वेब डिझाईनिंग Introduction
मित्रांनो आज आपण एका महत्त्वाच्या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे आपण नवीन युगात जगत आहोत. नवीन तंत्रज्ञान आपल्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर वावरत आहेत. सध्या प्रत्येकाचे जीवन इंटरनेटच्या मदतीने चालू आहे. जर काही सेकंद तरी इंटरनेट बंद झाले तर मोठे मोठे व्यवहार ठप्प होतात. आपला संपर्क तुटला आहे की काय असे जाणू लागते परंतु इंटरनेटच्या या काळामध्ये जगत असताना इंटरनेटच्या मदतीने आपण विविध करिअर देखील निवडू शकतो.
संगणक, लॅपटॉप या सर्व उपकरणाच्या वापरासाठी आपल्याला इंटरनेटची मोठ्या प्रमाणावर मदत होत असते. तुम्हाला देखील अनेकदा मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की दहावी बारावीनंतर नेमकं करावं तरी काय परंतु योग्य ज्ञान व माहिती न मिळाल्यामुळे भविष्य आपले अंधारमय होऊन जाते. अनेकांना तर आपल्या आवडीनिवडी एका विशिष्ट वयानंतर कळू लागतात तोपर्यंत उशीर झालेला असतो.
दहावी बारावी झाल्यानंतर नेमका कोणता अभ्यासक्रम निवडायचा ज्यामुळे आपले करिअर छान बनवू शकते तसेच करिअरच्या दृष्टीने आपल्या अंगी कोणते गुण असायला हवे हे देखील समजत नाही. जर तुमच्या बाबतीत असे काही घडत असेल तर अजिबात चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला एका महत्त्वाच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती सांगणार आहोत. हा अभ्यासक्रम तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी तर देणारच पण त्याचबरोबर तुमच्या स्वप्नांना भरारी देण्याचे कार्य देखील करेल चला तर मग जाणून घेऊया या अभ्यासक्रमाबद्दल.
Web Designing Course information in Marathi
आज आपण ज्या अभ्यासक्रमाबद्दल जाणून घेत आहोत त्या अभ्यासक्रमाचे नाव आहे वेब डिझाईनिंग. वेब डिझाईनिंग हा शब्द अनेकदा तुमच्या कानावर पडले असेल. कॉम्प्युटर इंटरनेट विश्वात काम करत असताना वेब डिझाईनिंग अनेकदा करावी लागते आणि म्हणूनच वेब डिझाईनिंग या क्षेत्रात जर स्वतःचे करिअर घडवायचे असेल तर कॉम्प्युटर इंटरनेट यासारख्या गोष्टींचा देखील अभ्यास करणे गरजेचे आहे.
हल्ली तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर मोबाईल इंटरनेट लॅपटॉपचा सरासर वापर करत असते. आपण अनेकदा गुगल क्रोम व अन्य ब्राउझर यांच्या मदतीने ई-कॉमर्स वेबसाईटच्या मदतीने शॉपिंग देखील करत असतो, अशावेळी जर एखादी वेबसाईट योग्य पद्धतीने काम करत नसेल सर्वर डाऊन असेल तर आपली चिडचिड होते अशावेळी नेमकं काय करायचं कोणकोणते सर्वर एरर असतात ते कसे शोधायचे एखादी वेबसाईट कशा पद्धतीने डिझाईन करायची या सर्वांचे ज्ञान व शिक्षण देणारी शाखा अभ्यासक्रम म्हणजे वेब डेव्हलपिंग म्हणजेच वेब डिझाइनिंग.
जर वेब डिझाईनिंग बद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास एकही तांत्रिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून वेबसाईट चांगल्या पद्धतीने कार्य करते. यासाठी वेब डिझायनरला वेगवेगळ्या गोष्टींची गरज ठरते. जी व्यक्ती वेबसाईट डेव्हलप करते, डिझाईन करते, वेबसाईटचा लुक कसा असेल कोणकोणते टॅब वेबसाईट साठी उपयुक्त ठरतील फॉन्ट, कलर, टेक्स साईज, फोटोज, व्हिडिओ मल्टीमीडिया या सर्वांचा विचार करते तसेच वेबसाईट योग्य पद्धतीने काम करावी यासाठी प्रयत्न करते त्या व्यक्तीला वेब डिझायनर असे म्हणतात. जेव्हा आपल्याला वेब डिझाईनिंग करायचे असते तेव्हा प्रामुख्याने वेबसाईटवर जो कंटेन आहे त्याच्याबद्दल प्रामुख्याने विचार करावा लागतो.
