What is a Hotel Management Course?|हॉटेल मॅनेजमेंट कोर्स म्हणजे काय?

हॉटेल मॅनेजमेंट कोर्स

मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या अभ्यासक्रमाबद्दल जाणून घेणार आहोत. हा अभ्यासक्रम तुम्हाला करिअरच्या नव्या वाटा खुल्या करून देणार आहेत. पारंपरिक अभ्यास क्रम अनेकदा आपण निवडत असतो परंतु पारंपरिक अभ्यासापेक्षा एक नवीन वाट निवडणे हे अनेकदा कठीण होऊन बसते परंतु ही निवडलेली वाट जर तुम्हाला भविष्यात यश प्राप्त करून देत असेल तर यश देणारी वाट नेहमीच पकडावी असे अनेक जण सल्ला देत असतात. अभ्यासक्रमाचे देखील असेच असते. विद्यापीठ, महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी उत्कर्षासाठी वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची संरचना तयार करत असतात. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी नक्कीच यश प्राप्त करू शकतात.

आज आपण ज्या अभ्यासक्रमाबद्दल जाणून घेत आहोत तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शंभर टक्के हमखास यश देणार आहेत. आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळे पदार्थ खाण्याची सवय असते. रस्त्यावर एखादी नवीन टपरी दिसू दे किंवा नवीन खाण्याचा स्टॉल दिसू दे आपल्या नजरा लगेच वळतात परंतु जर एखादा पदार्थ नवीन कसा बनवायचा त्यासाठी आवश्यक असणारे वेगवेगळे घटक कोणते असतात याचे जर आपल्याला ज्ञान मिळाले तर कसे होईल असा अनेकदा मनात प्रश्न निर्माण होतो तसेच आपल्या आजूबाजूला असे अनेक खवय्ये असतात,जे आपल्याला वेगवेगळे पदार्थ खाऊ घालत असतात आणि म्हणूनच विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या रुचकर पदार्थ बनवण्याच्या कलेला वाव देण्याकरिता अनेक विद्यापीठ एक नवीन अभ्यासक्रम सुरू करतात व आतापर्यंत अनेक विद्यापीठांनी केलेल्या देखील आहे, त्या अभ्यासक्रमाचे नाव आहे हॉटेल मॅनेजमेंट.

मित्रांनो, हॉटेल मॅनेजमेंट हा असा एक अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट संदर्भातील अनेक विषयांचा अभ्यास शिकविला जातो तसेच हा एक व्यवसायिक अभ्यासक्रम आहे आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना अनेक विद्यापीठ व महाविद्यालय 100% प्लेसमेंट देखील देतात. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून रेस्टॉरंट व हॉटेल यांचे व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंट कसे करावे याचे शिक्षण विद्यार्थ्यांना पुरविले जातात तसेच वेगवेगळ्या रेसिपीज रेस्टॉरंट मध्ये काम करण्यासाठी आवश्यक असणारे गुण कौशल्य यांचे ट्रेनिंग देखील विद्यार्थ्यांना दिले जाते.

सध्याच्या काळात या अभ्यासक्रमाला मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहेत. अनेक महाविद्यालय व विद्यापीठे हा अभ्यासक्रम सुरू करतात. अनेक महाविद्यालयांमध्ये तज्ञ मंडळी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना योग्य ती वाट दाखवत असतात तसेच हॉटेल रेस्टॉरंट मध्ये पाडवयाचे नित्य तत्वे एक एखादी रेसिपी बनवताना त्यामध्ये असणारे गुणधर्म यांचे मोजमाप अशा अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना शिकावी जातात आणि म्हणूनच एक मास्टर शेफ जन्माला घालण्याचे कार्य हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमातून होत असते.

 आपल्यापैकी अनेकांनी टेलिव्हिजनवर वेगवेगळ्या प्रकारचे फूड शो बघितले असेल त्या फूड शोमध्ये मास्टर शेफ वेगवेगळ्या डिशेस बनवत असतात आणि म्हणूनच हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून उत्तम मास्टर शेफ निर्माण करण्याची क्षमता या कोर्सच्या अंगी आहे. जर तुम्हाला देखील मास्टरशेफ व हॉटेल मॅनेजमेंट इंडस्ट्री मध्ये स्वतःला सिद्ध करायचे असेल तर हा कोर्स अभ्यासक्रम शंभर टक्के उपयुक्त ठरू शकतो.

या अभ्यासक्रमाचे नाव आपण जेव्हा ऐकतो तेव्हा एक गोष्ट आपल्याला समजून येते की हॉटेल मॅनेजमेंट या नावातच हॉटेल मॅनेज करणे हे स्पष्टपणे कळून चुकते आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना एखादे हॉटेल रेस्टॉरंट कसे मेसेज करायचे.

