CS course information in marathi: तुम्हा सर्वांना माहीतच आहे की, सध्या मोठ्या प्रमाणावर विकास होत चालला आहे. शिक्षण क्षेत्र दिवसेंदिवस प्रगती करत आहेत. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आणि व्यावसायिक प्रगतीसाठी अनेक नवीन अभ्यासक्रम सुरू होत आहेत म्हणूनच विद्यार्थी शिकत असताना विद्यार्थ्यांचे अंगी उद्योजक तयार होण्याची क्षमता निर्माण व्हावी याकरिता अनेक विद्यापीठ व महाविद्यालय अशा काही अभ्यासाची संरचना तयार करतात, ज्यामुळे पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात.
एक काळ असा होता की, विद्यार्थ्यांकडे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या तीन शाखाच उपलब्ध होत्या परंतु आता औद्योगीकरणानंतर व जागतिकीकरणानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या शाखेमध्ये देखील विविध असे नवीन अभ्यासक्रम तयार केले गेले आहेत ज्यामुळे विद्यार्थी स्वतः आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देऊ शकतो. याच कलागुणांना शिक्षणाची जोड मिळाल्यामुळे विद्यार्थी व्यावसायिक क्षेत्रामध्ये देखील स्वतःला सक्षम बनवू शकतात.
औद्योगीकरण आणि जागतिकीकरणामुळे आपल्याला सार्वजनिक क्षेत्रात अनेक कंपन्यांचा विस्तार होताना तर दिसत आहे पण त्याचबरोबर खाजगी कंपन्या देखील नव्याने सुरू होत आहेत, अशा वेळी तज्ञ व कुशल मनुष्यबळाची गरज आहे. हे मनुष्यबळ पुरवण्याची क्षमता व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये आहे म्हणूनच आज आपण अशा एका अभ्यासक्रमाची माहिती जाणून घेणार आहोत. तो अभ्यासक्रम तुम्हाला भविष्यात उज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी मदत करणार आहेत त्या अभ्यासक्रमाचे नाव आहे ” कंपनी सेक्रेटरी” .
कंपनी सेक्रेटरी हा असा एक अभ्यासक्रमा आहे, जो अनेक विद्यार्थी करण्यासाठी उत्सुक असतात. हे पद व हा मुद्दा मिळवल्यानंतर उमेदवाराला अनेक खाजगी संस्थांमध्ये व सार्वजनिक संस्थांमध्ये अधिकाऱ्यांच्या सोबत त्यांचे खाजगी सहकारी म्हणून काम करता येते.
या अभ्यासक्रमाची आखणी करताना अनेक मुद्दे विचारात घेण्यात आलेले आहेत तसेच हा अभ्यास टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतो. सुरुवातीला जो टप्पा असतो त्याला फाउंडेशन कोर्स असे म्हणतात, त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रोग्राम कोर्स पूर्ण करावा लागतो. यानंतर प्रोफेशनल म्हणजेच व्यवसायिक टप्पा . हा टप्पा विद्यार्थ्यांना पूर्ण करावा लागतो हा शेवटचा टप्पा आहे अशा प्रकारे तीन टप्प्यांमध्ये हा अभ्यासक्रम आखलेला असतो.
अनेक महाविद्यालय आणि विद्यापीठ हा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने पूर्ण करून त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग आयोजित करत असतात. एकदा का विद्यार्थ्यांनी ट्रेनिंग पूर्ण केली तर विद्यार्थ्यांना वेगवेगळे वर्कशॉप यांच्यामध्ये कार्य करावे लागते आणि त्यानुसारच विद्यार्थ्यांचे मूल्यांकन देखील केले जाते.
हा अभ्यासक्रम प्रामुख्याने संयुक्त भारत कॉर्पोरेट यांच्या अध्यक्षतेखाली त्याची रचना केली गेली आहेत तसेच इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया यांच्या मदतीने राबविला जातो.
पात्रता :
कंपनी सेक्रेटरी हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी संस्थेने काही मर्यादा व पात्रता देखील आखलेले आहेत. या पात्रता पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो.
हा अभ्यासक्रम करण्यासाठी विद्यार्थ्याला बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याशिवाय विद्यार्थी जर पदवीधर असेल तर तो देखील सीएस या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो.