पेज लेआउट, ग्राफिक डिझाइनिंग या सर्व घटकांचा देखील प्रामुख्याने विचार करावा लागतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की, एखादी वेबसाईट जर डिझाईन करायची असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या लँग्वेजचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो जसे की एच टी एम एल, सी प्लस प्लस, जावा या सर्वांच्या माध्यमातून वेबसाईटची निर्मिती केली जाते.
वेबसाईट बनवण्यासाठी एचटीएमएल म्हणजे हायपर टॅक्स मार्क लँग्वेज या भाषेचा उपयोग केला जातो. वेगवेगळे वेब पेज तयार करून त्यांना जोडून एक वेबसाईट तयार होते हे सारे वेब पेज एकमेकांसोबत लिंक केलेले असतात आणि म्हणूनच जेव्हा आपल्याला एखादी माहिती हवी असते तेव्हा थेट त्या माहितीवर जाण्यासाठी काही तांत्रिक प्रक्रिया पडद्यामागे घडत असतात. त्या प्रक्रियेच्या माध्यमातूनच आपल्याला हवी असलेली माहिती थेट आपण एखाद्या टॅब वर क्लिक करून सहज वाचू शकतो व त्या माहितीचा लाभ घेऊ शकतो. जर तुम्हाला तांत्रिक गोष्टीमध्ये रस असेल कॉम्प्युटर, लॅपटॉप ,वेबसाईट संदर्भातील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही देखील वेब डिझाईनिंग हा कोर्स आवश्य करू शकतात. या कोर्ससाठी काही पात्रता आहेत त्या पात्रता जाणून तुम्ही या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ शकता.
पात्रता
जर तुम्हाला वेब डिझाईनिंग हा अभ्यासक्रम शिकायचा असेल तर त्यासाठी फारशी काही पात्रता महत्त्वाचे नसते. जसे की हा एक टेक्निकल कोर्स असल्यामुळे तुम्हाला टेक्निकल गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे त्याचबरोबर जर तुम्हाला एचटीएमएल लैंग्वेज, गूगल क्रोम व अन्य ब्राउझर यांच्या बद्दल रस असेल ते कशाप्रकारे काम करतात तरी तुम्ही वेब डिझायनिंग हा कोर्स करू शकता. वेब डिझाईन करण्यासाठी तुम्हाला दहावी किंवा बारावी तसेच डिग्री नंतर देखील तुम्ही हा अभ्यासक्रम करू शकता. हा एक ऍडव्हान्स प्रोग्रामिंग कोर्स आहे. विद्यार्थी स्वतःच्या अंगी असणाऱ्या गुणकौशल्य व क्षमता यांच्या आधारावर सहजरीत्या हा अभ्यासक्रम करू शकतो.
वेब डिझायनिंग हा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना विद्यार्थ्यांना बेसिक इंग्लिश इंग्लिश येणे गरजेचे आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या लँग्वेजचे काही शॉर्ट फॉर्म्स आहेत त्याचे ज्ञान देखील असणे गरजेचे आहे.
हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विशिष्ट वयाची मर्यादा नाही परंतु योग्य समज असणं गरजेचं आहे.
हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे सॉफ्टवेअर हाताळण्याची कला असणे गरजेचे आहे.
बेसिक कॉम्प्युटर नॉलेज, कम्युनिकेशन, लोकांशी बोलण्याची कला समजून घेण्याची कला, सॉफ्टवेअर एप्लीकेशन हाताळण्याची कला जर तुमच्या अंगी असेल तर तुम्ही वेब डिझाईनिंग हा अभ्यासक्रम सहजच शिकू शकता.
वेब डिझायनिंग कोर्स शिकत असताना त्यामध्ये प्रकार देखील वेगवेगळ्या असतात. तुम्ही वेब डिझाईनिंग, वेबसाईट एडेटिंग, प्रोग्रामिंग यासारखे विविध प्रकार शिकू शकतात तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देखील दिले जाते. सर्वसाधारणपणे सहा महिने तर तीन वर्ष इतका कालावधीचा असतो. विद्यार्थी तीन वर्षाची पदवी देखील वेब डिझाईनिंगची मिळवू शकतात. तुमच्याकडे असलेली पदवी व डिप्लोमा कोर्स चे सर्टिफिकेट या माध्यमातून तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी देखील करू शकतात.
