BBA Information in Marathi|बी.बी.ए कोर्सची संपूर्ण माहिती

BBA Information in Marathi

आज आम्ही तुम्हाला BBA Information in Marathi जी माहिती सांगणार आहोत तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन अभ्यासक्रमाबद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत. हा अभ्यासक्रम तुम्हाला फक्त शिक्षण देणार नाही, तर शिक्षणाच्या मदतीनेच एक व्यावसायिक अभ्यासक्रम देखील तुम्हाला पुरवणार आहे. आपल्या आजूबाजूला अनेक असे विद्यार्थी आहेत त्यांना पारंपारिक शिक्षण ऐवजी व्यवसायिक शिक्षण घेणे अधिक पसंतीचे आहे.

काही दिवसांपूर्वीच बारावीचा निकाल लागलेला आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक वर्ग भविष्याचा विचार मोठ्या प्रमाणावर करू लागतात परंतु नेमका कोणता अभ्यासक्रम निवडायचा? कोणता कोर्स निवडायचा याबद्दल अनेकदा मनामध्ये गैरसमज व गोंधळ उडालेला असतो म्हणूनच अनेक विद्यार्थ्यांना स्वतःचे करिअर नीट घडवता येत नाही व करिअरचा मार्ग देखील निवडता येत नाही. जर तुमच्या बाबतीत देखील असे काही होत असेल तर अजिबात चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला ज्या कोर्स बद्दल माहिती सांगणार आहोत तो कोर्स तुम्हाला भविष्यात व्यवसायिक दृष्ट्या सक्षम करणार आहे. या कोर्स चे नाव आहे बीबीए कोर्स म्हणजेच बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन कोर्स.

बीबीए म्हणजेच बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. हा अभ्यासक्रम कॉमर्स शाखेचा अभ्यासक्रम आहे म्हणजेच कॉमर्स विषयाच्या अंतर्गत हा विषय शिकवला जातो म्हणूनच सध्याच्या काळात बीबीएला खूपच महत्त्व देण्यात आलेले आहे. हा अभ्यासक्रम निवडून विद्यार्थी ग्रॅज्युएशन नंतर आपल्याला हवे असलेल्या कॉमर्स क्षेत्रामध्ये स्वतःचे करिअर बनवू शकतात. पूर्वीच्या काळी फक्त विद्यार्थ्यांना कॉमर्स ही शाखा उपलब्ध असायची परंतु आता कॉमर्समध्ये देखील अनेक कोर्सेस विद्यापीठाने सुरू केलेले आहेत तसेच आपल्या आजूबाजूला महाविद्यालय देखील कॉमर्स संबंधित असणारे अनेक कोर्स सुरू करतात आणि या सर्वांचा फायदा विद्यार्थ्यांना सर्वांगीण कल्याणाकरिता तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम व व्यावसायिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी होत असतो.

बीबीए हा एक पदवी कोर्स आहे. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना तीन वर्ष व्यतित करावे लागतात व त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सेमिस्टर पॅटर्न पद्धतीने शिकवले जाते. या अभ्यासक्रमामध्ये शिकवले जाणारे विषय हे सहसा वाणिज्य म्हणजेच कॉमर्स शाखेचे संबंधित असल्याने भविष्यात विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रांमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी मिळते. हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढे मास्टर्स डिग्री देखील उपलब्ध आहे तसेच भविष्यात पीएचडी करून विद्यार्थी आपले भवितव्य घडवू शकतात.

सर्वसाधारणपणे तीन वर्षाच्या या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना 6 सेमिस्टर चा अभ्यास करावा लागतो तसेच शेवटच्या वर्षी प्रकल्प तयार करून विद्यापीठाच्या तज्ञ मंडळी द्वारे त्याचे मूल्यांकन केले जाते. या सर्वांमुळे विद्यार्थ्यांच्या अंगी एक व्यवसायिक तसेच एक उत्तम बिझनेस मॅन निर्माण होण्याची गुण कौशल्य तयार होतात.

बीबीए अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना फायनान्स, वित्त उद्योजकता, फायनान्स मॅनेजमेंट, ह्यूमन रिसर्च यासारख्या गोष्टींबद्दल प्रशिक्षण व ज्ञान दिले जाते. व्यवस्थापन क्षेत्राचा अभ्यास करत असताना बीबीए विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या पर्यायाच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःच्या अंगी असणारे गुण कौशल्य ओळखू शकतात. त्याचबरोबर अकाउंटिंग फायनान्स टॅली बजेट यासारख्या विषयांना हात घालून स्वतःचे करिअर देखील घडवू शकतात. बीबीए ची डिग्री प्राप्त केल्यानंतर तुम्ही स्वतःचे करिअर्त घडवू शकतात त्याचबरोबर एखाद्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या पदावर काम करू शकतात अनेक जण बीबीए डिग्री मिळवून स्वतःचा बिजनेस सुरू करतात म्हणूनच बेस्ट ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन या कोर्सला नाव देण्यात आलेले आहे. या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या व्यवसायाचे ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच व्यवस्थापन पूर्णपणे करू शकता. बीबीए डिग्री प्राप्त केलेल्या उमेदवारांना कॉर्पोरेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मागणी असते.