हा अभ्यासक्रम निवडत असताना विद्यार्थी कोणत्याही शाखेतील असला तरी चालेल. जसे की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थी सी एस या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो.
जे विद्यार्थी इयत्ता बारावी नंतर सीएस अभ्यासक्रमासाठी अर्ज करतात त्यांना सुरुवातीपासूनचे तीन टप्पे यांचा अभ्यास करावा लागतो.
या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना सर्व शाखेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात फक्त जे विद्यार्थी फाईन आर्ट्स व कला तस्य यासारख्या क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली आहेत त्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येत नाही.
ज्या पदवीधर विद्यार्थ्यांना सीएस अभ्यासक्रमासाठी अर्ज करायचा आहे अशा विद्यार्थ्यांना फाउंडेशन कोर्स चा टप्पा पूर्ण करावा लागत नाही. थेट दुसऱ्या टप्प्यासाठी त्यांना तयार राहावे लागते म्हणजेच हा अभ्यासक्रम एकंदरीत तीन टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. जर विद्यार्थी पदवीधर असेल तर त्याला थेट दुसऱ्या टप्प्या करिता प्रवेश दिला जातो पहिला टप्पा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही.
प्रवेश प्रक्रिया :
हा अभ्यासक्रम जरी गुंतागुंतीचा असला तरी या अभ्यासक्रमाबद्दल अनेकदा विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता नसते आणि म्हणूनच ही परीक्षा उत्तीर्ण करणे अत्यंत अडचणीचे होऊन बसते. जर तुमच्या बाबतीत देखील असेच काही होत असेल तर सर्वात आधी प्रवेश प्रक्रिया समजून घ्या, त्यानंतर तुम्ही सहजच कंपनी सेक्रेटरीची पदवी सहजच प्राप्त करू शकता.
जसे की आपणास माहिती आहे की हा अभ्यासक्रम वेगवेगळ्या संस्थांनी व मंत्रालय यांच्या सहाय्याने तीन टप्प्यांमध्ये संरचित केलेला आहे या तीन टप्प्याच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागतो.
फाउंडेशन कोर्स : हा सीएस अभ्यासक्रमाचा पहिला टप्पा आहे या टप्प्याच्या माध्यमातून तुम्ही अभ्यासक्रमाच्या संबंधित ज्या काही पायाभूत गोष्टी असतात त्या समजून घेऊ शकतात तसेच जर विद्यार्थ्याला मार्च महिन्यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्याची परीक्षा डिसेंबर महिन्यात द्यावी लागते. सीएस या अभ्यासाकर्मासाठी दिली जाणारी परीक्षा वर्षभरातून दोन वेळा घेतली जाते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार परीक्षा देऊन परीक्षेत चांगले मार्क मिळवून सीएस अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकता.
एक्झिक्यूटिव्ह प्रोग्रॅम : हा सीएस अभ्यासक्रमाचा द्वितीय टप्पा आहे. या टप्प्यांमध्ये विविध चाप्टर व मॉडेल तयार करण्यात आलेले आहेत. यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिकविले जाते. वर्षभरातून दोन वेळा परीक्षा नियोजित असून त्या त्या पद्धतीने प्रवेश निश्चित करावा लागतो. या संदर्भातील माहिती तुम्ही विद्यापीठ व महाविद्यालय यांच्याकडून प्राप्त करू शकता कारण की प्रवेश परीक्षा व परीक्षा यांच्यामध्ये अनेकदा बदल होण्याची शक्यता असते.
प्रोफेशनल प्रोग्राम : हा टप्पा सी एस अभ्यासक्रमाचा शेवटचा टप्पा आहे. या अभ्यासक्रमामध्ये देखील विद्यार्थ्यांकरीता वेगवेगळ्या महिन्यानुसार परीक्षेचे व प्रवेश परीक्षेचे नियोजन केले जाते. या दोन्ही वेळापत्रकाच्या मदतीने विद्यार्थी प्रोफेशनल प्रोग्रामच्या परीक्षा देऊ शकतात.
सी एस अभ्यासक्रम विषय :
या अभ्यासक्रमामध्ये तीन टप्प्यानुसार विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करावा लागतो त्यातील पहिला टप्पा म्हणजे फाउंडेशन कोर्स त्याचे विषय पुढीलप्रमाणे आहेत.