सध्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये वेब डिझाईनिंग अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते. आयटी इंडस्ट्री, फार्मा इंडस्ट्री, हेल्थकेअर, एज्युकेशन यासारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वेब डिझाईनिंग केलेल्या तरुणांना संधी असते. एखादी संस्था यांना बाहेरच्या जगासोबत संवाद साधायचे असेल तर वेबसाईट उत्तम असणे गरजेचे आहे आणि उत्तम वेबसाईट निर्माण करण्याचे कार्य वेब डिझायनर करत असतात. वेब डिझायनर या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना मोठी जबाबदारी देखील असते. वेबसाईटवर युजर ची संख्या तसेच आपल्या टार्गेट ऑडियन्सला कशाप्रकारे एंगेज करायचे याबद्दल देखील वेब डिझायनरला आणि गोष्टी मनामध्ये ठेवून काम करावे लागते. आपला युजर जास्तीत जास्त आपल्या वेबसाईटवर कसा एंगेज राहू शकतो त्याला वेबसाईट हाताळणे कसे सोपे होऊ शकते याचा विचार देखील वेबसाईट डिझायनरला करावा लागतो.
वेब डिझायनिंग अभ्यासक्रम केल्यानंतर होणारे फायदे :
वेब डिझाईनिंग हा अभ्यासक्रम सेल्फ प्रोफेशनल कोर्स असल्याने भविष्यात व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी ठरू शकते त्याचबरोबर सध्या आपण 21 व्या शतकात जगत आहोत. मोठ्या प्रमाणावर ई कॉमर्स कंपनी व सर्व संस्था स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने जास्त भर देत आहेत, अशावेळी वेबसाईट डेव्हलपिंग वेब डिझाईनिंग करणं उत्तम ठरत आहेत. आपल्या लक्षात ग्राहक वर्गाशी वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधण्याकरिता वेगवेगळ्या व्यवसाय संस्था मोठ्या प्रमाणावर पैसा देखील खर्च करत असतात तुम्ही वेब डिझाईनर बनवून तुमच्या कंपनीची वेबसाईट अगदी उत्तम बनवू शकता. वेब डिझायनरला भविष्यात चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळते तसेच वेतन देखील दिले जाते.
वेब डिझायनिंग हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुमच्या अंगी असणारे कौशल्य तुमच्या क्रिएटिव्ह आयडिया तुम्हाला लोकांसमोर मांडता येतात.
हा अभ्यासक्रम पूर्ण करून तुम्ही फ्रीलान्सिंग वर्क देखील करू शकतात. ऑनलाइन पद्धतीने पैसे मिळवण्यासाठी वेब डिझाईनर हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो.
तुम्ही वेब डिझायनर आहात आणि तुम्हाला ग्राफिक डिझाईनिंग व्हिडिओ डिझाईनिंग एडिटिंग येत असेल तर तुम्ही खूप साऱ्या गोष्टी घरबसल्या करू शकतात
वेब डिझायनर हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही वेब डेव्हलपर , एप्लीकेशन डेव्हलपर गेम डेव्हलपर, वेब प्रोग्रामर, मल्टीमीडिया प्रोग्रामर, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन स्पेशलिस्ट वेब कन्टेन्ट मॅनेजर, कन्टेन्ट रायटर, डेटा स्पेशालिस्ट यासारख्या महत्त्वाच्या पदावर काम करू शकतात.
वेतन
वेब डिझाईनिंग हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळते. जर तुमच्या अंगी क्रिएटिव्हिटी असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या कंपनी सहजच कामावर रुजू करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळ्या पदांवर काम करत असताना तुमच्या अनुभवानुसार देखील पगार मिळू शकता. सर्वसाधारणपणे वेब डिझाईनिंग हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर उमेदवाराला 30000 ते 60000 इतका पगार दरमहिना मिळतो. त्याचबरोबर जर तुम्ही मल्टिनॅशनल व इंटरनॅशनल कंपनीमध्ये काम करत असाल तर तुम्ही लाखाच्या घरात पैसे कमवू शकतात.
हे पण वाचा:- इंटेरियर डिझाईनिंग कोर्से माहिती मराठीत