इंटेरियर डिझाईनिंग Introduction
मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एका अत्यंत महत्त्वाच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत. तुम्हा सर्वांना माहिती आहे की, हल्लीचा काळ बदललेला आहे. प्रत्येकाला काहीतरी नवीन करण्याचा ध्यास लागलेला आहे. नवीन करण्याच्या नादामध्ये अनेकदा पारंपारिक गोष्टींकडे दुर्लक्ष देखील होत परंतु बहुतेक वेळा पारंपारिक अभ्यासक्रम करत असताना काहीतरी नव्याने शिकणे देखील गरजेचे आहे.
काळ बदलत असल्याने नवीन गोष्टी आत्मसात करायला हव्या. जर तुम्ही नवीन गोष्टी शिकल्या तर भविष्यात त्याचा उपयोग देखील होऊ शकतो. आपल्या आजूबाजूला अनेक घर, बंगले, रो हाऊस आपण पाहत असतो. काही बंगल्यांना पाहिल्यावर आपल्या मनामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न देखील निर्माण होतात.
घराची बांधणी कशी केली असेल घर सजावट कशाप्रकारे असेल नेमकी कशाची काळजी घेतली असेल किंवा बांधकाम किती वर्ष जुनं असेल अशा विविध प्रश्नांची उत्तरे आपण शोधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनात देखील अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होत आज आम्ही तुम्हाला ज्या अभ्यासक्रमाबद्दल सांगणार आहोत, तो अभ्यासक्रम अत्यंत तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्या अभ्यासक्रम बद्दल..
आज आपण इंटरियर डिजाइनर म्हणजे नेमकं काय असतं? इंटरियर डिझाईन या क्षेत्रात कशा प्रकारच्या संधी असतात. हा अभ्यासक्रम जर शिकायचा असेल तर आपल्याला काय करणे गरजेचे आहे तसेच प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी असते याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.
आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळ्या स्थळांना भेट देण्याची आवड असते. फिरायची आवड असते, अशावेळी एखाद्या हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये किंवा बाग बगीचा मध्ये गेल्यानंतर तिकडची सजावट पाहून आपण भुलून जातो. ही सजावट नेमकी कशा प्रकारे केली असेल घर बनवताना आपण आपले घर देखील एकदाच विकत घेत असतो मग अशावेळी घर सजावट जर आपल्या मनासारखी झाली तर घरामध्ये राहायला देखील मजा येते.
घराची रंग रूपरेषा, रंग संगती, घरामध्ये नेमक्या कोणकोणत्या वस्तू ठेवायच्या या सर्व गोष्टींचे सखोल ज्ञान अनेकदा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे, अशावेळी आपल्या घराची काळजी घेण्याचे कार्य इंटरियर डिझायनर करत असतात. इंटरियर डिझायनर तुम्हाला कमी जागेमध्ये कशाप्रकारे सुंदर घर बनवता येईल याची आखणी मांडणी करत असतात आणि म्हणूनच सध्याच्या घडीला इंटेरियर डिझाईन हा अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणात तरुणांच्या पसंतीचा ठरलेला आहे.
इंटरियर डिझाईनिंग हा अभ्यासक्रम तुम्हाला ज्ञानी बनवत नाही तर तुमच्या स्वप्नांना देखील सजवण्यास कार्य करत असतो आणि म्हणूनच इंतटेरीअल डिझाईनिंग हा अभ्यासक्रम अनेक महाविद्यापीठ व विद्यालयांमध्ये आवर्जून अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला गेलेला आहे. हा एक प्रोफेशनल अभ्यासक्रम हे विद्यार्थ्यांना पारंपारिक ज्ञान पद्धतीच्या माध्यमातूनच व्यावसायिक दृष्टिकोनातून सक्षम बनवणे हे या अभ्यासक्रमाचे ध्येय आहे.
या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी पदवी मिळवितात आणि चांगल्या ठिकाणी नोकरी देखील मिळवतात अनेक उमेदवार स्वतःचे फ्रीलान्सिंग कामदेखील सुरू करतात. इंटरियर डिझायनिंग कंपनी उघडून डिझायनर म्हणून देखील काम पाहतात. सध्या या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर तरुणांचा कल दिसून येतो परंतु नेमके या क्षेत्रात प्रवेश कसा करायचा याबद्दलची अनेकांना माहिती नसते, ही माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.
