ॲनिमेशन कोर्स Introduction
विद्यार्थी जीवन जगत असताना आपल्याला अनेक शिक्षणाची आवश्यकता असते. हल्ली काळ बदललेला आहे. पूर्वी पारंपारिक अभ्यासक्रम प्रत्येक विद्यार्थी शिकण्याचा प्रयत्न करायचा त्यामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या शाखांमध्ये प्रामुख्याने विद्यार्थी प्रवेश घ्यायचे परंतु आता तसे नाही.
पारंपरिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेत असताना विद्यार्थी स्वतःचे भवितव्य उज्वल करण्याकरिता अनेक कोर्सेस शिकत असतात त्याचबरोबर चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याकरता देखील सध्या तुमच्याकडे अधिक कौशल्य असणे गरजेचे आहे, असे असल्यास तुम्हाला अनेक महत्त्वाच्या गोष्टी लवकर साध्य करण्याकरिता यश मिळू शकते. आपल्यापैकी अनेकजण दहावी, बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर करिअरची चिंता करत असतात. करिअरच्या वाटेवर जर तुम्ही योग्य अभ्यासक्रम शिकलात तर भविष्य देखील चांगले होते अन्यथा आपल्याला हवे असलेल्या गोष्टी प्राप्त करण्याकरिता वेळ लागू शकतो.
आज आम्ही तुम्हाला अशा एका अभ्यासक्रमाबद्दल सांगणार आहोत, तो अभ्यासक्रम तुम्हाला एक नवीन दिशा दाखवणार आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तुम्ही सध्याच्या डिजिटल मीडियाच्या युगात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याकरिता प्रयत्नशील राहाल त्याचबरोबर या अभ्यासक्रमाला सध्या खूपच मागणी आहे आणि म्हणूनच या अभ्यासक्रमाकडे अनेक विद्यार्थ्यांचा कल देखील दिसून येतो आहे. चला तर मग जाणून घेऊया या अभ्यासक्रमाबद्दल..
आज आम्ही तुम्हाला ॲनिमेशन या अभ्यासक्रमाबद्दल सांगणार आहोत. ॲनिमेशन हा शब्द आतापर्यंत तुम्ही अनेकदा ऐकला असेल. आपल्यापैकी अनेक जण रोज टीव्हीवर वेगवेगळ्या प्रकारचे कार्टून पाहत असतात. हल्ली लहान मुले ते ज्येष्ठ नागरिक यांच्या आवडीचा विषय कार्टून झालेला आहे. अनेकांना तर कार्टून मधील जे वेगवेगळे पात्र आहेत त्यांच्या अनेक वस्तू दैनंदिन जीवनामध्ये हव्या असतात. डोरेमॉन, शिनचॅन यासारखी पात्र अनेकांच्या आवडीची झालेले आहेत परंतु हे पातळी नेमके तयार तरी होतात कशी? त्यामागे नेमकी काय टेक्निकल प्रोसेस असते, हे अनेकांना माहिती नसतं आणि म्हणूनच आज आपण एक महत्त्वाचा अभ्यासक्रम जाणून घेणार आहोत त्याचेच नाव ॲनिमेशन आहे.
जेव्हा आपण टेलिव्हिजनवर चित्रांच्या माध्यमातून तसेच व्यंगचित्राच्या माध्यमातून हालचाली पाहत असतो ते सारे गोष्टी सॉफ्टवेअर ॲनिमेशनच्या माध्यमातून पडद्यावर दाखवले जातात. ॲनिमेशनच्या माध्यमातून जणू ही चित्रे अगदी खरोखर वाटू लागतात हीच ॲनिमेशनच्या अभ्यासक्रमाची कमाल आहे. ॲनिमेशन सध्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. ॲनिमेशन कला क्रीडा आरोग्य यासारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. ॲनिमेशन हा एक अभ्यासक्रम आहे ॲनिमेशन हि एक प्रक्रिया देखील आहे. ॲनिमेशन अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना चित्रपटसृष्टी आरोग्य क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, इंटरियर बांधकाम क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर संधी मिळते.
जर तुम्हाला ॲनिमेशन या क्षेत्रामध्ये करिअर करायचे असेल तर तुमच्या अंगी महत्त्वाचे काही गुण कौशल्य असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला चित्रकला, कॉम्प्युटर, ग्राफिक डिझाईनिंग, लेआउट जमत असेल तर अशावेळी तुम्ही हमखास ॲनिमेशन या क्षेत्रामध्ये स्वतःचे करिअर बनवू शकतात.
