Balika Samridhi Yojana in Marathi
Balika Samridhi Yojana in Marathi: राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून नेहमी मुलींसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळ्या लोककल्याणकारी योजना राबवत असते. आजही आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये महिलांना प्रत्येकवेळी दुय्यम स्थान दिले जाते.भारतासारख्या देशामध्ये पितृसत्ताक कुटुंब पद्धत असल्यामुळे पूर्वीच्या काळापासूनच महिलांना चूल आणि मूल ह्याच गोष्टी शिकवल्या, परंतु आताच्या काळामध्ये परिस्थिती बदलली आहे, परंतु आजही काही ग्रामीण भागामध्ये महिलांना फार दुय्यम वागणूक दिली जाते.देशामध्ये महिला व पुरुष समानता यावी यासाठी केंद्राच्या माध्यमातून नेहमी महिलांसाठी व मुलींसाठी विशेष योजना राबविल्या जातात.
Balika Samridhi Yojana| लाभार्थी पात्रता कागदपत्रे अर्ज माहिती
आज आपण अशाच एका योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. ती योजना म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून महिला व बालविकास विभागाने ऑगस्ट 1997 पासून Balika Samridhi Yojana सुरू करण्यात आली.तेव्हापासून या योजनेची अंमलबजावणी केली गेली,हा कार्यक्रम देशभरातील मुलींना मदत करतो कार्यक्रम काय करतो, तो का महत्त्वाचा आहे, या लेखामध्ये आपण समृद्धी बालिका योजना 2024 या योजनेबद्दल योजनेचे फायदे योजनेचा हेतू, योजनेचे महत्त्व, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती या लेखात पाहणार आहोत, त्यामुळे लेख वाचणार्याना विनंती आहे की लेख शेवटपर्यंत वाचावा. आणि अधिक माहिती जाणून घ्या.
भारतात, भ्रूणहत्या आणि हुंडा या प्रथा मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, त्यामुळे मुलीच्या जन्मानंतर कुटुंबांमध्ये सर्वत्र असंतोषाची भावना दिसून येते. मुलीची उपस्थिती हे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला तिचे ओझं वाटू लागत. विशेष म्हणजे आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असलेल्या कुटुंबात जर मुलगी जन्माला आले तर फारच बिकट परिस्थिती तिथे निर्माण होते.
म्हणूनच केंद्र शासनाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असलेल्या कुटुंबात जर एखादी मुलगी जन्माला आली तर तिच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी समान शैक्षणिक संधी प्रदान करणे आहे. या योजनेचा विशेष प्रयत्न असेल, शिवाय समाजामध्ये लैंगिक भेदभाव, सामाजिक असमानता आणि स्त्री भ्रूण हत्येची प्रकरणे वेगवेगळ्या जातीमध्ये महिलांना मुलींना असलेले दुय्यम स्थान यासारख्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी व मुलींचा सामाजिक स्तर सुधारला जावा भृण हत्या सारखे प्रकार आटोक्यात आणण्यासाठी, देशातील महिला स्थिती सुधारणे, केंद्र शासनाच्या माध्यमातून महिला व बाल विकास विभागाने ऑगस्ट 1997 मध्ये बालिका समृद्धी योजना सुरू केली. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत असलेल्या कुटुंबामध्ये जर मुलगी जन्माला आली तर त्या गरजू मुलींना समर्थन आणि आर्थिक दृष्ट्या मदत या योजनेच्या माध्यमातून दिली जाते.
Balika Samridhi Scheme
योजनेचे नाव | बालिका समृद्धी योजना |
सुरू करणारे सरकार | केंद्र सरकार |
लाभार्थी | देशातील मुली |
योजनेचा हेतू | मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे |
मिळणाऱ्या लाभाची रक्कम | 300/ रुपये ते 1000/ रुपयापर्यंत |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
बालिका समृद्धी योजना योजनेचा मुख्य हेतू
- या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना आणि दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत असलेल्या मुलींना प्राथमिक ते माध्यमिक पर्यंत शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे.
- ही योजना देशातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये मुलींची नोंदणी करून संख्या वाढवण्यासाठी आणि शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सुरू करण्यात आली होती.
- देशात आणि राज्यातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन नकारात्मक आहे, जर प्रत्येक मुलीने शिक्षण घेतल्यास हा दृष्टिकोन बदलेल.
- ग्रामीण मुलींना शिक्षण क्षेत्रात आकर्षित करण्यासाठी आणि प्रत्येक मुलीला शिक्षण मिळावे हे सुनिश्चित करण्यासाठी, या योजनेचा भारतातील प्रत्येक राज्यातील मुलींना फायदा होतो.
- देशातील मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणे.
- Balika Samridhi Yojana या योजनेद्वारे मुलींना आर्थिक मदत उपलब्ध करून कुटुंबातील सदस्यांनी मुलींना शाळेत पाठवण्यासाठी Balika Samridhi Yojana चालू केली.
बालिका समृद्धी योजनेचे महत्त्व
- भारत सरकारच्या महिला व बालविकास विभागाने ऑगस्ट 1997 मध्ये Balika Samridhi Yojana सुरू केलेली एक बचत योजना आहे.
- भारत देशामध्ये 1997 नंतर जन्माला आलेल्या मुलींना ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना Balika Samridhi Yojana ने चा लाभ दिला जातो.
- भारत सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने हि योजना चालू केलेली आहे.
- इयत्ता पहिली ते तिसरी मधील प्रत्येक वर्गासाठी 300/ रुपये अशी Balika Samridhi Yojana च्या माध्यमातून मिळणारी आर्थिक मदत आहे.
