फॅशन डिझायनिंग बद्दल माहिती
मित्रांनो, आज आपण एका आगळावेगळा कोर्स बद्दल जाणून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना माहिती आहे की, सध्या इंटरनेटचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे.” हल्ली फॅशनचा जमाना आहे ” असे अनेक जण म्हणत असतात. अनेकांच्या तोंडावर द्वारे तुम्ही हे वाक्य ऐकले देखील असेल परंतु फॅशनच्या या दुनियेमध्ये स्वतःला सिद्ध करायचे म्हणजे नेमके काय करायचे असा देखील अनेकदा प्रश्न निर्माण होत असतो.
जर तुमच्या मनात देखील असा प्रश्न निर्माण झाला असेल. या फॅशनच्या दुनियेत तुम्हाला स्वतःची एक वेगळी फॅशन नव्याने तयार करायची असेल तर आजची माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला फॅशन डिझाईनिंग म्हणजे नेमके काय असते? त्याचा अभ्यासक्रम कसा असतो? फॅशन डिझाईनर बनण्यासाठी आपल्या अंगी नेमके कोणते गुण कौशल्य असायला हवेत याबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
लहानपणापासून ते आत्तापर्यंत अनेकदा तुम्ही फॅशन फॅशन फॅशन हा शब्द ऐकला असेल परंतु अनेकदा फॅशन म्हणजे काय हे आपल्याला कळत नाही. फॅशन म्हणजे नेमका एखादा ट्रेंड एखादा काळ की ज्या काळामध्ये एकच घटना एखादी गोष्ट व वस्तू लोक फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याचा स्ट्रेंड अनेकजण रचत असतात. फॅशन डिझायनर हे पद अनेकदा तुम्ही ऐकले असेल आपल्यापैकी अनेक जण चित्रपट सिरीयल पाहतात.
या चित्रपटांमध्ये नायक नायिका यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान केलेले असतात. हे कपडे पाहून आपल्याला खूपच आकर्षण वाटत असते. आपण देखील अशाच प्रकारचे कपडे विकत घ्यावे अशाच प्रकारचे कपडे परिधान करावेत असे वाटते. फॅशन डिझायनिंग म्हणजे फक्त कपडेच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही फॅशन डिझायनर म्हणून काम करू शकतात यासाठी इंटरियर आर्किटेक्चर या सगळ्या क्षेत्रांमध्ये फॅशन डिझायनर ची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणूनच या स्पर्धात्मक जगात स्वतःला कलात्मक दृष्टीने पाहण्याकरिता व अनेकांना देखील कलात्मक दृष्टी मिळावी यासाठी तुम्ही देखील फॅशन डिझाइनर हा अभ्यासक्रम सहज करू शकता.
फॅशन डिझायनिंग म्हणजे नेमके काय?
जर तुम्हाला फॅशन डिझाईनर बनायचे असेल तर त्यापूर्वी फॅशन डिझायनिंग म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की, सध्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचे फॅशन फॉलो करत असतात, अशावेळी नागरिकांना व आपल्या टार्गेट ऑडियन्सला नेमके काय हवे आहे याचा विचार करून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने कलात्मक दृष्टीने काही डिझाईनिंग तयार करावे लागतात मग या डिझाईनिंग ड्रेस बद्दल असतात काही डिझाईनिंग तुमच्या शूज बद्दल असतात तर अनेकदा या डिझाईनिंग कार मॉडेलिंग यांच्या बद्दल देखील असतात आणि म्हणूनच जर तुमच्या अंगामध्ये कला असेल आणि तुम्हाला चित्रकला जास्त आवडत असेल तर तुम्ही देखील फॅशन डिझायनिंग मध्ये करिअर करू शकतात.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यात कोणत्याही गोष्टीची डिझाईनिंग करणे म्हणजेच फॅशन डिझायनिंग होईल. जेव्हा एखादी कलाकृती सत्यामध्ये येत असते तेव्हा कलाकार स्वतःच्या अंगी असणाऱ्या कलेच्या माध्यमातून काही गोष्टी कॅनवास वर पेन्सिल व चित्राच्या सहाय्याने रेखाटत असतो आणि कलात्मक दुसऱ्याने सुंदर पद्धतीने आपल्यासमोर सादर देखील करत असतो यालाच डिझाईनिंग असे म्हणतात. डिझाईनिंग हे ज्वेलरी शूज, कपडे, होम इंटेरियर, डेकोरेशन, इंजिनिअरिंग, ग्राफ या सर्व क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने केले जाते.
पात्रता
फॅशन डिझाईनिंग हा असा एक अभ्यासक्रम आहे ज्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याला प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे. जर तुम्ही दहावी बारावी किंवा ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असाल तर या अभ्यासक्रमासाठी तुम्ही पात्र ठरू शकतात तसेच आपल्या आजूबाजूला अशा अनेक फॅशन इंडस्ट्री मधील अकॅडमी असतात, जे तुम्हाला फॅशन डिझायनिंग चे कोर्स शिकवत असतात. प्रत्येक संस्थेच्या माध्यमातून अभ्यासक्रम देखील वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन केला जातो, त्याकरिता तुम्हाला संस्था आणि त्यांची पात्रता आधी तपासणे गरजेचे आहे.
