MBA Full Information in Marathi|एमबीए म्हणजे काय?

MBA Full Information in Marathi

आजच्या या लेखांमध्ये आपण MBA Full Information in Marathi म्हणजेच एमबीए बद्दल महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत. मित्रांनो हल्ली वेगवेगळे कोर्स नव्याने सुरू झालेले आहेत. परंतु एकेकाळी एमबीएला सर्वात महत्त्वाचे मानले जायचे. एखाद्या व्यक्तीने एमबीए केले आहे. असे म्हटल्यावर त्याचा दरारा समाजामध्ये वाढलेला दिसायचा. आधी देखील एमबीएची तितकीच क्रेझ लोकांमध्ये पाहायला मिळायची,तेवढीच आज देखील पाहायला मिळते. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत, जे ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर एमबीए करण्यासाठी भारतात किंवा प्रदेशात शिक्षणासाठी जात असतात. जर तुम्हाला देखील एमबीए बद्दल काही नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असेल, भविष्यात एमबीए शिक्षण पूर्ण करायचे असल्यास आजची माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

दहावी , बारावी आणि पदवीचे शिक्षण पूर्ण करत असताना अनेकांना भविष्याचे वेध देखील लागलेले असतात. चांगली डिग्री मिळून चांगला पगार मिळावा असा सर्वसामान्य व्यक्तीचे स्वप्न असते आणि म्हणूनच अनेक जण आपल्या स्वप्नांना भरारी देण्याकरिता वेगवेगळे व्यवसायिक अभ्यासक्रम देखील शिकत असतात.

एमबीए म्हणजेच मास्टर ऑफ बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन. हा कोर्स व्यवसायिक कोर्स आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे, की सध्या स्पर्धेचे युग आहे कॉर्पोरेट जगामध्ये जर तुमच्या अंगी गुण कौशल्य नसतील तर तुम्हाला तुमचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी वेळ लागतो आणि म्हणूनच योग्य व्यवस्थापन गुण कौशल्य आपल्या अंगी असणं गरजेचं आहे. एमबीए हा अभ्यासक्रम व्यवस्थापनाशी निगडित आहे. जर उत्तम मॅनेजमेंट हवं असेल तर आपल्याला काही चांगल्या गोष्टी देखील आत्मसात करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच एमबीए हा पोस्ट ग्रॅज्युएशन अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमांमध्ये तुम्हाला मॅनेजमेंट संदर्भातील अनेक विषयांचा अभ्यास शिकविला जातो.

डिग्री मिळवल्यानंतर पुढील दोन किंवा तीन वर्ष दरम्यान आपल्याला हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कॉर्पोरेट जगतात अनेक संधी उपलब्ध होतात. या संधीच्या माध्यमातून तुम्ही तुमचे भवितव्य उज्वल बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया एमबीए बद्दल कशाप्रकारे अभ्यास करायचा आहे. हा कोर्स शिकत असताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे, या अभ्यासक्रमाला पूर्ण करायचं असेल तर आपल्या अंगी नेमकी कोणती पात्रता असावी याबद्दल देखील आपण जाणून घेणार आहोत..

पात्रता:

एमबीए या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्याला कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी तसेच विद्यापीठ व महाविद्यालयाद्वारे अधिकृत पदवी असणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्याला कमीत कमी 40 ते 50 टक्के गुण असणे गरजेचे आहे तसेच या अभ्यासक्रमासाठी शासनाने काही आरक्षण देखील ठेवले आहे. जातीनिहाय आरक्षणाच्या मदतीने तुम्हाला आरक्षणाचा लाभ घेता येऊ शकतो.

हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालय अनेकदा प्रवेश परीक्षा देखील आयोजित करतात. प्रवेश परीक्षेमधील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो तसेच काही खाजगी संस्थांमध्ये प्रवेश परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देखील दिला जातो.

प्रवेश परीक्षा ही शासनाद्वारे देखील घेतली जाते त्याला एमबीए सीईटी असे म्हणतात. या सिईटीच्या माध्यमातून अनेकदा कट ऑफ लिस्ट देखील लागते. जर तुम्ही कट ऑफ पार केला तर शासकीय संस्थेमध्ये देखील तुम्हाला प्रवेश मिळू शकतो.