 हॉटेलमधील सर्व कामे विद्यार्थी कशा प्रकारे उत्तम पद्धतीने करू शकतील तसेच हॉटेलमध्ये जे क्लाइंट येतात त्यांच्याशी आपल्याला कशा पद्धतीने आपली वर्तणूक शैली ठेवायची आहे, त्यांच्याशी वागणूक कशा पद्धतीने करायची आहे याचे सखोल ज्ञान आपल्याला या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिकायला मिळते.

हॉटेल मॅनेजमेंट शिकत असताना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पद्धतशीर पार पाडणे आणि वेळेचे योग्य पद्धतीने मॅनेजमेंट करणे हे अगदी मुलांना शिकवले जाते. या क्षेत्रामध्ये वेळ अत्यंत महत्त्वाचे असते त्याचबरोबर तुम्हा सर्वांना माहितीच आहे. सध्या हॉटेल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. हे इंडस्ट्री विकसित होत असताना भविष्यात हा अभ्यासक्रम पूर्ण होऊन विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी देखील तितकेच लवकर मिळत आहेत.

जागतिकीकरण आणि व्यावसायिक कारणामुळे हॉटेल इंडस्ट्री सगळीकडे वाढलेली आहेत. आपण पर्यटन स्थळ भेट देत असताना नवनवीन हॉटेलला देखील भेट देत असतो. त्या हॉटेलमधील नवीन वैशिष्ट्ये त्यातील खाद्यपदार्थ हॉटेलची ठेवण या सर्व गोष्टींकडे आपण जाणून बोलून लक्ष देत असतो आणि म्हणूनच जर तुम्हाला देखील फिरायची सवय असेल. नवीन पदार्थ खायचे सवय असेल तर अशावेळी तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट हे क्षेत्र हमखास निवडू शकता. या क्षेत्रामध्ये प्रवेश करून तुम्ही तुमच्या स्वप्नांना उत्तुंग भरारी देऊ शकता.

पात्रता

जर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम निवडायचा असेल तर त्यासाठी काही पात्रता देखील विद्यापीठ व महाविद्यालयांनी ठरवून दिलेली आहे. हॉटेल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम एकंदरीत तीन वर्षाचा असतो. या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय शिकवून त्यांना योग्य ते ज्ञान दिले जाते. काही महाविद्यालयांमध्ये हा चार वर्षाचा कोर्स असतो तसेच हॉटेल मॅनेजमेंट जर तुम्हाला डिग्री मिळवायचे नसेल तर तुम्ही एका वर्षाचा डिप्लोमा कोर्स देखील करू शकता.

ज्या विद्यार्थ्यांना तीन व चार वर्ष सातत्याने अभ्यास करता येणे शक्य होणार नाही, अशा विद्यार्थ्यांकरिता विद्यापीठांनी काही कोर्सेस देखील निर्माण केलेले आहेत. डिप्लोमा कोर्स सर्टिफिकेट, कोर्स मॅनेजमेंट, डिग्री कोर्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय विद्यार्थ्यांकरीता उपलब्ध करण्यात आलेले आहे. विद्यार्थी त्यांच्या वेळेनुसार व क्षमतेनुसार कोणत्याही प्रकारचा कोर्स सहजच करू शकतात.

जर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थीला दहावी व बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. अधिकृत मंडळाद्वारे विद्यार्थी उत्तीर्ण असायला हवा तसेच विद्यार्थ्याला 50% पेक्षा जास्त गुण असणे गरजेचे आहे. या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणत्याही शाखेतील विद्यार्थी सहजच प्रवेश घेऊ शकतो. काही महाविद्यालय विद्यापीठांमध्ये या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा देखील घेतली जाते.

काही महाविद्यालयांमध्ये व विद्यापीठांमध्ये थेट विद्यार्थ्यांना दहावी व बारावीला मिळालेल्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्टच्या माध्यमातून प्रवेश दिला जातो.

फी 

हॉटेल मॅनेजमेंट हा एक पूर्णपणे व्यवसायिक अभ्यासक्रम असल्यामुळे या अभ्यासक्रमाला सध्या मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आणि म्हणूनच या अभ्यासक्रमाची फी देखील त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांकडून आकारले जाते. विद्यार्थ्यांना महाविद्यालय व विद्यापीठाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सुविधा याद्वारे फी घेण्यात येते तसेच या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल जास्त गोष्टी शिकवल्या जातात जसे की केक बेकरी पदार्थ वेगवेगळ्या रेसिपी तयार करणे यांचे ज्ञान दिले जाते आणि म्हणूनच हा अभ्यासक्रम शिकविताना विद्यार्थ्यांकडून फी देखील त्या पद्धतीने आकारले जाते. जर तुम्ही सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणार असाल तर खाजगी म्हणजेच प्रायव्हेट कॉलेज पेक्षा फी कमी असते परंतु प्रायव्हेट कॉलेजमध्ये या अभ्यासक्रमासाठी जास्त प्रमाणात फी आकारली जाते.

