Is BA a Good Career Option?|बॅचलर ऑफ आर्टस् बद्दल माहिती

‘बॅचलर ऑफ आर्ट्स’ म्हणजे काय?

मित्रांनो आज आपण बॅचलर ऑफ आर्ट म्हणजेच बीए बद्दल जाणून घेणार आहोत. दहावी आणि बारावीनंतर भविष्यात आपल्याला काय करायचं आहे याचा विचार आपण आधीपासूनच करत असतो. अनेक जण नववीपासूनच दहावीच्या पुढे काय करायचं किंवा दहावीनंतर बारावीला काय करायचे याबद्दल संशोधन करायला सुरुवात करतात परंतु आपल्याकडे आजही विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या गुण कौशल्यांकडे दुर्लक्ष करून फक्त स्पर्धा याचा विचार केला जातो. या स्पर्धेमध्ये आपला मुलगा कसा टिकेल याबाबत देखील विचार करत असतात परंतु असं करणं अत्यंत चुकीचे आहे.

जर तुम्ही तुमच्या मुलाच्या अंगी असणाऱ्या गुणांची पारख योग्य वेळेत केली नाही तर भविष्यात त्याचे करिअर खराब होऊ शकते. आज आपण अशा एका शाखेबद्दल जाणून घेणार आहोत. ही शाखा अत्यंत महत्त्वाची आहे परंतु अनेकदा दुर्लक्षित म्हणून या शाखेकडे पाहिले जाते. कमी मार्क मिळाले म्हणून या शाखेत ऍडमिशन घेतले जाते, असे देखील अनेकदा म्हटले जाते. परंतु हे अत्यंत चुकीचे आहे. या स्पर्धात्मक जगामध्ये सध्याच्या काळात या शाखेला खूपच मागणी आहे, चला तर मग जाणून घेऊया ही शाखा नेमकी कोणती आहे त्याबद्दल..

आर्ट्स म्हटलं तर आपल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात परंतु असं करणे अत्यंत चुकीचे आहे. आर्ट म्हणजे कला. आर्ट हे असे विस्तारित क्षेत्र आहे. या क्षेत्रात जर विद्यार्थ्यांनी प्रवेश केला तर स्वतःचे भवितव्य उज्वल होऊ शकते. दहावीनंतर अनेक पालक मुलाला कमी मार्क मिळाले तसेच मुलगा अभ्यासात हुशार नसेल तर आर्टमध्ये ऍडमिशन घेऊन देतात आर्ट्सला पूर्वी दुर्लक्षित म्हणून पाहिले जायचे. आता सर्वात जास्त संधी कला या शाखेमध्ये विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आलेले आहेत, म्हणूनच जर तुम्हाला देखील आर्ट्सच्या क्षेत्रात करिअर करायचे आहे तर आजच्या या लेखांमध्ये आपण आर्ट्स मध्ये भविष्यात आपण नेमके काय काय करू शकतो याबद्दल जाणून घेणार आहोत.

पात्रता : 

दहावीला उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी अकरावी बारावी कला या शाखेमध्ये प्रवेश घेऊ शकतो तसेच या शाखेमध्ये प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्याला कमीत कमी 40 टक्के गुण आवश्यक असतात, त्याचबरोबर दहावीनंतर अकरावी बारावी मध्ये कला शाखेत शिकत असताना विद्यार्थ्यांना इतिहास भूगोल, नागरिकशास्त्र, हिंदी, मराठी, मानसशास्त्र, साहित्यशास्त्र यासारख्या विषयांचा अभ्यास करावा लागतो. 

जर विद्यार्थ्याला बारावीनंतर पुढे भविष्यात आर्ट्समध्ये पदवी मिळवायची असेल तर विद्यार्थ्याला कमीत कमी 40% मिळवणे गरजेचे आहे, असे केल्यावर विद्यार्थी सहज बीए पदवी मिळवू शकतो. त्याचबरोबर बारावी ही अधिकृत मंडळाद्वारे उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्याला बारावीनंतर बीए पदवी मिळवायची असेल तर तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. तीन वर्षाच्या अभ्यासक्रमांमध्ये अनेकदा वेगवेगळ्या विद्यापीठाच्या तसेच महाविद्यालयाच्या अभ्यास संरचनेनुसार परीक्षा देखील घेतल्या जातात. काही ठिकाणी वार्षिक अभ्यासक्रम असतो तर काही ठिकाणी सेमिस्टर पॅटर्न नुसार परीक्षा घेतल्या जातात.

आर्ट्स मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर भविष्यात विद्यार्थ्यांसाठी अनेक सुवर्णसंधी उपलब्ध होत असत परंतु अनेक विद्यार्थ्यांना आर्ट शाखेबद्दल जागरूकता नसते म्हणूनच आर्ट शाखा निवडल्यानंतर नेमके काय करायचे हे देखील माहिती नसते.