अर्ज
फॅशन डिझायनिंग या अभ्यासक्रमासाठी जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर अनेक शासकीय संस्था देखील सध्या फॅशन डिझाईनिंग हा कोर्स राबवत आहेत त्याचबरोबर हा सेल्फ प्रोफेशनल कोर्स असल्या कारणामुळे अनेक प्रोफेशनल संस्था देखील हा कोर्स मोठ्या प्रमाणावर चालवत आहेत यामध्ये लेकमी, पेंटालून, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा अकॅडमी यासारखे अनेक चित्रपट विश्वामध्ये अग्रेसर असणारे फॅशन डिझायनर यांच्या स्वतःच्या काही इन्स्टिट्यूट आहेत. जे उमेदवारांची निवड करण्याकरिता आधी काही प्रवेश परीक्षा घेतात. ही प्रवेश परीक्षा जर तुम्ही उत्तीर्ण झाल्या तर त्या संस्थेमध्ये तुम्हाला प्रवेश मिळतो.
फी
हा अभ्यासक्रम निवडत असताना आपण नेमक्या कोणत्या संस्थेमध्ये प्रवेश घेत आहोत आणि तेथील अभ्यासक्रम किती महिन्याचा आहे यावरून फी आकारली जाते. जर तुम्ही नामांकित फॅशन डिझायनर यांच्या संस्थेद्वारे जर अभ्यासक्रम शिकत असाल तर त्याची फी देखील जास्त असते सर्वसाधारणपणे 50000 पासून ते पाच लाखापर्यंत अनेक नामांकित अकॅडमी विद्यार्थ्यांकडून पैसे म्हणजेच फी आकारात असतात. जर तुम्ही शासकीय संस्थेमधून फॅशन डिझाइनिंग चा कोर्स करत असाल तर दहा हजारापासून कोर्स ची सुरुवात होते. या सर्व नामांकित संस्था विद्यार्थ्यांना फॅशन डिझायनिंग चे शिक्षण पुरविल्यानंतर सर्टिफिकेट देतात
सर्टिफिकेट कोर्स
या सर्टिफिकेटच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करण्यात करू शकता किंवा तुम्ही बनवलेल्या डिझाईनच्या माध्यमातून सेलिब्रिटी यांच्याकरिता वेगवेगळ्या ट्रेनचे कपडे देखील शिवू शकतात. तुम्हा सर्वांना माहिती आहे सध्या सेलिब्रिटी वेगवेगळ्या फंक्शनमध्ये फॅशन डिझाइनिंग करून फॅशन डिझायनर यांनी शिवलेले कपडे मोठ्या प्रमाणावर परिधान करत असतात. म्हणून सध्या फॅशन डिझायनर यांना मार्केटमध्ये मोठी डिमांड आहे.
भविष्यकालीन संधी
फॅशन डिझाईन चा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केल्यानंतर भविष्यात तुम्हाला वेगवेगळ्या संधी लाभतात. तुम्ही स्वतःचा बिझनेस सेटअप देखील करू शकता तसेच काही फॅशन डिझायनर यांच्या हाताखाली व त्यांच्या अकॅडमीमध्ये काम करून वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनिंग देखील करू शकतात, त्याचबरोबर हल्ली फॅशन डिझायनिंग क्षेत्राला स्कोप असल्याने ज्वेलरी इंजीनियरिंग होम डेकोरेटर होम डिझाईनिंग या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर फॅशन डिझायनर यांना मागणी आहे. या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना पगार देखील चांगला दिला जातो 50000 पासून ते चार लाख इतका पगार दिला जातो. तुमच्या अंगी असणाऱ्या गुण कौशल्य व अनुभव यामुळे देखील उमेदवारांना पगार दिला जातो.
जर तुम्हाला स्वतःचा बिजनेस सेटअप करायचा असेल तर अशावेळी तुम्ही फॅशन डिझाईनिंग फॅशन लेबल स्वतःच्या कोर्स व अकॅडमीची मार्केटिंग डिझाईनिंग करू शकतात.
तुम्ही तुमच्या अंगी असणाऱ्या गुन्हा कौशल्य यांच्यानुसार मूर्ती कपड्यांचे रंग तसेच हवे असलेले वेगवेगळे टूल्स वापरून डिझाईनिंग करू शकतात.
हल्ली सोशल मीडियाच्या जमाना असल्यामुळे तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक youtube च्या माध्यमातून वेगवेगळ्या कलाकृती सादर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमची कला पोहोचू शकता यातून दरे देखील तुम्हाला चांगले पैसे कमवू शकतात. अनेक सेलिब्रिटी व फॅशन डिझायनर सध्या त्यांनी स्वतः बनवलेले कपडे, शूज यांचे डिझाईन सोशल मीडियावर अपलोड करून मोठ्या प्रमाणावर त्याचे मार्केटिंग करून त्याद्वारे पैसे कमवतात.