एमबीए कोर्स केल्यानंतर किंवा कोर्स करत असताना भविष्यातील संधी देखील तितक्याच उपलब्ध आहेत. एमबीए कोर्स शिकत असताना या कोर्स अंतर्गत विविध स्पेसिलायझेशन केले जाते. विद्यार्थी स्वतःच्या अंगी असणाऱ्या गुन्हा कौशल्याच्या आधारावर एखाद्या क्षेत्रामध्ये प्रभुत्व निर्माण करू शकतो म्हणून आता आपण एमबीए करताना नेमके कोणते स्पेशलायझेशन तुम्ही करू शकता याबद्दल जाणून घेऊ..

हा अभ्यासक्रम एकंदरीत मॅनेजमेंट संदर्भात असल्यामुळे तुम्हाला मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये महत्त्वाचे असणारे विविध क्षेत्रांबद्दल प्रामुख्याने शिकविले जाते.

फायनान्स मॅनेजमेंट : या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवस्थापन कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन केले जाते तसेच आर्थिक संकट आर्थिक आपत्कालीन वेळी कशाप्रकारे गोष्टी हाताळायचे याचे देखील ज्ञान दिले जाते.

मीडिया मॅनेजमेंट : हल्ली माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. प्रत्येक गोष्ट यशस्वी होण्याकरिता वेगवेगळ्या माध्यमांचा प्रामुख्याने वापर केला जातो. सोशल मीडिया, डिजिटल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, ट्रॅडिशनल मीडिया या सर्वांच्या माध्यमातून कॉर्पोरेट जगात कशाप्रकारे वापरायचे याचे ज्ञान मीडिया मॅनेजमेंट या क्षेत्रात प्रामुख्याने दिले जाते आणि म्हणूनच मीडिया मॅनेजमेंट देखील हल्ली महत्त्वाचे मानले जाते.

रुलर मॅनेजमेंट : एमबीए चा अभ्यास करत असताना शहरी व ग्रामीण विकास म्हणजेच डेव्हलपमेंट मॅनेजमेंट करणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या पातळीवरील लोकांची मानसिकता या क्षेत्रामध्ये अभ्यासले जाते.

हॉस्पिटलिटी मॅनेजमेंट : हॉस्पिटल की मॅनेजमेंट मध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंटच्या साठी आवश्यक असणाऱ्या अनेक बाबींचा अभ्यास केला जातो तसेच दिग्गज मन मंडळी द्वारे विद्यार्थ्यांना ज्ञानदेखील दिले जाते.

ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट: ह्यूमन रिसर्च मॅनेजमेंट हे क्षेत्र सध्या मोठ्या प्रमाणावर विस्तारित होणारे क्षेत्र आहे. कोणत्याही संस्थेमध्ये यश प्राप्त करणे करता मनुष्यबळाची गरज असते आणि म्हणूनच मानवी संख्या नियंत्रित करून योग्य उमेदवाराच्या अंगी असणारे गुण कौशल्य ओळखून संस्थेचा विकास होण्याकरिता ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचे ठरते.

हेल्थकेअर मॅनेजमेंट : हेल्थकेअर मॅनेजमेंट मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर एमबीए उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांची मागणी असते, अशावेळी आरोग्य क्षेत्रासंदर्भात असणारे व्यवस्थापन उत्तम ठरते.

इव्हेंट मॅनेजमेंट: इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये प्रत्येक समारंभ कार्य लग्न याचे योग्य व्यवस्थापन तसेच ग्राहकाच्या मागणीनुसार ग्राहकांच्या इच्छा पूर्ण करणे इत्यादी गोष्टींची मागणी या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते.

स्पोर्ट्स मॅनेजमेंट : स्पोर्ट मॅनेजमेंट हे क्षेत्र सध्या विस्तारित होणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये खेळाडूंचे व्यवस्थापन प्रत्येक खेळाचे व्यवस्थापन इत्यादी गोष्टी शिकविल्या जातात.