पात्रता

ज्या विद्यार्थ्यांना बीबीए पदवी प्राप्त करायची आहे, अशा विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे त्याचबरोबर बारावी कॉमर्स शाखेमधून पूर्ण झालेली असावी.

त्याचबरोबर विद्यार्थ्याला बारावी मध्ये कमीत कमी 50% देखील मिळणे गरजेचे आहे. जाती निहाय आरक्षणा नुसार 45 टक्के देखील विद्यार्थ्यांना मिळाले तरी विद्यार्थी बीबीए या पदवीसाठी प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतो.

बीबीए अभ्यासक्रम हा सर्वसाधारणपणे इंग्रजी भाषेमध्ये शिकविला जातो परंतु काही संस्थेमध्ये हा अभ्यासक्रम जरी इंग्रजीमध्ये असला तरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य मराठी व हिंदी भाषेमध्ये देखील केले जाते तसेच ज्या काही संकल्पना आहे त्या इंग्रजीमध्ये समजावले जातात. विद्यार्थ्यांची आकलन क्षमता आणि ग्रहण क्षमता यावर देखील या अभ्यासक्रमाचे यश अवलंबून असते परंतु विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे परीक्षा देताना व महाविद्यालयाची परीक्षा देतांना लेखी परीक्षेचे माध्यम हे इंग्रजीमध्येच द्यावे लागते. तेथे तुम्हाला मराठी व इन हिंदी हा पर्याय उपलब्ध नसतो.

वयोमर्यादा

बीबीए हा अभ्यासक्रम निवडताना व प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना कोणत्याच वयोमर्यादा नसते. फक्त वय वर्ष 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे परंतु काही महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये या कोर्ससाठी वयोमर्यादा ठरविण्यात आली आहे म्हणूनच बीबीए हा अभ्यासक्रम निवडताना सर्वप्रथम विद्यापीठाच्या एकंदरीत अभ्यास संरचनाच्या पात्रता समजून घेणे गरजेचे आहे.

प्रवेश परीक्षा

बीबीए अभ्यासक्रम हा व्यवसायिक दृष्ट्या महत्त्वाचा अभ्यासक्रम असल्याने काही महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये या अभ्यासक्रमाच्या साठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची अंगी असणाऱ्या गुन्हा कौशल्यांचा आढावा घेतला जातो तसेच भविष्यात विद्यार्थी या कोर्ससाठी पात्र आहे की नाही याची देखील चाचणी केली जाते. प्रवेश परीक्षाही लेखी तोंडी माध्यमातून घेतली जाते. जे विद्यार्थी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होतात अशा उमेदवारांना बीबीए या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरविण्यात येते आणि म्हणूनच असे विद्यार्थी व्यवस्थापन व व्यवसाय प्रशिक्षण या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात.

काही शासकीय महाविद्यालयांनी गेले काही वर्षापासून बीबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा देखील घेण्याचे ठरविले आहे आणि म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी सीईटी आयोजित करून परीक्षा घेतली जाते परंतु काही खाजगी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देखील दिला जातो.

फी

बीबीए हा ऍडमिनिस्ट्रेशन संदर्भातील अभ्यासक्रम असल्याने या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रशिक्षण व व्यवस्थापन याचे धडे शिकवले जातात तसेच महाविद्यालय व विद्यापीठ विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या सुविधा पुरवितात. या अनुषंगाने या अभ्यासक्रमाची फी देखील घेतली जाते. सर्वसाधारणपणे पाहायला गेले तर तीन वर्षाचा हक्क अभ्यासक्रम असल्याने प्रत्येक वर्षाची फी ही वेगवेगळी असते म्हणूनच 2000 पासून ते 1 लाखापर्यंत या अभ्यासक्रमाची सर्वसाधारण ही असते तसेच विद्यार्थी जर आरक्षण वर्गामध्ये येत असेल तर त्याला आरक्षणाच्या सुविधा देखील प्राप्त होतात परंतु या सुविधा पुरविणे हे महाविद्यालय व विद्यापीठ यांच्यावर अवलंबून असतात.