- business environment and laws
- businesses management
- ethics and entrepreneurship
- business economics
- fundamentals of accounting and auditing
एक्झिक्यूटिव्ह प्रोग्रॅम :
मॉड्यूल – १ (४ पेपर)
- jurisdiction, interpretation and general law
- company law
- settings of business entities and closure tax law
- settings up of business entities
module 2 ( 4 th pepar)
- corporate and management accounting
- securities and law capital markets
- economic, business and commercial law
- financial and strategic management
प्रोफेशनल प्रोग्राम
module 1
- governance, risk management, compilence and ethics
- advance tax law
- drafting, pleading and apirancs
module -2
- secretary audit
- corporate restructuring
- resolution of corporate dispute
module – 3
- corporate funding and listing in stock exchange
- multidisciplinary case studies
विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमामध्ये काही विषय पर्याय म्हणून निवडायचे असतात. हे ऐच्छिक विषय असतात विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार विषय निवडू शकतात.
- insurance law and practice
- forensics audit
- banking law and practices
- interactual property rights
- law and practice valuation and business modeling
- labour law and practices
या तीन टप्प्यानुसार समाविष्ट असलेल्या विषयांचा अभ्यास करून विद्यार्थी सी एस अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात त्याचबरोबर हे सगळे विषय विद्यार्थ्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असल्याने भविष्यात त्यांना व्यवसायिक दृष्टिकोनातून देखील उपयोग होतो. या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञानदेखील दिले जाते कायदे आणि व्यवसाय यांची सांगड या अभ्यासाकरणातून करण्यात आलेली आहे.
कोर्स कालावधी :
तसे पाहायला गेले तर हा संपूर्णपणे व्यावसायिक अभ्यासक्रम असल्याने प्रत्येक टप्प्यानुसार एक वर्ष याप्रमाणे तीन वर्षांमध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण होतो. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन वर्ष सातत्याने मेहनत करावी लागते आणि मेहनत केल्यानंतर विद्यार्थ्याला सी एस म्हणजेच कंपनी सेक्रेटरी ही पदवी प्राप्त होते.
भविष्यकालीन संधी :
सी एस अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना भविष्यात वेगवेगळ्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्य करण्याची सुवर्णसंधी प्राप्त होते त्याचबरोबर अधिकाऱ्यांसोबत काम करत असताना संस्थेचे खासगी पद देखील भूषवावे लागते. कंपनी सेक्रेटरी पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांना सध्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे
कायदेशीर सल्लागार, व्यवसायिक नियोजक, प्रशासकीय सहाय्यक, प्रशासकीय सेक्रेटरी म्हणजेच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्रेटरी, कंपनी रजिस्टोर, कॉर्पोरेट पॉलिसी मेकर, कंपनी सेक्रेटरी असिस्टंट बोर्ड ऑफ डायरेक्टर यासारख्या महत्त्वाच्या पदांवर कार्य करण्याची सुवर्ण संधी मिळते म्हणूनच भविष्यात सी एस या अभ्यासक्रमाला तितकीच मागणी आहे.
फी :
हा एक व्यावसायिक अभ्यासक्रम असल्याने अनेकदा विद्यापीठ आणि संस्था ज्या सुविधा पुरवितात त्या सुविधेनुसार देखील विद्यार्थ्यांकडून फी आकारले जाते परंतु अनेकदा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडेल अशा प्रकारच्या फी ची देखील आखणी केली गेली आहे. शासकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कमी शुल्कामध्ये परीक्षा अर्ज करता येतो आणि तीन वर्षाचा अभ्यासक्रम देखील पूर्ण करता येतो त्याकरिता तुम्हाला वेगवेगळ्या संस्था आणि महाविद्यालय यांचे फी स्ट्रक्चर तपासणे आवश्यक आहे.
बारावीनंतर सीएस करू शकतो का ?
हो , अगदीच जर तुम्ही बारावी उत्तीर्ण झालेला असाल तर तुम्हाला सीएस या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येतो. हा प्रवेश घेत असताना विद्यार्थी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणत्याही शाखेतील असेल तरी कंपनी सेक्रेटरी मध्ये प्रवेश घेऊ शकतो.
विद्यार्थी अधिकृत मान्यता प्राप्त असलेल्या मंडळाकडून उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याला कमीत कमी 45 ते 50 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तीन वर्ष अभ्यास करून सी एस पदवी प्राप्त करता येते.