इंटर्नशिप
फॅशन डिझाइनिंग हा कोर्स पूर्ण केल्यानंतर अनेकदा उमेदवारांना तीन ते सहा महिन्याची इंटर्नशिप करावी लागते. या इंटर्नशिप काळामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कलाकृती स्वतःहून सादर करावे लागतात त्यांनी केलेले स्केचेस डिझाईनिंग यांचे प्रदर्शन देखील होत असते म्हणूनच अनेक होतकरू उतरून स्वतःच्या अंगी असणाऱ्या कला या इंटर्नशिपच्या माध्यमातून सादर करत असतात त्याचबरोबर फाईन आर्ट या कलेच्या माध्यमातून फॅशन डिझाईनिंग लोकांपर्यंत पोहोचवली जाते. अनेक ठिकाणी तरुणांनी बनवलेल्या डिझाईन यांचे एक्झिबिशन भरवले जाते आणि अनेक कलाकृती विक्रीसाठी देखील ठेवल्या जातात. उमेदवारांनी इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर त्यांना इंटर्नशिप सर्टिफिकेट देखील दिले जाते तसेच संस्थेमध्ये मिळालेल्या अनुभवा द्वारे दुसऱ्या संस्थेमध्ये काम करण्याची संधी देखील मिळत असते.
फॅशन डिझाईनिंग अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये डिझायनर म्हणून काम करू शकतात ते क्षेत्र पुढील प्रमाणे आहेत.
फॅशन डिझायनर :
फॅशन डिझायनर या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना खूप सार्या संधी उपलब्ध असतात तसेच या व्यक्ती वेगवेगळ्या ब्रँड सोबत भागीदारी करून स्वतःचे तसेच उत्पादनाचे लेबल बनवण्याचे कार्य तसेच प्रोडक्ट डिझायनिंग करण्याचे कार्य करत असतात आणि म्हणूनच फॅशन डिझायनर वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनिंग वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँड्स यांना बनवून त्यांच्या प्रमोशन साठी मदत करतात.
कोचश्युम डिझायनर
क्वेश्चन डिझायनर या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना वेगवेगळ्या सेलिब्रिटीसाठी कपडे डिझाईन करावे लागतात. सेलिब्रेटी यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून त्यांच्या शारीरिक दृष्टिकोनाचा विचार करून रंगसंगती लक्षात घेऊन कपडे डिझाईन करावे लागतात आणि कोचश्युम डिझायनर यांनी डिझाईन केलेले कपडे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर पसंती देखील केली जाते सर्वसामान्य लोक देखील हे कपडे विकत घेतात.
शूज डिझाइनर :
आपल्या सर्वांना माहितीच आहे की, सध्या फॅशनच्या जमाना असल्याने प्रत्येक जण वेगवेगळ्या कपड्यांवर मॅचिंग असे शूज देखील परिधान करत असतात म्हणून शूज डिझाईनर जेंट्स किंवा फीमेल यांच्या गरजेनुसार शूज डिझाईन करत असतात. यांनी डिझाईन केलेले शूज सँडल्स हाय हिल्स या सर्वांचा मोठ्या प्रमाणावर विचार केला जातो.
इंटेरियर डिजाइनर
नवीन घर घेतल्यानंतर आपले घर सुशोभित करण्याकरता अनेक जण इंटेरियर डिझायनर यांची मदत घेत असतात स्वतःच्या कल्पना व आयडियाच्या माध्यमातून आपले घर सुशोभित करतात आणि म्हणून इंटेरियर डिझाईनर यांचे मागणी देखील मोठ्या प्रमाणावर असते.
फॅशन इलस्ट्रेटर
फॅशन इलेस्ट्रेटर या पदावर काम करणारे व्यक्ती स्वतःने तयार केलेली डिझाईन मग ते कॉम्प्युटरच्या आधारे असू देखील स्वतःच्या हाताने रेखाटलेले डिझाईन असू दे यांना देखील फॅशन डिझाईनर मोठ्या प्रमाणावर सुशोभित करून त्यांचे एक्झिबिशन करत असतात.
फॅशन कॉर्डिनेटर
फॅशन डिझायनिंग करत असताना आपल्याला फॅशन कॉर्डिनेटर म्हणून देखील काम करावे लागतात, अशा वेळी जर तुम्ही तुमचे फॅशन लोकांसमोर सादर करत असाल किंवा सेलिब्रिटीच्या माध्यमातून फॅशन वॉक करणार असाल तर फॅशन कॉर्डिनेटर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. वेगवेगळे मॉडेल नेमके कोणकोणते फॅशन डिझायनिंग केलेले कपडे वर करणार आहेत याची काळजी करण्याचे कार्य व कॉर्डिनेशन करण्याचे कार्य फॅशन कॉर्डिनेटर करतात.
हे पण वाचा आयटीआय पदवी म्हणजे काय?