Bachelor of Education Information in Marathi|B.Ed म्हणजे काय?

B. ed बॅचलर ऑफ एज्युकेशन 

मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या अभ्यासक्रमाबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की, सध्याच्या स्पर्धेच्या जगात वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचा मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांवर प्रभाव दिसून येतो अशावेळी नेमका कोणता अभ्यास करायचा याचे भान विद्यार्थी वर्गाला नसते.

जर तुम्हाला योग्य अभ्यासक्रमाची माहिती योग्य वेळेला कळाली तर आपले भविष्य देखील उज्वल होते म्हणूनच वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी त्या विषयाचे ज्ञान असणे देखील गरजेचे आहे. एखादा अभ्यासक्रम जेव्हा आपण निवडतो तेव्हा तो अभ्यासक्रम शिकवणारे तज्ञ मंडळी यांच्या बद्दल देखील आपण माहिती जमा करत असतो. एखादा अभ्यासक्रम शिकवताना शिक्षक वर्ग नेमका कोण आहे हे देखील जाणणे गरजेचे आहे.

जर तुम्हाला अभ्यासक्रम शिकवत असताना तज्ञ मंडळी द्वारे शिकवले गेले तर त्याचा फायदा देखील विद्यार्थ्याला दैनंदिन जीवन जगण्यात होत असतो कारण की सध्या पाठ्यपुस्तक व्यतिरिक्त व्यवहारिक ज्ञान देणाऱ्या शिक्षकांचा मोठ्या प्रमाणावर विचार केला जातो. तुम्ही सर्वांनी बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजेच b.ed हा अभ्यासक्रम या अभ्यासक्रमाबद्दल ऐकले असेल.

आज याच अभ्यासक्रमाबद्दल आपण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना माहिती आहे की, शिक्षक हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. शिक्षकाशिवाय विद्यार्थी जीवन अपूर्ण आहे. जर विद्यार्थ्याला चांगल्या शिक्षकाची साथ लाभली तर विद्यार्थी भविष्यात चांगले करिअर बनवू शकतो. स्वतःचे स्वप्न साकार करू शकतो आणि म्हणूनच बीएड हा असा एक अभ्यासक्रम आहे,जो चांगला शिक्षक घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असतो.

जर तुम्हाला देखील महत्त्व भविष्यात शिक्षक बनायचे असेल, शिक्षक या पदावर काम करायचे असेल तर तुमच्यासाठी बॅचलर ऑफ एज्युकेशन हा अभ्यासक्रम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारा आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तुम्ही शिक्षक बनवण्यासाठी असणाऱ्या नेमक्या कोणकोणत्या गोष्टी अभ्यासायचे आहेत हे जाणून घ्याल.

एका शिक्षकासाठी नेमके कोणकोण कोणकोणते गुण कौशल्य अंगी असणे गरजेचे आहे याबद्दल देखील अभ्यासक्रमामध्ये सांगितले जाते आणि म्हणूनच सध्या शिक्षण या क्षेत्राकडे वळण्याकरता विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ एज्युकेशन हा अभ्यासक्रम पूर्ण असावा लागतो. चला तर मग जाणून घेऊया या अभ्यासक्रमाविषयी महत्त्वाच्या गोष्टींबद्दल…

मानवी जीवनामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवण्यासाठी शिक्षक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. विद्यार्थ्यांचे आयुष्य शिक्षकाने दिलेल्या ज्ञानावर अवलंबून असते आणि म्हणूनच जर शिक्षक उत्तम असतील तर विद्यार्थ्यांचे संगोपन देखील चांगल्या पद्धतीने होत असते. शिक्षकाच्या अंगी असणारे गुण कौशल्य, ज्ञान,निर्णय क्षमता, बौद्धिक क्षमता, इत्यादी गुणधर्म विद्यार्थी जीवनावर प्रकाश टाकत असतात. विद्यार्थी आपल्या आई-वडिलांपेक्षा जास्त काळ शिक्षकांसोबत व्यतीत करत असतात आणि म्हणूनच शिक्षकांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. आज आपण बीएड बद्दल जे जाणून घेणार आहोत तो कोर्स सर्वसाधारण असला तरी त्याचे महत्त्व मात्र असामान्य आहे.

