12वी नंतर CA कसे करायचे?

सीए कोर्से ची माहिती|CA information in marathi

CA information in marathi या लेखात बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्वसाधारणपणे अनेकांचा कल कॉमर्स या शाखेकडे प्रवेश घेण्याकरिता वळलेला असतो. परंतु कॉमर्स हा एक विशिष्ट प्रकारचा अभ्यासक्रम असला तरी सध्या या कॉमर्स शाखेमध्ये देखील अनेक कोर्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर बारावी कॉमर्स केल्यानंतर देखील तुम्ही भविष्यात अनेक व्यवसायिक म्हणजेच प्रोफेशनल कोर्स करू शकता, ज्यामुळे तुमचे भवितव्य उज्वल बनू शकते. जर तुम्हाला कॉमर्स मध्ये रस असेल तुम्हाला भविष्यात कॉमर्स क्षेत्रामध्ये स्वतःचे करिअर घडवायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला कॉमर्स क्षेत्राचा अभ्यास करता करता तुम्ही भविष्यात एका व्यवसायिक क्षेत्राचा अभ्यास करून स्वतःचे जीवन चांगले बनू शकतात. भविष्यात चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळू शकता. सर्वसाधारणपणे आपल्याकडे एक कल दिसून येतो की कमी मार्क मिळाले की अनेक जण कॉमर्समध्ये प्रवेश घेतात परंतु असे नाही. प्रत्येक शाखेचे स्वतःचे असे काही वैशिष्ट्य असते. ज्या वैशिष्ट्यांच्या आधारावर तुम्ही चांगले मार्क मिळू शकता तसेच जर तुमच्या अंगी मेहनत करण्याची जिद्द असेल तर तुम्ही स्वतःला सिद्ध देखील करू शकता म्हणूनच आज आपण कॉमर्स शाखा मधलाच एक महत्त्वाचा मानला जाणारा अभ्यासक्रम कोर्स बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

CA full form in marathi म्हणजेच आपल्या सर्वांनी सीए हे नाव ऐकलं असेल. सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट. हे एक पद आहे तसेच हे पद मिळवण्यासाठी आपल्याला सीएचा अभ्यास देखील करावा लागतो. सीए चा अभ्यास कसा करावा? त्यासाठी नेमकी काय पात्रता असते? बारावीनंतर आपण सीए करू शकतो का ? अशा विविध प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखांमधून जाणून घेणार आहोत.

बारावीनंतर व बारावीपर्यंत कॉमर्समध्ये अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात सीए बनवायचे असते. सीए बनत असताना ते लोक वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास देखील करत असतात. जर तुम्हाला कॉमर्स क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे आणि सीए बनायचं असेल तर तुम्ही भविष्यात डिग्रीचे शिक्षण पूर्ण करता करता सीए चा अभ्यास देखील करू शकता.
आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत, जे सीए चा अभ्यास करून दुसऱ्या कंपनीमध्ये काम न करता स्वतःची फ्रीलान्स कंपनी उघडतात आणि महिन्याला खूप सारे पैसे कमवतात. सीए हे पद असे आहे की जे तुम्हाला अकाउंट या क्षेत्रात महत्त्वाचे मानले जाते.

हल्ली मोठ्या प्रमाणावर सीए ना मागणी असते. सीए हे पद महत्त्वाचे आहे पण त्याचबरोबर त्याचा अभ्यासक्रम त्याचे शिक्षण देखील खूपच महत्त्वाचे मानले जाते. सीए हा अभ्यासक्रम खूपच कठीण मानला जातो. लवकर सीए ची परीक्षा क्रॅक करता येत नाही आणि म्हणूनच जे विद्यार्थी सीएच्या परीक्षेचा अभ्यास करत असतात त्यांना वेळेचे नियोजन देखील करावे लागते. हल्ली मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये सीएची मागणी वाढलेली आहे. सीए हे अनेक कंपन्यांना फायनान्शिअल गायडन्स म्हणजेच आर्थिक सल्ला गुंतवणूक, शेअर मार्केट, ऑडिटिंग, टॅक्स संदर्भातील माहिती कंपनीच्या विकासासाठी आवश्यक असणारे अनेक बाबी यांचे मार्गदर्शन करण्याचे कार्य सीए करत असतात म्हणूनच सीए कंपनीद्वारे चांगल्या आकड्यांची पगार देखील दिला जातो परंतु हा पगार जरी चांगला असला तरी त्यामागील मेहनत खूपच कठीण असते. ही परीक्षा पार करत अनेकांचे आयुष्य देखील निघून जाते.

