b.com information in Marathi
मित्रांनो सध्या दहावी आणि बारावीचे निकाल लागलेले आहेत. दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतरच पालकांना व विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये नेमका कोणता कोर्स निवडायचा? कोणत्या शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा याचा विचार मनात येऊ लागतो आणि विद्यार्थ्यांची बुद्धी कौशल्य आणि त्याच्या अंगी असलेले क्षमता या सर्वांच्या आधारावर अनेकदा पालक वेगवेगळ्या शाखेतील अभ्यासक्रम निवडत असतात. हल्ली स्पर्धा देखील वाढलेली आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचे असेल तर आपल्याला भविष्यामध्ये नोकरीच्या दृष्टिकोनातून उत्तम असा अभ्यासक्रम निवडणे गरजेचे आहे, जेणेकरून तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रम निवडून स्वतःचे करिअर देखील चांगले बनवू शकता.
आजच्या या लेखामध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या शाखेबद्दल जाणून घेणार आहोत. या शाखेला आजही तितकेच महत्त्व आहे. एकेकाळी कमी मार्क मिळाले म्हणून ही शाखा निवडायची असे अनेक पालक विचार करायचे परंतु आता असे नाही आहे. या शाखेने स्वतःचे रूप बदललेले आहेत. या शाखेच्या अंतर्गत आज नव्या अनेक प्रोफेशनल कोर्सची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच विद्यापीठ आणि वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये या शाखेला द्विगुणीत महत्त्व प्राप्त झाले आहे, चला तर मग जाणून घेऊया त्या शाखेबद्दल…
ही शाखा आज विद्यार्थ्यांना करिअरच्या उंच शिखरावर पोहोचत आहे ती शाखा म्हणजे कॉमर्स शाखा. यालाच आपण मराठीमध्ये वाणिज्य शाखा असे म्हणतो. कॉमर्स स्ट्रीम हा शब्द आपण अनेकदा ऐकलेला आहे. कॉमर्स ऍडमिशन घेताना अनेकदा दहावीनंतर कमी गुण मिळाले तरी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो कारण की या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना देखील करिअरच्या दृष्टीने मार्ग निवडता यावे याकरिता कॉमर्स नेहमी अग्रगण्य पातळीवर राहिलेले आहे.
आजही बँक स्पर्धा परीक्षा अकाउंटंट, फायनान्स सीए, यासारख्या क्षेत्रांमध्ये जर विद्यार्थ्यांना करिअर करायचे असेल तर त्यांना कॉमर्स शिवाय पर्याय नाही म्हणूनच कॉमर्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कॉमर्स मध्ये करिअर करायचा आहे त्यांना भविष्यात वेगवेगळ्या प्रकारचे सध्या उपलब्ध झालेल्या आहेत. मुंबई विद्यापीठ व अन्य भारतातील विद्यापीठांनी देखील शाखा अभ्यासक्रम सुरू केलेले आहे.
बीकॉम म्हणजे काय?
बीकॉम ही कॉमर्स या शाखेमध्ये मिळालेली पदवी आहे, असे आपण म्हणू शकतो. विद्यार्थी बारावीनंतर तीन वर्ष अभ्यासक्रम पूर्ण करून बीकॉम ही पदवी मिळवू शकतो. बारावीनंतर विद्यार्थ्यांना तीन वर्षा अभ्यास केल्यानंतर पदवीधर होता येते. जर तुम्हाला कॉमर्स शाखेत करिअर करायचे असेल तर विद्यार्थ्यांना दहावीनंतर दोन वर्ष कॉमर्स ही शाखा निवडायची आहे आणि त्यानंतर तीन वर्ष कॉमर्स ही शाखा निवडल्यानंतर विद्यार्थ्याला बीकॉम ही डिग्री मिळते.
