ग्राफिक डिझायनिंग
मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या अभ्यासक्रमाबद्दल जाणून घेणार आहोत. हा अभ्यासक्रम तुम्हाला भविष्यात खूप साऱ्या संधी उपलब्ध तर करून देणार आहे पण त्याचबरोबर करिअरच्या नवीन वाटा शोधण्यासाठी देखील हा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे. हल्ली सोशल मीडिया मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. या सोशल मीडियाचा वापर करूनच प्रत्येक गोष्ट तयार केली जाते. त्याचबरोबर आता वेब टेक्नॉलॉजी बदललेली आहे इंटरनेटचा प्रचार आणि प्रसार देखील मोठ्या प्रमाणात झालेला आहे.
आपण 5 g च्या जगात वास्तव्य करत आहोत. नेटवर्क आणि इंटरनेट यांच्या स्ट्रॉंग कनेक्टिव्हिटीमुळे भविष्यात अनेकांना स्वतःचे स्वप्न साकार करण्यासाठी मदत होत आहे. आज आपण ज्या अभ्यासक्रमाबद्दल जाणून घेणार आहोत, त्या अभ्यासक्रमामुळे आतापर्यंत अनेकांचे स्वप्न साकार झालेले आहे.
जर तुम्हाला गेम खेळण्याची आवड असेल, तुम्हाला कलाकुसरी करण्याची आवड असेल, कॉम्प्युटरवर जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याची आवड असेल, गेम एप्लीकेशन, गेम डेव्हलपमेंट यासारख्या गोष्टींमध्ये तुमचे मन रमत असेल तर आजचा अभ्यासक्रम तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकाल चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल…
मित्रांनो सध्या प्रत्येक व्यक्ती ग्राफिक डिझाईनिंग अभ्यासक्रम शिकण्याचा प्रयत्न करतो. हा अभ्यासक्रम केल्याने विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी तर मिळते पण त्याचबरोबर स्वतःचे स्वप्न करण्याची संधी देखील मिळत असते आणि म्हणूनच ग्राफिक डिझाईन हा अनेक संस्था अभ्यासक्रम चालवीत असतात. आज आपण ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय ?
ग्राफिक डिझाईन मध्ये नेमके कोणकोणते करिअर ऑप्शन असतात त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय?
जर सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास ग्राफिक डिझायनिंग म्हणजे डिजिटल योग या डिजिटल युगात हल्ली एखाद्या उत्पादनाची मार्केटिंग असो एखाद्या उत्पादनाबद्दल लोकांना कळवणे असो किंवा वेगवेगळ्या गोष्टी लक्षात ग्राहकांवर ज्यापर्यंत पोहोचवणे असो या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ग्राफिकचा वापर केला जातो. ग्राफिक्सच्या माध्यमातून एखादी कलाकृती लोकांपर्यंत सहज पोहोचवली जाते.
जर तुमच्या अंगी कॉम्प्युटरचे बेसिक नॉलेज असेल किंवा कॉम्प्युटर मधील वेगवेगळे एप्लीकेशन तुम्हाला वापरता येत असेल तर ग्राफिक डिझाईनिंग हे क्षेत्र तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. सध्या अनेक कंपनी ग्राफिक डिझाईनिंग क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण करत आहेत आणि म्हणूनच या कंपनींना ग्राफिक डिझाईनर पदासाठी आवश्यक असणाऱ्या उमेदवाराची गरज देखील लागते. ग्राफिक डिझाईनच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळे कार्टून्स व्हिडिओ गेम्स एप्लीकेशन बॅनर इत्यादी गोष्टी सहजच बनवू शकतात.
तसे तर पाहायला गेले तर ग्राफिक डिझाईन म्हणजे शब्द, चित्र, वेगवेगळ्या प्रतिमा, टेक्स्ट यांचा वापर करून एखादी कलाकृती तयार केली जाते. या कालाकृतीलाच ग्राफिक असे म्हणतात. या ग्राफिकच्या माध्यमातून एखादा संदेश लक्षात ग्राहकावर वर्गापर्यंत पोहोचवले जाते आणि म्हणूनच कॉम्प्युटर लैंग्वेज मध्ये एखाद्या संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे याकरिता कम्युनिकेशन बेस्ट वे म्हणून ग्राफिककडे पाहिले जाते. अनेकदा ग्राफिक हे आभासी पद्धतीने किंवा फिजिकल म्हणजे वस्तू स्वरूपात देखील तयार केले जाते. या दोन्ही पद्धतीच्या माध्यमातून एखाद्या संदेश अधिक परिणामकारक रित्या पोहोचता यावा हा एक हेतू असतो.