या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना 50000 ते 1.5 लाखापर्यंत फी द्यावी लागते.

हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर भविष्यात उपलब्ध असणाऱ्या संधी 

  • हॉटेल रिसॉर्ट 
  • एअरलाइन किचन
  • इंडियन आर्मी नेव्ही
  •  रेस्टॉरंट / क्लब बार 

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या ठिकाणी देखील प्लेसमेंट उपलब्ध करून दिले जाते जसे की हा व्यवसायिक अभ्यासक्रम असल्याने विद्यार्थ्यांना तीन वर्षाचा व चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर अनेक वेळा महाविद्यालयांमध्ये प्लेसमेंट कंपन्या येत असतात. या प्लेसमेंट मध्ये विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे गुण कौशल्य तज्ञ मंडळी द्वारे तपासून घेतले जातात. मुलाखतीच्या माध्यमातून विविध प्रश्नां द्वारे त्यांचे परीक्षा घेतली जाते आणि विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

  • ताज ग्रुप ऑफ हॉटेल
  • फाईव्ह स्टार हॉटेल 
  • सेव्हन स्टार हॉटेल 
  • ओबेरॉय हॉटेल 
  • रिलायन्स ग्रुप इंडस्ट्रीज
  •  एअरलाइन्स किचन

 यासारख्या पंचतारांकित व सप्त तारांकित हॉटेल्स तुम्हाला त्यांच्या रेस्टॉरंट व हॉटेलमध्ये कामाला ठेवू शकतात.

हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये एकंदरीत हॉटेल मॅनेजमेंट हॉस्पिटलिटी क्षेत्र संदर्भातील अनेक नवनवीन संधी विद्यार्थ्यांसाठी खुले होतात. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजर, रेस्टॉरंट मॅनेजर इव्हेंट मॅनेजमेंट मॅनेजर, एक्झिक्यूटिव्ह शेप मास्टर शेफ हाउसकीपिंग, मॅनेजर हॉटेल डायरेक्टर रिसॉर्ट मॅनेजर इत्यादी महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना मिळते.

विद्यार्थी दहावी नंतर देखील हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात तसेच हा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना विद्यार्थ्यांना डिप्लोमा कोर्स उपलब्ध करण्यात आलेला आहे. पुढील डिप्लोमा कोर्सच्या माध्यमातून तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात स्वतःचे वर्चस्व निर्माण करू शकतात.

  • डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट 
  • डिप्लोमा इन हॉटेल अँड हॉस्पिटलिटी मॅनेजमेंट 
  • हॉटेल मॅनेजमेंट इन केटरिंग टेक्नॉलॉजी 
  • डिप्लोमा इन फ्रंट ऑफिस ऑपरेशन 
  • डिप्लोमा इन फूड अँड बेवरेज सर्विस 
  • बारावी नंतर देखील काही डिप्लोमा कोर्सेस विद्यार्थ्यांना करता येतात ते पुढील प्रमाणे 
  • बेसन ऑफ हॉटेल मॅनेजमेंट 
  • बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 
  • बीएससी इन हॉटेल मॅनेजमेंट 
  • बीए इन हॉटेल मॅनेजमेंट 
  • डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट 

अशाप्रकारे विद्यार्थी दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये स्वतःचे करिअर घडवू शकतात त्याचबरोबर तीन व चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पगार देखील चांगला मिळतो. विद्यार्थी त्यांच्या अंगी असणारे गुण कौशल्य व टॅलेंट यामुळे चांगला पगार देखील कमवू शकतात. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जी डिग्री मिळते. त्या डिग्री मुळे तुम्हाला परदेशी जाण्याची संधी देखील मिळते. अनेकदा हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना शिफ्टवर नोकरी मिळते तसेच वेगवेगळ्या देशांमध्ये फिरण्याची संधी देखील उपलब्ध केली जाते. हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण केल्यानंतर रिसर्च डेव्हलपमेंट म्हणून देखील तुम्ही काम करू शकता. वेगवेगळे अन्नपदार्थ व त्यांच्या गरजेनुसार विशेष तयार करणे, या क्षेत्रामध्ये नवनवीन संशोधनाच्या संधी निर्माण करणे यासाठी देखील तुम्ही प्रयत्न करू शकतात.

बीएमएस कोर्स बद्दल संपूर्ण माहिती