मार्केटिंग मॅनेजमेंट : उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवणे व आपल्या टार्गेट ऑडियन्स लक्षात ठेवून उत्पादनाचे मार्केटिंग करणं अत्यंत गरजेचं असतं आणि म्हणूनच सध्या वेगवेगळ्या संस्थेमध्ये मार्केटिंग मॅनेजमेंट ला मोठ्या प्रमाणात महत्त्व देण्यात आलेले आहे. मार्केटिंग मॅनेजमेंट मध्ये आपण स्पेशलायझेशन करून कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी करू शकतो.

ट्रॅव्हलिंग टुरिझम मॅनेजमेंट : ट्रॅव्हल्स टुरिझम हे क्षेत्र हल्ली विकसित होत आहेत. प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊन स्वतःचे आयुष्य विस्तारित करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणूनच एमबीएच्या शिक्षणाला मध्ये ट्रॅव्हल टुरिझम मॅनेजमेंट हे विषय देखील शिकवले जातात, जेणेकरून ट्रॅव्हल्स क्षेत्राबद्दल उमेदवाराला भविष्यात चांगले करिअर करता येऊ शकतील त्याची काळजी घेतली जाते.

डिजिटल मार्केटिंग : सध्या सोशल मीडियाच्या जमाना असल्याने फेसबुक इंटरनेट youtube यासारखा सोशल नेटवर्क साईटचा वापर करून अनेक संस्था आपली प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच आपल्या उत्पादनाची विक्री प्रमोशन पब्लिसिटी डिजिटल माध्यमांच्या आधारे करून मार्केटिंग केले जाते. एमबीए करत असताना डिजिटल मार्केटिंग देखील स्पेशलिझेशन केले जाते. हे स्पेशलायझेशन पूर्ण केलेल्या उमेदवारांना सोशल मीडिया मार्केटिंग तसेच डिजिटल मार्केटर म्हणून देखील पद दिले जाते.

कालावधी:

हा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स असल्याने पदवीधर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षाचा प्रामुख्याने अभ्यासक्रम असतो. काही ठिकाणी म्हणजेच खाजगी संस्थांमध्ये एक वर्षाचे देखील एमबीए असते. हा अभ्यासक्रम शिकत असताना सेमिस्टर पॅटर्न राबविले जाते. सेमिस्टर नुसार तुम्हाला विषय देखील शिकवले जातात. शेवटच्या सेमिस्टर ला तुम्हाला एक प्रकल्प देऊन ब्लॅकबूक च्या मदतीने तुमचे प्रोजेक्ट विद्यापीठातील तज्ञ मंडळी समोर सादर केले जातात आणि प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे तुमच्या प्रकल्पाचे मूल्यांकन केले जाते.

फी

एमबीए हा कोर्स तसे पाहायला गेले तर प्रोफेशनल कोर्स आहे. या कोर्सला सध्या मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने अनेक शासकीय व खाजगी संसदेखील आपल्या संस्थेमध्ये कोर्स नव्याने सुरू करत आहेत म्हणूनच प्रत्येक महाविद्यालय व विद्यापीठ नुसार या कोर्स साठी आवश्यक असणारी फी देखील वेगवेगळ्या आहेकारण की प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांना ज्या सुविधा पुरवितात त्यानुसारच फी आकारले जाते साधारणपणे या अभ्यासक्रमाची फी 50 हजारापासून ते 5 लाख इतकी असते.

विषय|MBA मध्ये किती सेमिस्टर आहेत?

एमबीए अभ्यासक्रमामध्ये शिकविले जाणारे विषय पुढीलप्रमाणे आहेत .या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने चार सेमिस्टर असतात आणि प्रत्येक सेमिस्टरला वेगवेगळे विषय देखील असतात.

