासकीय संस्थांमध्ये देखील शिकवल्या जातो. खाजगी संस्थेमध्ये देखील या अभ्यासक्रमाची फी 5000 पासून ते 20000 पर्यंत असते तसेच शासकीय संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना जातीनुसार सवलती देखील पुरवल्या जातात आणि म्हणूनच 2000 पासून ते 9000 पर्यंत फी शासकीय संस्थांमध्ये विद्यार्थ्यांकडून आकारले जाते. जर विद्यार्थ्यांचे शासकीय संस्थांच्या मेरिट लिस्ट मध्ये नाव आले नाही तर विद्यार्थी अनेकदा खाजगी संस्थांमध्ये प्रवेश घेऊन आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करतात.
ITI अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या संधी देखील उपलब्ध आहेत विद्यार्थी टेक्निशियन किंवा नॉन टेक्निशियन म्हणून देखील वेगवेगळ्या संस्थेमध्ये काम करू शकतात. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना कमालीचा आत्मविश्वास निर्माण होतो तसेच विद्यार्थ्यांना थेरी नॉलेज देण्यापेक्षा प्रॅक्टिकली जास्त माहिती या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पुरवली जाते आणि म्हणूनच हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय देखील उघडू शकतात तसेच व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची इन्कम वाढवू शकतात जसे की हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर इलेक्ट्रिशियन फिटर, टेक्निशियन, शिवणकाम, डिझाईनिंग, संगणक तंत्रज्ञान, हार्डवेअर ,नेटवर्क यासारख्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थी स्वतःचे नशीब आजमावू शकतात. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रायव्हेट सेक्टर तसेच गव्हर्मेंट जॉब मध्ये देखील नोकरी लागण्याची शक्यता असते.
वेतन
आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी उमेदवार वेगवेगळ्या पदांवर कार्य करू शकतात त्याचबरोबर टेक्निकल व नॉन टेक्निकल पदानुसार व विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या गुन्हा कौशल्यानुसार अनेकदा त्यांना वेतन दिले जाते. अनेक शासकीय संस्था व खाजगी संस्थांमध्ये वेगवेगळ्या लेवल नुसार उमेदवारांची निवड केली जाते आणि म्हणूनच आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना कमीत कमी 20000 ते 50 हजार वेतन मिळण्याची शक्यता असते. जर शासकीय संस्थेमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली तर शासकीय भत्ता देखील उपलब्ध होतो. आणि ठिकाणी उमेदवाराला राहण्याचे ठिकाण व अन्य शासकीय सुविधा दिल्या जातात आणि म्हणूनच अनेक विद्यार्थी आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी इच्छुक असतात हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना भविष्यात शासकीय सुविधा देखील उपलब्ध होण्याची शक्यता असते.
अशाप्रकारे जर तुम्हाला देखील भविष्यात आयटीआय हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल तर ही माहिती उपयुक्त ठरू शकते. तुम्ही देखील व्यवहारिक ज्ञान आत्मसात करून स्वतःचे भवितव्य उज्वल करू शकता किंवा इतरांना ही माहिती सांगून इतरांचे भवितव्य उज्वल करू शकता, अशा प्रकारचे नवनवीन करिअर संबंधातील व विविध क्षेत्रातील माहिती जाणून घेण्याकरिता आमच्या वेबसाईटला आवश्य फॉलो करा.
हे पण वाचा हॉटेल मॅनेजमेंट कोर्स म्हणजे काय?