CA ची परीक्षा कोण देऊ शकते?

सीए हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पात्रता देखील तितकेच महत्त्वाची असते परंतु जर तुम्ही दहावीनंतर कॉमर्स शाखा निवडली असेल आणि पुढील दोन वर्ष शिक्षण घेतले असेल तर त्यानंतर तुम्हाला सीए चे प्रवेशद्वार सहजच खुले होते. जर तुम्ही पदवी शिक्षण पूर्ण केले आहे तर त्यानंतर देखील सीए चे अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. गरजेचे नाही की तुम्हाला कॉमर्स शाखाच असली पाहिजे. कोणत्याही शाखेतील विद्यार्थी सी ए या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो परंतु फक्त योग्य त्या पात्रता आपल्याला आयसीएच्या संकेतस्थळावर जाऊन तपासणं गरजेचं आहे.

सीए अभ्यासक्रम :

सीए हा व्यवसायिक अभ्यासक्रम असल्याने त्याची संरचना देखील वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तयार करण्यात आलेली आहे, जेणेकरून जे विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतील. त्यांना सुटसुटीत पणे व कोणत्याही प्रकारच्या शंका मनामध्ये न येता या अभ्यासक्रमातील विविध मॉडेलचा अभ्यास करता यावा याकरिता अधिकृत मंडळांनी सिलॅबस देखील तयार केलेला आहे. या सिलॅबस च्या माध्यमातूनच विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेची अभ्यास रचना तयार करत असतात तसेच हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना कमीत कमी 3 ते 5 वर्ष लागतात. दरवर्षी टप्प्याटप्प्याने होणाऱ्या परीक्षा त्यामध्ये उत्तीर्ण झाल्यावर भविष्यात सीएही पदवी त्यांना हमखास मिळू शकते.

सीए अभ्यासक्रम पुढील टप्प्यांमध्ये विभागलेला आहे.

१) सी ए फाउंडेशन कोर्स :

सीए अभ्यासक्रमासाठी फाउंडेशन कोर्स हा पहिला टप्पा आहे. या टप्प्याच्या माध्यमातूनच तुमच्या सीए या अभ्यासक्रमाची सुरुवात होते. ज्या विद्यार्थ्यांना सीए अभ्यासक्रमाचे प्रवेश घ्यायचे आहेत त्यांना फाउंडेशन कोर्स पूर्ण करावा लागतो. अनेकदा हा कोर्स अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका देखील असतात परंतु या फाउंडेशन कोर्सला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर विद्यार्थी आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणत्याही शाखेतील विद्यार्थी या फाउंडेशन कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतो. फक्त बारावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्याला कमीत कमी 35% मार्क असणे गरजेचे आहे.

फाउंडेशन कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आयसीएआय च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करावे लागते व त्यानंतर परीक्षेसाठी फॉर्म देखील भरावा लागतो. या दोन्ही प्रक्रिया वेगळे असतात त्यानंतर वेबसाईटवर दिलेल्या सिल्याबस प्रमाणे तुम्ही परीक्षेची तयारी करू शकता. फाउंडेशन कोर्स ची परीक्षा वर्षभरातून दोन वेळा होते. या परीक्षा सर्वसाधारणपणे मे आणि नोव्हेंबर या महिन्यात घेतली जाते परंतु आधीच याची पूर्वतयारी व रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर विद्यार्थ्यांना ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी विशिष्ट कालावधी देखील दिलेला आहे. जर या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करावे लागते. ही परीक्षा विद्यार्थी तीन वर्षाच्या आत उत्तीर्ण होऊ शकतात. कमीत कमी सहा प्रयत्नांमध्ये विद्यार्थ्यांना ही परीक्षा पास व्हावी लागते.

२) सी ए इंटरमीडिएट कोर्स :


या दुसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण किंवा पदवीधर असणे गरजेचे आहे परंतु बारावीनंतर प्रवेश घेतल्या वर विद्यार्थ्यांना फाउंडेशन कोर्स हा पहिला टप्पा पूर्ण केलेला असावा. त्यानंतर सीए इंटरमीडिएट कोर्ससाठी प्रवेश मिळतो. ज्या विद्यार्थ्यांनी पदवी मध्ये प्रवेश घेतलेला आहे व पदवी पूर्ण केलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना फाउंडेशन कोर्स पूर्ण करण्याची गरज नाही. पदवीनंतर सीए इंटरमीडिएट कोर्सला प्रवेश घेता येतो. या कोर्ससाठी म्हणजेच या टप्प्यासाठी परीक्षा देखील दोन वेळा घ्यावी लागते तसेच विद्यार्थ्यांना विशिष्ट असा कालावधी देखील देण्यात आलेला आहे. या कालावधीच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना हा कोर्स पूर्ण करावा लागतो, नाहीतर पुन्हा रजिस्ट्रेशन करावे लागते. जे विद्यार्थी इंटरमीडिएट परीक्षा देणार आहेत त्यांना चार वर्षाचा कालावधी दिला जातो. या चार वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना आठ प्रयत्नांमध्ये परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे, नाहीतर पुन्हा रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यासाठी फीज देखील वेगवेगळ्या पद्धतीने आकारली जाते.