स्पेशलायझेशन :

जसे की आपणास माहिती आहे बीबीए हा एक पारंपारिक पद्धतीचा कोर्स नसून व्यवसायिक म्हणजेच प्रोफेशनल फायनान्स कोर्स आहे आणि म्हणूनच हा कोर्स शिकत असताना विद्यार्थ्यांना स्पेशल देखील करता येतात. स्पेशलायझेशन म्हणजे विद्यार्थ्यांना एखाद्या विषयात नैपुण्य देखील मिळवता येते.

  • फायनान्स : बीबी अभ्यासक्रम शिकत असताना विद्यार्थ्यांना फायनान्स संदर्भातील अनेक बाबी समजून सांगण्यात येतात जसे की शेअर मार्केट, फायनान्शियल मॅनेजमेंट, वित्तपुरवठा, गुंतवणूक की भागीदारी स्टेक होल्डर या संदर्भातील अनेक गोष्टी अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केले गेलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात फायनान्स संदर्भातील क्षेत्रात करिअर करायचे आहे असे विद्यार्थी फायनान्स स्पेशलायझेशन निवडतात.
  • मार्केटिंग : आपल्याच माहिती आहे की, मार्केटिंग सध्या सर्व क्षेत्रांमध्ये अविभाज्य घटक बनलेले आहे आणि म्हणूनच भविष्यात एखाद्या उत्पादनाची सेवेची परिणामकारकता वाढवायची असेल तर मार्केटिंग अत्यंत गरजेचे असते म्हणूनच बीबीए विद्यार्थ्यांना देखील मार्केटिंग स्पेशलायझेशन विषय असतो.
  • ह्यूमन रिसर्च मॅनेजमेंट : याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना ह्यूमन मॅनेजमेंट तसेच रिसर्च मॅनेजमेंट संदर्भातील गोष्टी शिकविल्या जातात तसेच संस्थेमध्ये मनुष्य भरती करत असताना त्याचे योग्य व्यवस्थापन, विद्यार्थी भरती, कर्मचारी व्यवस्थापन, कर्मचारी प्रशिक्षण, पगार भत्ता इत्यादी गोष्टींचे ज्ञान दिले जाते आणि हे ज्ञान भविष्यात त्यांना उपयोगी पडते.
  • इंटरनॅशनल बिझनेस : या स्पेसिलायझेशनच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यापार , बाजार घडामोडी यांचे मार्गदर्शन व ज्ञान दिले जाते. या विषयाच्या अंतर्गत विद्यार्थी इंटरनॅशनल बिजनेस मध्ये घडणाऱ्या घडामोडी आत्मसात करून भविष्यात स्टॉक मार्केट, बिजनेस स्टार्टअप यासारख्या अनेक नवीन गोष्टी शिकू शकतात.
  • ऑपरेशन मॅनेजमेंट : या विषयाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना उत्पादनाचे गुणवत्ता त्याची कार्यक्षमता उपयुक्तता परिणामकारकता याचे ज्ञान दिले जाते.

व्यवसायिकता उद्योजकता: याद्वारे बीबीए विद्यार्थी प्राप्त विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या पदवीच्या माध्यमातून एक यशस्वी उद्योजक कसा घडवायचा तसेच एका यशस्वी उद्योजकाच्या अंगी नेमके कोणते गुण कौशल्य असले पाहिजे, कोणकोणते आपत्कालीन व्यवस्थापन असायला हवेत याचे सखोल ज्ञान दिले जाते आणि या उद्योजकता विषयाच्या स्पेशलायझेशन नुसार विद्यार्थी भविष्यात बिझनेस स्टार्टअप बिझनेस डेव्हलपमेंट बिझनेस रिसर्च यासारख्या गोष्टींवर कार्य करू शकतात.

विषय :

first semester

  • financial accounting
  • micro economics
  • principal of management
  • india socio political economics
  • quantitive technique 1
  • essential of IT

semister 2

  • micro economics
  • quantitiv technique 2
  • effective communication
  • cost accounting
  • environment management
  • principal of marketing

semester 3

  • banking and insurance
    Indian economics in global scenario operations research
  • direct tax and indirect tax
    human resource management
    consumer behaviour and services marketing

semester 4

  • human behaviour and ethics act workplace
  • managment accounting
  • business analytics
  • business law
  • financial management
  • customer relationship management

semester 5

  • strategic management
    research methodology
  • finances elective
    advance statement analysis
    advance financial management

Semester 6

  • international business and exims
  • finance elective
  • operation and supply chain management
  • marketing elective
  • entrepreneur and business plan

हे पण वाचा

एमबीए म्हणजे काय?

बीएससी शिक्षण म्हणजे काय?