सोप्या भाषेमध्ये ॲनिमेशन म्हणजे काय सांगायचे झाल्यास आपल्या समोर असे काही चित्र मांडले जातात व हे चित्र मोशन स्वरूपामध्ये सादर केले जातात. जेणेकरून हे चित्रांची हालचाल होत आहे की काय असा एक आभास निर्माण केला जातो आणि काही तांत्रिक प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्या समोर स्क्रीनवर सादर केले जातात. बॅकग्राऊंडला व्हॉइस देऊन या हलत्या चित्रांची मांडणी केली जाते म्हणूनच जणू काही हे पात्र व चित्र खरोखर आहे की काय असा भास देखील आपल्याला होत असतो यालाच ॲनिमेशन असे म्हणतात.
जर तांत्रिक प्रक्रियेबद्दल बोलायचे झाल्यास ॲनिमेशन ही प्रक्रिया आहे. या प्रक्रिया मध्ये सर्वप्रथम जे काही इमेज असते, त्याचे लेआउट डिझायनिंग केली जाते आणि त्यानंतर मोशन डिझाईनच्या माध्यमातून फ्रेम व केल्यानंतर विज्युअल माध्यमातून आपल्यासमोर सादर केले जाते. यात ग्राफिक डिझाईनिंग, व्हिज्युअल लेआउट या सर्व गोष्टींचा समावेश होतो.
आपल्या डोळ्यांना टेलिव्हिजनच्या माध्यमातून जे ॲनिमेशन दिसते त्यामागे खूप जणांची मेहनत असते जी ही मेहनत करतात त्यांना ॲनिमेटर असे म्हणतात. ॲनिमेटर च्या माध्यमातूनच आपल्या डोळ्यांना ॲनिमेशन द्वारे बनवले गेलेले वेगवेगळे कॅरेक्टर दिसतात. ज्या गोष्टी कठीण असतात त्या गोष्टी चित्राच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने आपल्यासमोर मांडण्याचे कार्य ॲनिमेटर करत असतात.
आतापर्यंत तुम्ही अनेक हॉलीवुड बॉलीवूड चित्रपट पाहिले असतील. त्या चित्रपटांमध्ये ॲनिमेशन आवर्जून वापरले गेलेले आहे उदाहरणार्थ आपल्या सर्वांनी अवतार हा चित्रपट पाहिला असेल अवतर या चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणावर VFX वापरून पत्रांची मांडणी केली गेलेली आहे म्हणूनच ते सारे पात्र आपल्याशी सुसंवाद साधत आहे की काय असे दिसून येते हा अवतार चित्रपट मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाला होता.
आज सुद्धा लोक आवडीने हा चित्रपट पाहतात. या चित्रपटांमध्ये ॲनिमेशन इतक्या चांगल्या पद्धतीने वापरले गेले आहे की जणू काय ते चित्र आभासी न वाटता खरोखर पात्र दिसत असतात. बॉलीवूड मध्ये देखील आपण अनेकदा ॲनिमेशनचा वापर केला गेलेला पाहिला आहे. नुकताच आलेला मुंजा चित्रपट तुम्ही पाहिला असेल. या मुंजा चित्रपटांमध्ये देखील ॲनिमेशनचा वापर करण्यात आलेला आहे. बाहुबली जादू सारख्या अन्य चित्रपटांमध्ये ॲनिमेशनचा वापर केला जातो. एखादी गोष्ट खरोखर दिसण्याकरिता परंतु ती खरी नसते यासाठी जी तांत्रिक पद्धत वापरली जाते याला ॲनिमेशन असे म्हणतात. ॲनिमेटर आपल्या अंगी असणाऱ्या कौशल्य गुणामुळे आणि क्रिएटिव्हिटीमुळे ती गोष्ट वास्तव्यात मांडण्याचा प्रयत्न करत असतो.
पात्रता:
जर तुम्हाला ॲनिमेशन हा अभ्यासक्रम शिकायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला इंग्रजी तसेच कॉम्प्युटरचे बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे.
तुम्हाला कॉम्प्युटर हाताळायला यायला तर हवा पण त्याचबरोबर वेगवेगळ्या एप्लीकेशन सॉफ्टवेअर यांचे देखील माहिती असायला हवी.