- चौथीच्या वर्गासाठी रु. 500/ आणि पाचवी च्या वर्गासाठी साठी रु. 600/
- मुली 7वी इयत्तेत प्रवेश घेतल्या नंतर तेव्हा रु.700/ आणि मुली 8वी इयत्तेत गेल्यानंतर रु.800/.
- मुलगी 9वी आणि 10वी मध्ये प्रवेश करते तेव्हा तिच्यासाठी रु.1000/हजार अनुदान देण्यात आले आहे.
- योजनेद्वारे देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम थेट लाभार्थी मुलीच्या बँक खात्यात जमा केली जाते.
- कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये आणि देशातील सर्व मुली शिक्षित व्हाव्यात हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने हि योजना राबवली आहे.
- लाभार्थी मुलीने अर्जाची सर्व प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी,त्यानंतर या प्रकल्पाचा लाभ मिळेल.
- अशाप्रकारे मुलींच्या प्राथमिक ते माध्यमिक स्तरापर्यंतच्या शिक्षणासाठी Balika Samridhi Yojana च्या माध्यमातून आर्थिक शिष्यवृत्ती दिली जाते.
बालिका समृद्धी योजना पात्रता नियम/अटी
- Balika Samridhi Yojana चा लाभ मिळवण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांमध्ये असणे आवश्यक आहे, लाभार्थी व्यक्तीला सदरील योजनेसाठी.
- Balika Samridhi Yojana साठी फक्त मुलीच अर्ज करू शकतात.
- मुलांसाठी नाही. ही योजना फक्त मुलींसाठी आहे.
- मुलगी ही आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये जन्माला आलेली असावी. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी.
- 15 ऑगस्ट 1997 नंतर मुलीचा जन्म झालेला असावा, बालिका समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी.
- एका कुटुंबातील या योजनेअंतर्गत दोन मुलींना लाभ दिला जातो.
- दोनपेक्षा जास्त मुलींचा जन्म एका कुटुंबात झाल्यानंतर या योजनेअंतर्गत लाभ दिला जात नाही.
- मुलीचा 18 वर्षे वयाच्या आधी अचानक आणि अनपेक्षित मृत्यू झाल्यास,अर्जदाराच्या लाभार्थी ती रक्कम तिच्या पसंतीच्या व्यक्तीला काढता येईल.
- लाभार्थी मुलीचे 18 वर्षांच्या आत विवाह केला तर , या योजनेतील लाभ दिला जाणार नाही, फक्त जन्मानंतर मिळालेले 500 रुपये आणि त्यावरील व्याज मुलीला देता येईल.
- योजनेचा लाभ भारतातील केवळ अविवाहित मुलीच घेऊ शकतात. ही योजना विवाहित मुलींसाठी उपलब्ध नाही.
Balika Samridhi Yojana प्रमुख फायदे
- या योजने द्वारे, मुलीला प्राथमिक ते माध्यमिक पर्यंत शिष्यवृत्तीची निश्चित रक्कम मिळते.
- Balika Samridhi Yojana फायदा मुलीला तिच्या शिक्षणासाठी तसेच तिच्या लग्नासाठी होतो.
बालिका समृद्धी योजना मिळणारी शिष्यवृत्ती
वर्ग | आर्थिक साहित्याची रक्कम |
इयत्ता 1ली ते इयत्ता 3री वर्ग | 300/ रुपये प्रत्येक वर्ग, प्रति वार्षिक |
इयत्ता 4थी वर्ग | 500/ रुपये, प्रति वर्ष |
इयत्ता ५वी वर्ग | ६००/ रुपये, प्रति वर्ष |
इयत्ता 6वी आणि 7वी | 700/रुपये, प्रत्येक वर्ग, प्रती वर्ष |
इयत्ता 8वी वर्ग | 800/ रुपये, प्रति वर्ष |
इयत्ता 9वी व 10वी वर्ग | 1000/ रुपये, प्रत्येक वर्ग, प्रति वर्ष |
बालिका समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रेशन कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- उत्पन्नाचा दाखला
- बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- मोबाईल क्रमांक
- ई-मेल आयडी
- मुलीच्या जन्माचा दाखला
बालिका समृद्धी योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया
Balika Samridhi Yojana साठी अर्ज करण्याची प्रक्रिया कोणत्याही प्रकारचा त्रास टाळण्यासाठी, अर्ज ऑफलाइन केला जातो, अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
- जर तुम्ही ग्रामीण भागात रहात असाल तर तुम्ही तुमच्या जवळच्या गावातील अंगणवाडी गाव केंद्राला भेट द्यावी.
- तुम्ही आरोग्य कर्मचाऱ्यांकडे जावे.तुम्ही जर शहरी भागात राहत असाल.तुम्हाला त्यांच्याकडून बालिका समृद्धी योजनेसाठी अर्ज करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती वाचून मग तुम्ही काळजीपूर्वक भरा.
- संपूर्ण कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील.
- तुम्हाला संपूर्ण अर्ज तपासण्याची आवश्यकता आहे. आणि सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री केल्यानंतर तुम्हाला तेथे अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे.
- तुमचा अर्ज अशाप्रकारे बालिका समृद्धी योजनेसाठी अर्ज भरला जाऊ शकतो.
सारांश
अशाप्रकारे Balika Samridhi Yojana या योजनेची आम्ही सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, तुमच्या कुटुंबातील मुलींना योजनेचा लाभ घेता येईल तसेच तुमच्या आजूबाजूला परिसरामध्ये समाजामध्ये या योजनेसाठी इतर मुली पात्र असतील तर त्यांच्या कुटुंबांना ही माहिती द्यावी व आमचे आर्टिकल इतरांना शेअर देखील करावे.