सध्या मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर तर केला जातो पण त्याचबरोबर ई-कॉमर्स कंपनी ग्राफिक डिझाईनच्या माध्यमातून वेगवेगळे टास्क देखील निर्माण करत असतात. काही ग्राफिक डिझाइनर हे हात लावता येणारे असे असतात तर काहींना आपण हात लावू शकत नाही जसे की जेव्हा आपण मोबाईल किंवा कॉम्प्युटर किंवा एखादी वेबसाईट हाताळत असतो तेव्हा आपल्याला अनेक ॲडव्हर्टायझिंग चेपोप मेसेज येत असतात. हे सर्व उदाहरण टचेबल ग्राफिक यामध्ये येतात तसेच काही आपण कार्टून्स तयार करतो जसे की बॅनर फ्लेक्स विजिटिंग कार्ड या सर्वांचा समावेश टचेबल ग्राफिक यात होतो.
ग्राफिक डिझाईनर यांच्या कामाचे स्वरूप नेमके असते तरी काय ?
जेव्हा आपण ग्राफिक डिझाईनर या शब्दाबद्दल ऐकत असतो तेव्हा मनामध्ये एक प्रश्न देखील निर्माण होतो की या पदावर काम करणाऱ्या व्यक्ती नेमक्या करतात तरी काय? तर अशावेळी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की अनेकदा एखादे उत्पादन जेव्हा मार्केटमध्ये नव्याने येत असते तेव्हा त्या उत्पादनाची कलाकृती आभासी पद्धतीने म्हणजेच वर्चुअल वे ने डिझाईन केली जाते. या डिझाईनच्या माध्यमातून ते उत्पादन कसे दिसेल? रंग, आकार, टेक्स्ट, काही फीचर्स वापरून ते प्रॉडक्ट लोकांसमोर सादर केले जाते अशावेळी ग्राफिकचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.
ग्राफिक डिझाईनर जाहिराती मासिके ( मॅक्झिन), लेबल व्हिजिटिंग कार्ड यासारख्या बाबींचे काम देखील करत असतात. चित्र, इमेज, टेक्स्ट, फॉन्ट यांचा वापर करून लेआउट तयार करतात आणि या ले आऊटच्या मदतीने एखादा मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवतात हा प्रभावी मेसेज लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी उपयुक्त ठरतो.
ग्राफिक डिझायनर जेव्हा एखाद्या उत्पादनासाठी काम करायला सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीला अनेक गोष्टींची सामना करावा लागतो जसे की एखाद्या उत्पादनाचे लक्ष ग्राहक वर्ग उत्पादन नेमके कुठल्या वर्गासाठी तयार करायचे आहे. उत्पादनाचा कालावधी काय असणार आहे. उत्पादन संशोधन इत्यादी गोष्टींचे ज्ञान ग्राफिक डिझायनरला असणे गरजेचे आहे.
पात्रता
जर तुम्हाला जर तुम्हाला देखील ग्राफिक डिझाईनर बनायचे असेल तर त्यासाठी पात्रता फरशी महत्त्वाची ठरत नाही परंतु उमेदवाराला पायाभूत शिक्षण म्हणजेच बेसिक ज्ञान असणे गरजेचे आहे.
उमेदवार दहावी बारावी किंवा पदवीधर असणे गरजेचे आहे.
सध्या मोठ्या प्रमाणावर कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये ग्राफिक डिझाईनिंग हा कोर्स मोठ्या प्रमाणावर शिकवला जातो. अनेक विद्यापीठ अभ्यासक्रमामध्ये देखील हा विषय किंवा या विषयातील थोडासा भाग मुलांच्या अभ्यासामध्ये समाविष्ट करतात, जेणेकरून मुलांना भविष्यात इंटरनेटवर ग्राफिंग बद्दल माहिती मिळू शकेल.
अनेक खाजगी संस्था व सरकारी संस्था ग्राफिक डिझाईनिंग करिता सहा महिने व दोन वर्ष इतका कालावधीचा अभ्यासक्रम देखील डिझाईन करतात. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी ग्राफिक डिझाईनर बनू शकतात.
काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मोठ्या प्रमाणावर ग्राफिक डिझाईनिंग, ॲनिमेशन, थ्रीडी, फोर डी सारख्या कोर्सेस बाजारामध्ये उपलब्ध करून देतात. हे कोर्सेस करून देखील विद्यार्थी ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रात स्वतःचे करिअर बनवू शकतात.
ग्राफिक डिझायनर बनण्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटरचे बेसिक नॉलेज असणे गरजेचे आहे.
एडॉब फोटोशोप, इलस्ट्रेटर, फोटोशॉप कोरल ड्रॉ एप्लीकेशन यासारखे सॉफ्टवेअर वापरता यायला हवे.
ग्राफिक डिझाईनिंग कोर्स कालावधी
ग्राफिक डिझायनिंग हा कोर्स जर करायचा असेल तर काही संस्था डिप्लोमा कोर्स देखील चालवत असतात. डिप्लोमा च्या माध्यमातून देखील विद्यार्थी तीन ते सहा महिन्याचा डिप्लोमा करू शकता तसेच काही संस्था डिग्री कोर्स राबवत असतात चार वर्षाचा हा डिग्री कोर्स प्रामुख्याने असतो.
ग्राफिक डिझाईनिंग फी
जसे की आपणा सर्वाना माहिती आहे की, ग्राफिक डिझाईनिंग हा एक व्यवसायिक अभ्यासक्रम आहे. हा एक व्यवसाय अभ्यासक्रम असल्याने या अभ्यासक्रमाचे फिरदेखील पारंपरिक अभ्यासक्रमापेक्षा जास्त असते. जर हा कोर्स तुम्हाला करायचा असेल तर विद्यार्थ्यांना वीस हजार ते एक लाख रुपये मोजावे लागतात. प्रत्येक संस्था व इन्स्टिट्यूशन नेमक्या विद्यार्थ्यांना काही सुविधा पुरवितात यावर देखील विद्यार्थ्यांकडून फ्री आकारले जाते. काही महाविद्यालय व विद्यापीठ विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देखील दिले जाते आणि या अनुसरण विद्यार्थ्यांना फी सांगितले जाते. जर तुम्हाला देखील ग्राफिक डिझाईनिंग फोर्स करायचा असेल तर त्याआधी फी आणि त्याचे इंस्टॉलमेंट इत्यादी गोष्टी तपासून पहा.
पगार
ग्राफिक डिझाईनिंग हा चार वर्षाचा अभ्यासक्रम किंवा सहा महिन्याचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पगार देखील तितकाच चांगला मिळत असतो. जर तुमच्या अंगी गुण कौशल्य व क्रिएटिव्हिटी असेल तर त्याच्या आधारावर देखील तुम्ही खूप सारे पैसे कमावू शकतात. सध्या ऍडव्हर्टायझिंग एजन्सी मध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राफिक डिझायनर या पदावर कार्य करणाऱ्या व्यक्तींची मोठ्या प्रमाणात मागणी असते तसेच या संस्थेत तुमच्या क्रिएटिव्हिटीला जास्त महत्त्व दिले जाते आणि म्हणूनच ग्राफिक डिझाईनर यांना सर्वसाधारणपणे तीस हजार ते एक लाख रुपये इतका महिन्याला पगार मिळतो.
जर तुम्हाला एखाद्या संस्थेमध्ये काम करायचे नसेल तर अशावेळी तुम्ही फ्रीलान्स म्हणून ग्राफिक डिझायनर म्हणून देखील काम करू शकता, अशावेळी वेगवेगळ्या उत्पादनाची कामे घेऊन तुम्ही घरबसल्या देखील भरमसाठ पैसे कमवू शकतात. ग्राफिक डिझायनर हे अनेकदा लग्न पत्रिका, विजिटिंग कार्ड, टेम्प्लेट, लेटरहेड, बॅनर, पोस्टर इत्यादी गोष्टी बनवत असतात. ब्रोशर या सर्वांच्या माध्यमातून देखील तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकतात आणि लग्नाच्या सीझनमध्ये लग्नपत्रिका साठी ग्राफिक डिझायनर ची मोठ्या प्रमाणावर मदत घेतली जाते.
जर तुमच्या अंगी टेक्निकल नॉलेज आणि क्रिएटिव्हिटी असेल तर तुम्हाला बाराही महिने व 24 तास काम उपलब्ध असू शकते आणि म्हणूनच फ्रीलान्सर म्हणून देखील तुम्ही महिन्याला दोन ते तीन लाख रुपये आरामात कमवू शकता.
हे पण वाचा फॅशन डिझायनिंग कोर्स म्हणजे?