कॉमर्स या शाखेमध्ये प्रवेश मिळवायचे असेल तर दोन पर्याय असतात. एक दहावीनंतर व बारावीनंतर जर तुम्हाला दहावीला 40 टक्के पेक्षा जास्त मार्क मिळाले असतील तर तुम्ही देखील कॉमर्स शाखेमध्ये प्रवेश घेऊ शकता त्याचबरोबर बारावीनंतर देखील तुम्हाला कॉमर्समध्ये डिग्री म्हणजेच पदवीचे शिक्षण पूर्ण करायचे असेल तर तुम्हाला कमीत कमी 40% मार्क बारावीला मिळालेले असायला हवे.
बीकॉम मध्ये प्रवेश घेतल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या कोर्सेसची देखील माहिती उपलब्ध केली जाते. हल्ली तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की, जागतिकीकरण आणि व्यवसायिक कारणामुळे मोठ्या प्रमाणावर शाखा विस्तारित झालेले आहे आणि हीच गरज म्हणून बीकॉमने देखील आता प्रगती केलेली आहे. बीकॉम पदवी मिळवताना विद्यार्थी बारावीनंतर बी कॉम फायनान्स, बीकॉम इन्शुरन्स, बीकॉम फायनान्स मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, बीकॉम एन्व्हायरमेंटल सायन्स बीकॉम ऍडमिनिस्ट्रेशन अँड इन्शुरन्स बीकॉम अकाउंटिंग अँड फायनान्स यासारख्या प्रोफेशनल कोर्सेस मध्ये देखील प्रवेश घेऊ शकता.
बीकॉम क्षेत्रातील वेगवेगळ्या कोर्स शाखा
प्लेन बीकॉम : प्लेन बीकॉम या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थी तीन वर्ष प्लेन बीकॉम चा अभ्यास करतात म्हणजेच या विषयांमध्ये व अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना कॉमर्स क्षेत्रामध्ये जे विषय असतात त्या सर्वांचा अभ्यास करावा लागतो. या शाखेमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. कमीत कमी 40 ते 50 टक्के मिळायला हवे तसेच जातीनिहाय आरक्षण देखील उपलब्ध होते. या शाखेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थी भविष्यात एम कॉम करू शकतात. त्याचबरोबर अन्य कमर्शियल व व्यावसायिक संस्था येथे वेगवेगळ्या पदावर कार्य करू शकतात.
बी कॉम फायनान्स : बीकॉम फायनान्स या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना फायनान्स संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे विषय व त्यानुसार शिक्षण दिले जाते. तुम्हा सर्वांना माहिती आहे फायनान्स म्हणजे पैसा. हल्ली पैसा हा खूप महत्त्वाचा आहे. वेगवेगळ्या फायनान्शिअल इन्स्टिट्यूट मोठ्या प्रमाणावर सध्या सुरू होत आहेत, अशा ठिकाणी फायनान्शियल व सपोर्टर यासारख्या पदावर काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते तसेच हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम असल्याने विद्यार्थ्यांना प्रोफेशनल डिग्री मिळते. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना फायनान्स संदर्भातील साक्षरता फायनान्स लिटरसी यासारखे विषय शिकविले जातात.
बीकॉम इन्शुरन्स : बीकॉम इन्शुरन्स या अभ्यासक्रमामध्ये इन्शुरन्स म्हणजे विमा. संदर्भातील माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. विमा आपल्या सर्वांना माहिती आहे मनुष्य जीवन जगत असताना हल्ली विमा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. कधी काय घडेल याची शाश्वती नसते आणि म्हणूनच आपण योग्य वेळी केलेली गुंतवणूक, पैसा हा आपल्याला भविष्यकालीन उपयोग ठरू शकतो म्हणूनच विद्यार्थ्यांना आर्थिक गोष्टींचे नियोजन त्याचे व्यवस्थापन आणि इन्शुरन्स यांची सांगड कशाप्रकारे घालता येईल याबद्दलची माहिती या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमांमध्ये दिली जाते.