फी

जर विद्यार्थ्यांना दहावीनंतर पुढील दोन वर्ष कला शाखेत प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थ्यांना फी देखील त्या पद्धतीने आकारली जाते. अनेक महाविद्यालय व विद्यापीठ यांच्या माध्यमातून कमीत कमी 2000 ते 10000 पर्यंत विद्यार्थ्यांची फी असते तसेच विद्यार्थी पदवीचे शिक्षण पूर्ण करणार असेल तर विद्यार्थ्यांना 5000 ते 15000 पर्यंत पैसे मोजावे लागतात. बहुतेक वेळा विद्यार्थ्यांची फी ही विद्यार्थ्यांना पुरविले जाणाऱ्या सुविधा यांच्यावर अवलंबून असते आणि म्हणूनच तुम्ही देखील बीए अभ्यासक्रमात साठी प्रयत्न करत असाल तर फी संरचना अवश्य पहा.

विषय : 

बीए अभ्यासक्रमामध्ये अनेकदा पारंपारिक विषयांचा समावेश केला जातो. या विषयांच्या माध्यमातून विद्यार्थी सहजरित्या आपले पदवीधर शिक्षण पूर्ण करू शकतात. या शाखेमध्ये विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, राज्यशास्त्र ,अर्थशास्त्र, मानसशास्त्र यासारख्या अभ्यासक्रमांचा आराखडा दिला जातो. या विषयांच्या आधारे विद्यार्थी स्वतःचे भवितव्य सुधारू शकता.

तीन वर्ष बीए अभ्यासक्रम शिकत असताना विद्यार्थ्यांना स्पेशलायझेशन देखील करता येतात. स्पेशलायझेशनचे विषय देखील वर सांगितल्याप्रमाणेच प्रामुख्याने असतात.

बीए इन हिस्टरी : जर तुम्हाला इतिहास आवडत असेल. इतिहास अभ्यास करायला तसेच भविष्यात इतिहास मध्ये करिअर करायचे असेल तर तुम्हाला बी ए एन हिस्टरी हे स्पेशलिझेशन उपयुक्त ठरू शकते. या स्पेशलायझेशनमध्ये विद्यार्थ्यांना इतिहास प्रामुख्याने शिकवला जातो. भारतीय इतिहास, पूर्व इतिहास, उत्तर इतिहास तसेच वेगवेगळे राज्यांचा इतिहास शिकविला जातो त्यानुसार विद्यार्थ्यांची परीक्षा देखील घेतली जाते.

बीए इकॉनॉमिक : अनेकांना अर्थशास्त्र मध्ये आपले करिअर करायचे असते अशावेळी बीए इकॉनोमिक ही स्पेशलायझेशन उपयुक्त ठरते. अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना अर्थशास्त्राचे विविध पैलू, महत्त्व, वेगवेगळ्या थियरी विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात.

बीए सायकॉलॉजी : हल्ली खूप कमी लोक सायकॉलॉजी म्हणजेच मानसशास्त्राबद्दल चर्चा करत असतात परंतु मानसशास्त्र हल्ली महत्त्वाचा विषय बनलेला आहे. प्रत्येकामध्ये जगत असताना मानसशास्त्राचे आरोग्य उत्तम राहावे याकरिता काही प्रयत्न करताना दिसत नाही, अशावेळी जर तुम्ही मानसशास्त्राचा अभ्यासक म्हणून भविष्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बीए सायकॉलॉजी हे स्पेसिलायझेशन उत्तम ठरू शकते. या सायकॉलॉजी मध्ये तुम्हाला तीन वर्ष मानसशास्त्राच्या विविध शाखा अभ्यासक्रम व्यवसाय संदर्भातील संधी इत्यादी गोष्टींचे ज्ञान दिले जाते.

बीए हिंदी : पारंपरिक पद्धतीने अभ्यास करत असताना तुम्हाला हिंदी देखील विषय निवडता येतो. हिंदी विषय निवडल्यानंतर विद्यार्थ्यांना हिंदी साहित्य संरचना संशोधन साहित्य आणि कला या संदर्भात माहिती दिली जाते.

बीए मराठी : बीए इन मराठी मध्ये आपल्याला मराठी शास्त्राबद्दल शिकवले जाते. यामध्ये मराठी साहित्य, लोककला, दलित साहित्य, लोकसाहित्य बद्दल शिक्षण दिले जाते. ज्या मुलांना बीए मराठी करायचा आहे त्यांना वर्षाच्या शेवटी साहित्यप्रकार निवडायचा असतो. लोकसाहित्य व दलित साहित्य यांच्या मदतीने विद्यार्थी स्वतःचे स्पेशलायझेशन देखील करू शकता.

बीए : प्लेन बीए हा अभ्यासक्रम देखील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतो हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम असून या वर्षात विद्यार्थ्यांना सर्व विषयांचा अभ्यास शिकवला जातो. साहित्य इंग्रजी, मराठी, हिंदी, इतिहास इत्यादी विषय प्रामुख्याने अभ्यासासाठी असतात.