MBA subjects

SEM 1

  • Marketing Management
  • Organization behaviour
  • Human resource management
  • Information technology management
  • Business communication
  • Financial accounting
  • Quantitive methods
  • Managerial economics

SEM II

  • management of information systems
  • manangemnt accounting
  • Market research financial management
  • operation management
  • organization effectiveness and change
  • economic environment of business management science

SEM III

  • Business ethics and corporate social responsibility
  • Strategic analysis
  • Elective course
  • Legal environment of business

sem IV

  • International business environment
  • Strategic management
  • Project study
  • Elective course

जर वरील आपण सगळे विषय पाहिले तर प्रत्येक विषय हा स्वतःमध्ये एक कोर्स आहे आणि म्हणूनच व्यवस्थापनाचा अभ्यास करत असताना एमबीएच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे थोडेफार ज्ञान मिळावे या अनुषंगाने विद्यापीठ आणि महाविद्यालयाने सिलॅबस तयार केलेलाआहे. या अभ्यासक्रमाच्या मदतीने विद्यार्थ्यांना व्यवस्थापन कशा प्रकारे करायचे आहे व्यवस्थापनाचे कार्य करत असताना दैनंदिन जीवन जगताना कॉर्पोरेट विश्वात कशाप्रकारे अनेक गोष्टी हाताळायचा याचे प्रत्यक्ष ज्ञानदेखील विद्यार्थ्यांना दिले जाते आणि म्हणूनच सेमिस्टर नुसार शिकवले जाणारे विषय विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या गुन्हा कौशल्यांना नक्कीच वाव देतात.

एम बी ए अभ्यासक्रम शिकवणारा शैक्षणिक संस्था

एमबीए अभ्यासक्रमाला देशातच नाही तर जगभरात मान्यता मिळाली आहे. मास्टर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन या अभ्यासक्रमाचा पाया हा व्यवस्थापनाचा पाया म्हणून ओळखला जातो. हल्ली व्यवस्थापन प्रत्येक ठिकाणी केले जाते. एखादे कार्यक्रम असू द्या, समारंभ असू द्या किंवा कोणत्याही सभेची आखणी असू द्या अशावेळी योग्य ते नियोजन मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच हा अभ्यासक्रम वैश्विक पातळीवर शिकविला जातो. हा अभ्यासक्रम शिकून कॉर्पोरेट विश्वात येणारा व्यक्ती महत्त्वाचा ओळखला तर जातो पण त्याचबरोबर त्याला चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळत असते आणि म्हणूनच अनेक शैक्षणिक संस्था हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी उत्सुक असतात.

  • मुंबई युनिव्हर्सिटी
  • गुजरात युनिव्हर्सिटी
  • कलकत्ता युनिव्हर्सिटी
  • मद्रास युनिव्हर्सिटी
  • ओपन युनिव्हर्सिटी
  • डिस्टन्स एज्युकेशन
  • पनवेल युनिव्हर्सिटी
  • सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी
  • ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी

या सारख्या नामांकित संस्था व महाविद्यालय एमबीए चा अभ्यासक्रम शिकवितात.

भारतात MBA चे किती प्रकार आहेत?

एम बी ए अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांसाठी डिस्टन्स एज्युकेशनचा देखील उत्तम पर्याय आहे. हा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार देखील महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये शिकता येतो त्याचबरोबर हा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स असल्याने तुम्ही जॉब करता करता देखील हा अभ्यासक्रम शिकू शकता, अशा प्रकारच्या सुविधा देखील विद्यार्थ्यांसाठी पुरवण्यात आलेल्या आहेत.

पूर्ण वेळ : एम बी अभ्यासक्रम हा पूर्ण वेळ अभ्यासक्रम देखील आहे. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थी नियमितपणे कॉलेजला जाऊन लेक्चर ला बसू शकतात तसेच या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सर्व सुविधा पुरविल्या जातात.

पार्ट टाइम एमबीए : या प्रकारच्या एमबीए मध्ये विद्यार्थी अर्धवेळ महाविद्यालया उपस्थित असतात आणि आपले शिक्षण पूर्ण करतात.

ऑनलाइन एमबीए : या प्रकारच्या एमबीए मध्ये विद्यार्थ्यांना सर्व सुविधा ऑनलाईन म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातून पुरविले जातात. रेकॉर्डिंग लेक्चर शिक्षकांचे मार्गदर्शन हे सर्व इंटरनेटच्या माध्यमातून तसेच वेगवेगळे डिजिटल टूल च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुरविले जातात. लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑनलाईन एमबीएला मोठ्या प्रमाणात मागणी होती.

हे पण वाचा:

बीएससी शिक्षण म्हणजे काय?

बीसीए कोर्से बद्दल संपूर्ण माहिती