बीकॉम फायनान्स मॅनेजमेंट : बीकॉम फायनान्स मॅनेजमेंट यामध्ये पैशाचे व्यवस्थापन कसे करायचे फायनान्शिअल स्थिरता आयुष्यामध्ये कसे आणायचे? टॅक्स अकाउंटिंग टॅली यासारख्या विषयाचे सखोल ज्ञान तुम्हाला फायनान्स मॅनेजमेंट या अभ्यासक्रमामध्ये दिले जाते. या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमांमध्ये तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून स्वतःला समृद्ध करू शकता.
इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट : इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला एखादी गुंतवणूक कशी करायची? शेअर मार्केट, एसआयपी, म्युच्युअल फंड होल्डर, शेअर मार्केट संबंधित महत्त्वाच्या घडामोडी याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमामध्ये दिली जाते तुम्हा सर्वांना माहिती आहे आता प्रत्येक जण शेअर मार्केट मध्ये पैसा गुंतवणूक करत असतो तसेच एन एफ टी आर डी पोस्ट यासारख्या बँकिंग क्षेत्राशी संबंधित असलेल्या क्षेत्रांमध्ये कमावलेला पैसा गुंतवत असतो, अशावेळी आपल्या पैसा सुरक्षित कसा राहील तसेच वेगवेगळ्या म्युच्युअल फंड इन्स्टिट्यूशन त्यांचे कार्य इत्यादीचे सखोल ज्ञान या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिले जाते.
बीकॉम एन्व्हायरमेंटल सायन्स : बीकॉम एन्व्हायरमेंटल सायन्स या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण तसेच कॉमर्स यांचे असलेले नातेसंबंध शिकविले जाते तसेच हा अभ्यासक्रम तीन वर्षाचा असून या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून देखील विद्यार्थी एनवोर्मेंटल प्रपोजल एन्वायरमेंटल स्टडीज एनवोर्मेंटल बजेट यासारख्या गोष्टींचा अभ्यास करतात.
बीकॉम ऍडमिनिस्ट्रेशन अँड इन्शुरन्स : बीकॉम ऍडमिनिस्ट्रेशन आणि इन्शुरन्स म्हणजेच बीबीआय या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना टॅली अकाउंटिंग ऑडिटिंग यासारख्या विषयांचे ज्ञान दिले जाते, जेणेकरून भविष्यात बँक व अन्य फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मध्ये काम करताना विद्यार्थ्यांना आर्थिक घडामोडीचे ज्ञान मिळावे या अनुषंगाने विद्यार्थ्यांची तयारी केली जाते.
बीकॉम अकाउंटिंग अँड फायनान्स : बीकॉम अकाउंटिंग अँड फायनान्स या तीन वर्षी अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना अकाउंटिंग आणि फायनान्स व त्या संबंधित असणारे विषय याचे सखोल ज्ञान दिले जाते. विद्यार्थी ही डिग्री मिळून वेगवेगळ्या बँकिंग क्षेत्रामध्ये टेलिकॉम क्षेत्रामध्ये हॉस्पिटल येथे चांगल्या पदावर कार्य करू शकतात.
बीकॉम इन मॅनेजमेंट स्टडीज : बीकॉम इन मॅनेजमेंट स्टडीज म्हणजेच बी एम एस. हा एमबीए करण्याच्या आधी केला जाणारा कोर्स आहे. हा सेल्फ प्रोफेशनल कोर्स आहे. भविष्यात मास्टर डिग्री मिळून तुम्ही देखील एमबीए पूर्ण करू शकतात पूर्वी बी एम एस हा अभ्यासक्रम वेगळा असायचा परंतु या वर्षापासून अनेक विद्यापीठाने बी एम एस हा अभ्यासक्रम कॉमर्स या शाखेमध्येच समाविष्ट केलेला आहे आणि म्हणूनच कॉमर्स या शाखेमध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक सुवर्णसंधी मिळालेली आहे. बिकॉम इन मॅनेजमेंट स्टडीज च्या माध्यमातून विद्यार्थी भविष्यात ह्युमन रिसोर्स फायनान्शिअल मार्केटिंग रिसर्च यासारख्या क्षेत्रांमध्ये स्वतःचे करिअर घडवू शकतात.