सर्वसाधारणपणे जेव्हा आपण बीएड हा अभ्यासक्रम जाणून घेतो तेव्हा बीएड चा फुल फॉर्म हा बॅचलर ऑफ एज्युकेशन असा असतो. भारत सरकारने प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकवण्याकरिता तसेच खास सरकारी शाळेमध्ये शिकवण्याकरता उमेदवाराचे शिक्षण बीएड पूर्ण असायला हवे अशी अट घातलेली आहे आणि म्हणूनच बीएड या अभ्यासक्रमाकडे अनेकांचे लक्ष देखील लागलेले आहे अनेक विद्यार्थी जे प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रात ज्यांना करिअर करायचे आहे असे विद्यार्थी बीएड हा अभ्यासक्रम आवर्जून पूर्ण करतात. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक बनण्यासाठी आवश्यक असणारे सर्व घटक यांचे ज्ञान दिले जाते.

पात्रता: 

जर तुमच्याकडे संभाषण, वकृत्व, निर्णय क्षमता, हजरजबाबी पणा, काळजीवाहू इत्यादी गुण असतील तर तुम्ही शिक्षक सहजच बनू शकता. 

जर तुम्हाला बीएड अभ्यासक्रम करायचा असेल तर तसेच या कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थ्यांसाठी मेरिट लिस्ट लागते. बहुतेक ठिकाणी मेरिट लिस्ट नुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी मराठी इंग्रजी या दोन्ही भाषेत शिकवला जातो त्याच बरोबर विद्यार्थी परिषदेतील इंग्रजी आणि मराठी भाषेत देऊ शकतात.

विद्यार्थ्याला पदवीधर व पदवी तर शिक्षण पूर्ण असले पाहिजे तसेच विद्यार्थ्याला कमीत कमी 50% गुण असायला पाहिजे.

पूर्वीच्या काळी बीएड हा अभ्यासक्रम एका वर्षाचा होता परंतु कालांतराने कालावधी वाढवण्यात आला. सध्या बीएड हा दोन वर्षाचा अभ्यासक्रम अनेक विद्यापीठ चालवितात. या दोन वर्षे अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे सराव प्रात्यक्षिक तसेच शिक्षकांच्या गुणवत्तेसाठी आवश्यक असणारे विविध विषय हाताळले जातात.

वर्ष 2018 पासून हा अभ्यासक्रम चार वर्षाचा देखील करण्यात आलेला आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून शिक्षक बनू शकतात.

या अभ्यासक्रमात करिता विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा द्यावी लागते. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय किंवा मेरिट लिस्ट मध्ये नाव आल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही आणि म्हणूनच अनेक विद्यार्थी बीएड मेरिट लिस्ट ची तयारी करतात व ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षण देखील घेतात.

बीएड अभ्यासक्रम करत असताना विद्यार्थ्यांना स्पेशलायझेशन देखील दिले जाते. विद्यार्थी स्वतःच्या आवडीनुसार आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या विषयात स्पेशलाझेशन करू शकतात.

हा अभ्यासक्रम चार सेमिस्टर मध्ये विभागलेला आहे.

बीएड अभ्यासक्रम रेग्युलर तसेच डिस्टन्स एज्युकेशन इन्स्टिट्यूशन द्वारे देखील करता येतो. जर तुम्हाला काही कारणामुळे नियमितपणे लेक्चर अटेंड करणे जमत नसेल तर अशावेळी तुम्ही डिक्शन एज्युकेशन चा पर्याय निवडू शकता.