बीए लिटरेचर : अनेक विद्यार्थ्यांना साहित्य लिखाणाची व वाचनाची आवड असते, असे विद्यार्थी प्रामुख्याने साहित्य क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी उत्सुक असतात अशा विद्यार्थ्यांसाठी बीए इन लिटरेचर हे स्पेशल अत्यंत महत्त्वाचे ठरते. या स्पेशलिझेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साहित्याचे विविध प्रकार अभ्यासाच्या माध्यमातून शिकविले जातात. कादंबरी, कथा, नाटक, लोककला, या सर्वांचा समावेश बीए इन लिटरेचर मध्ये असतो.

बीए इंग्लिश : हल्ली इंग्रजीला देखील मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आणि म्हणूनच अनेक विद्यार्थी बीए इन इंग्लिश हे स्पेशल निवडतात. या स्पेशल च्या माध्यमातून इंग्रजी साहित्यप्रकार यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना शिकविला जातो तसेच हे स्पेशल निवडल्यानंतर विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक क्षेत्रात सुवर्णसंधी देखील असते.

बीए एज्युकेशन : बीए इन एज्युकेशन हे स्पेशलायझेशन देखील विद्यार्थ्यांसाठी अनेकदा उपलब्ध असते. हा सुद्धा बीए अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण शास्त्र शिक्षण शास्त्र संबंधित महत्त्वाच्या गोष्टी शिक्षकांच्या अंगी असणारे गुण कौशल्य याकरिता उपयुक्त असणारे घटक या सर्वांचा अभ्यास केला जातो म्हणूनच अनेक जण बीए अभ्यासक्रम करत असताना बीए एज्युकेशन देखील पूर्ण करतात व त्यानंतर एम ए इन एज्युकेशन देखील पूर्ण करतात.

ज्या विद्यार्थ्यांनी बीए पूर्ण केलेले आहे असे विद्यार्थी भविष्यात जे स्पेशल निवडलेले आहे त्या स्पेशल च्या माध्यमातून एम ए शिक्षण देखील पूर्ण करू शकतात त्याचबरोबर विद्यार्थी दोन वर्ष एम ए चे शिक्षण घेतल्यानंतर त्यांना भविष्यात चांगल्या पगाराची नोकरी देखील लागते.

बीए केल्यानंतर भविष्यकालीन संधी 

बीए हा एक अभ्यासक्रम पारंपारिक जरी असला तरी सध्याच्या काळात अनेक संस्थांमध्ये बीए हा अभ्यासक्रम प्रामुख्याने चालविला जातो. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात तसेच गरीब विद्यार्थ्यांना देखील शिक्षणाचे द्वार खुले व्हावे या अनुषंगाने शासनाने देखील बीए या अभ्यासक्रमामध्ये महत्त्वाचे बदल केलेले आहेत तसेच सध्याच्या काळात असणाऱ्या घडामोडी या सर्वांचा समावेश बीए अभ्यासक्रमामध्ये देखील केलेले आहे आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना अपडेट शिक्षण मिळावे यासाठी सरकार देखील प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांनी बीए पदवी मिळवल्यानंतर पुढील दोन वर्ष विद्यार्थी एमए करू शकतात व त्यानंतर विद्यार्थ्यांना जर हवे असल्यास पीएचडीचे शिक्षण देखील पूर्ण करता येते. विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या विषयानुसार भविष्यकालीन शिक्षण पूर्ण करू शकतात.

बीए चा अभ्यासक्रम निवडत असताना व्यवसायिक दृष्ट्या देखील काही अभ्यासक्रमाची मांडणी करण्यात आलेली आहे.

बीए इन आर्ट्स मल्टिमीडिया मास कम्युनिकेशन हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम प्रामुख्याने माध्यमांशी निगडित आहे. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना जनसंपर्क व जाहिराती तसेच पत्रकारिता या विषयाचे ज्ञान दिले जाते. भविष्यात विद्यार्थ्यांसाठी लिखाणाचे क्षेत्र पत्रकारितेचे क्षेत्र, जाहिरातीचे क्षेत्र, जनसंपर्काचे क्षेत्र, व्हिडिओ एडिटिंग, फोटोग्राफी यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्राचे लाभ घेता यावे याकरिता विद्यापीठांमध्ये बीए इन मल्टीमीडिया मास कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम प्रामुख्याने सुरू करण्यात आलेला आहे. हा अभ्यासक्रम तीन वर्षाचा असून सेमिस्टर पॅटर्न नुसार विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातात. या अभ्यासक्रमामध्ये जे विषय असतात ते संपूर्णपणे माध्यमांशी निगडित असतात आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना असाइनमेंट देखील त्याच पद्धतीने दिले जातात. पारंपारिक पद्धतीने ज्ञान घेत असताना विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ज्ञान मिळावे त्याकरिता विद्यार्थ्यांना फिल्ड व्हिजिट सर्वेक्षण, मुलाखती यासारख्या असाइनमेंट दिल्या जातात.

हे पण वाचा:- B.com हा सोपा कोर्स आहे का?