३) सीए आर्टिकल शीप


सीए इंटरमीडिएट कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी सी ए आर्टिकल शिफ्ट करू शकतात त्यासाठी देखील काही पात्रता आहेत. त्या पात्रता पूर्ण केल्यावर आर्टिकल शिप मिळते. तसे पाहायला गेले तर इंटरमीडिएट कोर्समध्ये दोन गट असतात त्यातील जर आपण एखादा गट देखील उत्तीर्ण झालं तरी आपल्याला सी ए आर्टिकल शिफ्ट करता येते. ही आर्टिकलशी प्रामुख्याने तीन वर्षाची असते आणि म्हणूनच जे विद्यार्थी सीए ची तयारी करत आहेत त्यांना सीए आर्टिकल शिफ्ट पूर्ण करणं गरजेचं आहे. ज्यामुळे त्यांना भविष्यात कामाचा अनुभव देखील मिळतो. आर्टिकल शिफ्ट सुरू असताना तुम्हाला त्याचे पैसे देखील मिळत असतात. शेवटच्या सहा महिन्यांमध्ये तुम्ही सीएच्या फायनल परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करू शकता.

४) फायनल कोर्स.


सीए फायनल हा सीए अभ्यासक्रमाचा अंतिम स्तर आहे. हा स्तर पूर्ण करून विद्यार्थ्यांना सीए ची पदवी मिळते परंतु या फायनल फोर्सचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी विद्यार्थ्यांना मर्यादित वेळ दिलेली नसते तसेच ही परीक्षा वर्षभरातून दोन वेळा असते. सर्वसाधारणपणे मे आणि नोव्हेंबर महिन्याच्या प्रत्येक वर्षी घेतली जाते. या परीक्षेच्या रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला पाच वर्षाचा कालावधी दिलेला असतो. या कालावधीमध्ये तुम्हाला ही परीक्षा पूर्ण करावी लागते. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षेचे मूल्यांकन करताना प्रामुख्याने दोन गटांमध्ये केले जाते. या दोन्ही गटांमध्ये विद्यार्थ्यांना कमीत कमी 40 ते 50 टक्के मार्क्स मिळणे गरजेचे आहे, अशाच प्रकारचे विद्यार्थी सीए पास म्हणून ओळखले जातात व त्यांना सीएची पदवी मिळते. सीए फायनल ची परीक्षा अन्य दोन स्तरांपेक्षा कठीण मानली जाते आणि म्हणूनच या वर्षी विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागते.

ज्या विद्यार्थ्यांना सीए अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी आयसीएआयच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अवश्य भेट द्या. तेथे तुम्हाला अपडेट असलेली माहिती मिळेल, जेणेकरून तुम्ही देखील भविष्यात सीए बनविण्याचे स्वप्न सत्यामध्ये आणू शकाल.

भविष्यकालीन संधी :

सीएची पदवी मिळवल्यानंतर तुम्ही भविष्यात वेगवेगळ्या संस्थेमध्ये फायनान्शिअल अकाउंटंट टॅक्स डिक्लेरेशन फायनान्शियल सपोर्टर किंवा स्वतःचे रिलायन्सिंग सीए फॉर्म देखील उघडू शकता त्याचबरोबर अनेक जण आयटी फाईल बनवण्यासाठी देखील तुम्हाला संपर्क साधू शकता म्हणूनच बारावीनंतर व ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही सीए चा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता.

फी

सीए अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता विद्यार्थ्यांना खर्च देखील तितका येतो. हा खर्च अनेकदा तुम्ही किती वर्षांमध्ये परीक्षा पूर्ण करतात त्यावर देखील अवलंबून असतो. सर्वसाधारणपणे 50000 पासून ते 3 लाख इतका खर्च सी ए चा अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता लागतो.

हे पण वाचा :– CS ही चांगली पदवी आहे का?