बी एड अभ्यासक्रम सिलॅबस : 

semester 1

  • Childhood and Growing Up
  • Pedagogy of School Subject 
  • Contemporary India and Education

Semester 2nd 

  • Learning and Teaching
  • Knowledge and Curriculum
  • Assessment for Learning

 Semester 3rd

  • Pre- Internship
  • School Attachment
  • Engagement with the Field

Semester 4th 

  • Reading and Reflecting on Texts
  • Arts in Education
  • Understanding the Self

फी

बी एड हा शिक्षण संदर्भातील अभ्यासक्रम असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क व अभ्यासक्रम शुल्क देखील वेगवेगळ्या पद्धतीने भरावे लागतात. बहुतेक वेळा विद्यापीठ आणि महाविद्यालय यांनी विद्यार्थ्यांना पुरवलेल्या सुविधा यावर या अभ्यासक्रमाची फी असते. सर्वसाधारणपणे 7000 ते 50 हजार इतकी या अभ्यासक्रमाची फी असते आणि म्हणूनच जर तुम्ही शासकीय संस्थेमधून हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात असेल तर अनेकदा जातीनिहाय आरक्षण नुसार विद्यार्थ्यांना कमी फी देखील भरावी लागते. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत देखील शिक्षण मिळते म्हणूनच वेगवेगळ्या संस्था आणि विद्यापीठ पातळीवर दिल्या जाणाऱ्या सुविधा यानुसार विद्यार्थ्यांकडून ही आकारली जाते.

बीएड हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता विद्यार्थ्यांना वयाची अट नसते परंतु सर्वसाधारणपणे 19 ते 21 वय वर्ष पूर्ण झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ शकतात.

बीड अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भविष्यातील संधी : 

जसे की आपणा सर्वांना माहिती आहे की, बीएड हा एक व्यवसायिक अभ्यासक्रम आहे या व्यवसायिक अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना एक शिक्षक कसा घडवला जातो याचे ज्ञान दिले जाते आणि म्हणूनच चार वर्षाचा हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर किंवा पदवीनंतर दोन वर्षाचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना बीएड नावाची पदवी दिली जाते. ही पदवी मिळवल्यानंतर विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू होऊ शकतात. बीएड केल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध होते या संधीच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःचे करिअर घडवू शकतात.

शिक्षक ही पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी खाजगी तसेच शासकीय शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्य करू शकतात.

अनेक संस्थांमध्ये एज्युकेशन कन्सल्टंट म्हणून देखील पद असते. या पदावर बीएड शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांची निवड केली जाते. समाजामध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे लोकांना साक्षरतेकडे वळवणे याकरिता एज्युकेशन कन्सल्टंट महत्त्वाची भूमिका बजावतात.

जर तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात कार्य करायचं नसेल तर अशावेळी तुम्ही खाजगी क्लासेस देखील सुरू करू शकतात आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवू शकतात.

बीएड अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही शाळेमध्ये आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहजच शिकवू शकतात.

बीएड डिग्री प्राप्त केलेल्या उमेदवारांना भविष्यात शैक्षणिक क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतात जसे की प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षण क्षेत्र, साहित्यक्षेत्र, प्रकाशन क्षेत्र, लेखक या सर्व शिक्षण संदर्भातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या क्षेत्रात या उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते.

वेतन : 

बीएड अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना भविष्यात वेतन देखील चांगला मिळतो. तुम्हाला तुमच्या अनुभवानुसार तसेच तुमच्या अंगी असणाऱ्या गुण कौशल्य आधारावर वेतन दिले जाते. सुरुवातीला जेव्हा एखादा उमेदवार शिक्षक म्हणून नोकरी रुजू करतो, तेव्हा कमीत कमी 20000 ते 50 हजार पगार इतका असतो त्यानंतर खाजगी संस्था व शासकीय संस्था यानुसार उमेदवाराच्या पगारामध्ये वाढ होत असते. जर तुम्ही स्पर्धा परीक्षा किंवा अन्य काही परीक्षा त्यांची तयारी केली व त्यात उत्तीर्ण झाल्यात तरी तुमचा पगार वाढण्याची शक्यता जास्त असते.

संगणक म्हणजे काय?