बीकॉम इन टॅक्सेशन स्टडी : सर्वसामान्य जीवन जगत असताना आपल्याला अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींवर टॅक्स भरावा लागतो. या टॅक्स संदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी जीएसटी सर्विस व टॅक्स यासंदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी बी कॉम इन टॅक्सेशन स्टडी मध्ये शिकवले जाते. बॅलन्स शीट, टॅली, अकाउंटिंग संदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी या अभ्यासक्रमामध्ये शिकविले जातात. हा सुद्धा एक सेल्फ प्रोफेशन कोर्स असल्याने विद्यार्थ्यांना तीन वर्षाची डिग्री पूर्ण केल्यानंतर लगेचच चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते.
बीकॉम डिग्री मिळवल्यानंतर पुढे काय ?
मित्रांनो वर दिलेल्या माहितीनुसार बीकॉम ही तीन वर्षाची डिग्री आहे या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थी स्वतःचे करिअर घडवू शकतात तसेच विद्यार्थ्यांना तीन वर्ष अभ्यास केल्यानंतर कॉमर्स ही पदवी प्राप्त होते. विद्यार्थी पदवीधर होतो परंतु विद्यार्थ्यांना भविष्यात देखील शिक्षण घ्यायचे असेल तर बीकॉम नंतर देखील वेगवेगळ्या संधी विद्यार्थ्यांकरीता उपलब्ध आहेत. विद्यार्थी बीकॉम नंतर दोन वर्षाचा एम कॉम हा कोर्स देखील करू शकतात त्याचबरोबर बीकॉम केल्यानंतर विद्यार्थी एमबीए, एमए इन अकाउंटिंग, एम कॉम इन अकाउंटिंग, एम कॉम इन इकॉनॉमिक्स यासारख्या विषयांमध्ये स्वतःचे करिअर करू शकतात त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना एमबीए करायचे आहे. लॉ करायचे आहे असे विद्यार्थी देखील बीकॉम नंतर स्वतःचे भवितव्य उज्वल करू शकतात. बीकॉम केल्यानंतर विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी देखील करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी व अन्य स्पर्धा परीक्षा, तलाठी, पोलीस भरती यामध्ये करिअर करायचे आहे असे विद्यार्थी देखील बीकॉम नंतर स्वतःचे भवितव्य उज्वल करू शकतात.
बीकॉम फी
तसे पाहायला गेले तर या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये बीकॉम चे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना जास्त पैसे मोजावे लागत नाही. त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्था व विद्यापीठ यांनी पुरवलेल्या सुविधा नुसार देखील विद्यार्थ्यांकडून फी आकारले जाते. जर विद्यार्थी प्लेन बी कॉम करत असेल तर त्यांची फी 4000 ते 10 हजार वार्षिक असते परंतु जर विद्यार्थी प्रोफेशनल कोर्स म्हणजेच बीबीआय, बीबीए, बीएएफ यासारख्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेत असतील तर त्यांची कमीत कमी फी 20 हजार ते 50 हजार पर्यंत असते म्हणूनच कोणताही अभ्यासक्रम निवडताना संस्थेची फी संरचना देखील तपासणे गरजेचे आहे.
अशाप्रकारे योग्य माहितीच्या आधारे तुम्ही बीकॉम मध्ये स्वतःचे करिअर करू शकतात व शिक्षणाची वाट योग्य पद्धतीने निवडून भविष्य चांगले करू शकतात.
हे पण वाचा: — बीएससी शिक्षण म्हणजे काय?