तुम्हाला चित्रकला यायला हवी.
तुमच्या अंगी क्रिएटिव्हिटी व वेगवेगळ्या आयडिया मांडण्याची तयारी असायला हवी.
तुम्ही जर दहावी व बारावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही ॲनिमेशनचा अभ्यासक्रम सहज पूर्ण करू शकतात.
दहावी व बारावीला कमीत कमी 50 टक्के गुण असणं गरजेचं आहे. हल्ली अनेक महाविद्यालय अभ्यासक्रमाने ॲनिमेशन हा विषय निवडतात त्याचबरोबर अनेक महाविद्यालयांमध्ये या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याकरिता प्रवेश परीक्षा देखील घेतली जाते.
हा एक व्यवसायिक अभ्यासक्रम असल्याकारणाने अनेक संस्था ॲनिमेशन डिप्लोमा देखील शिकवितात त्याचबरोबर हा अभ्यासक्रम शिकताना तुम्ही खाजगी संस्थान देखील निवडू शकतात.
सध्या बाजारामध्ये अनेक ॲनिमेशन इन्स्टिट्यूशन नव्याने उदयास आलेले आहेत. या संस्था विद्यार्थ्यांना ऍडमिशन देऊन शंभर टक्के प्लेसमेंट देखील देण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर बॉलीवूड इंडस्ट्री मधील अनेक प्रोडक्शन हाऊस स्वतःचे अकॅडमी सुरू करून विद्यार्थ्यांना प्रवेश देखील देतात व त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या प्रोडक्शन हाऊस मध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी संधी देतात. कालांतराने काम करण्याचे विविध पर्याय या विद्यार्थ्यांकरता खुले होतात.
ॲनिमेशनचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना ॲनिमेशन डिग्री सोबतच वेगवेगळे पर्याय देखील उपलब्ध आहेत. विद्यार्थी बॅचलर डिग्री इन ॲनिमेशन, बॅचलर डिग्री इन वि एफ एक्स, बॅचलर डिग्री इन गेमिंग, बॅचलर डिग्री फिल्म मेकिंग ग्राफिक, बॅचलर डिग्री इन ग्राफिक डिझाईनिंग यासारख्या विविध डिग्री मिळवू शकतात.
वेतन
जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे की, ॲनिमेशन हा अभ्यासक्रम पूर्णपणे व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना वेतन देखील मोठ्या प्रमाणावर मिळते त्याचबरोबर तुमच्या अंगी असणारी कला क्रिएटिव्हिटी आणि अनुभव वेगवेगळ्या संकल्पना मांडण्याची शैली या सर्वांच्या आधारे तुम्ही छान पद्धतीने कमवू शकतात सर्वसाधारणपणे ॲनिमेशन हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना महिन्याला 30000 ते 1 लाख रुपये इतका पगार मिळतो.
तुम्ही हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्वतःचे फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट देखील सुरू करू शकतात. हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे यूट्यूब चैनल, प्रोडक्शन हाऊस यांना ॲनिमेटर ची मोठ्या प्रमाणावर गरज असते. अनेक महाविद्यालय वैद्यकीय संस्था वेगवेगळ्या विषयांकरिता ॲनिमेटर आवर्जून नियुक्ती करतात ॲनिमेटरच्या माध्यमातून एखादी संकल्पना अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगितले जाते.
फी
ॲनिमेशन या अभ्यासक्रमाची फी देखील जास्त प्रमाणात असते. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खूप सार्या तांत्रिक सुविधा पुरविल्या जातात तसेच अनेकदा अकॅडमी मधून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेले जाते. प्रत्यक्ष घडणारी प्रक्रिया याचे सखोल ज्ञान दिले जाते म्हणूनच या अभ्यासक्रमाची फी विद्यालय मोठ्या प्रमाणावर आकारात असतात. प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये जर तुम्ही हा अभ्यासक्रम पूर्ण करत असाल तर सर्वसाधारण प्रमाणे एक ते दोन लाख रुपये इतका खर्च तुम्हाला लागू शकतो परंतु एकदा हा अभ्यासक्रम केल्यानंतर काही वर्षातच तुम्ही तुमची फी पूर्णपणे वसूल करू शकतात. इतका पैसा तुम्हाला हा अभ्यासक्रम काही वर्षांमध्ये मिळवून देतो.
हे पण वाचा:- वेब डिझाईनिंग Course