या फॅशनच्या दुनियेमध्ये सगळ्या गोष्टीला खूपच महत्त्व आहे. घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर घराच्या भिंतीला नेमका कोणता रंग असायला हवा घरातील टाइल्स कशा असायला हवा. घरामध्ये सोफा कसा असायला पाहिजे. गॅलरी बेडरूम मध्ये लाईट कशी असायला हवी. झाडे कुंड्या त्यांचा रंग आकार इत्यादी सर्व गोष्टींचा विचार करणारी जनता आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर जर तुम्ही क्रिएटिव्ह माईंड असाल तर नवलच तुम्ही या सगळ्या गोष्टींचा अगदी बारकाईने विचार करत असतात. या सर्व गोष्टींची अगदी ईत्तम भूत माहिती निरीक्षण पद्धतीने या विचार करण्याचे कार्य इंटरियर डिझायनर करत असतात. इंटेरीअल डिझाईन तुमचे घर सजवत नाही तर तुमच्या स्वप्नांना आयाम देण्याचा प्रयत्न देखील करत असतात.
अनेकांना इंटेरियर डिजाइनर तसेच इंटरियर डिझाईन म्हणजे नेमकं काय हे देखील माहिती नसते तसं पाहायला गेलं तर याचा अर्थ अंतर्गत सजावट किंवा आराखडा अशा पद्धतीत सोप्या भाषेत आपण म्हणू शकतो. अंतर्गत सजावट ही सध्या घरापुरताच मर्यादित नाही तर अनेकदा औद्योगिक वसाहती हॉटेल, रेस्टॉरंट, शाळा, कॅफे, हॉस्पिटल या सर्व ठिकाणी एक सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे याकरिता इंटेरीअल डिजाइनर मोठ्या प्रमाणावर मदत करत असतात.
पात्रता :
इंटेरियर डिझाईनिंग हा कोर्स करण्यासाठी पात्रता देखील ठरवण्यात आलेले आहे. अनेक महाविद्यालय व विद्यापीठ या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी काही प्रवेश परीक्षा देखील नियोजित करतात. प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून देखील विद्यार्थ्यांना प्रवेश दिली जाते. अनेक महाविद्यालय व कॉलेज इंटरियर डिप्लोमा देखील अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शिकवतात. विद्यार्थी आपल्या पसंतीनुसार पदवी किंवा डिप्लोमा देखील पूर्ण करू शकतात अनेकदा शासकीय व खाजगी संस्था देखील मोठ्या प्रमाणात या अभ्यासक्रमाची विद्यार्थ्याकडून तयारी करून घेतात.
पूर्वी या क्षेत्रामध्ये जर उमेदवाराला यायचे असल्यास त्याच्या अंगी चित्रकला असणं गरजेचं होतं परंतु काळ बदलल्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या सॉफ्टवेअर च्या माध्यमातून देखील या क्षेत्रात प्रवेश करू शकतात. तुम्हाला डिझाईनिंग ची आवड असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे एखाद्या विषयावर विचार करण्यासाठी सर्जनशीलता असणे गरजेचे आहे म्हणजेच तुमच्या अंगी क्रिएटिव्हिटी असायला हवी. इतरांपेक्षा वेगळं तुम्ही विचार करणं अपेक्षित आहे.
इंटरियर डिजाइनर हा अभ्यासक्रम निवडताना विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
उमेदवार आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणत्याही शाखेतील विद्यार्थी इंटरियर डिजाइनर हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. विद्यार्थ्याला कमीत कमी 50 टक्के मार्क मिळवून तो या शाखेत प्रवेश करू शकतो.
हा अभ्यासक्रम तुम्ही तुमचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर देखील करू शकतात. एका वर्षाचा डिप्लोमा तसेच तीन वर्षाची पदवी देखील या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना अनेक भाषांची माहिती असणे गरजेचे आहे. मुळात इंग्रजी देखील येणे गरजेचे आहे. तुम्हाला हा अभ्यासक्रम करत असताना वेगवेगळे क्लाइंट भेटू शकतात, अशावेळी त्यांच्याशी इंग्लिश मध्ये बोलणं गरजेचं आहे. तुम्ही हिंदी मराठी किंवा अन्य प्रादेशिक भाषेच्या माध्यमातून देखील स्वतःवर वर्चस्व मिळू शकतात.
जर तुम्हाला इंटेरीअल डिजाइनर बनायचं असेल तसेच आर्किटेक्चर संदर्भातील काही अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल तर अशावेळी नाटा ही प्रवेश परीक्षा तुम्हाला द्यावी लागते. नाटा ही एक वास्तू कला शास्त्र संदर्भातील परीक्षा आहे. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी आर्किटेक्चर या अभ्यासक्रमामध्ये स्वतःचे करिअर बनवू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर बनवणे शक्य नसेल तर असे विद्यार्थी इंटरनेट डिजाइनर बनू शकतात तसेच डिप्लोमा देखील करून स्वतःचे करिअर उज्वल बनवू शकतात.
इंटीरियर डिझायनिंगमध्ये चांगले करिअर
आर्किटेक्चर म्हणजेच इंटेरीअल डिझाईनिंग हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना भविष्यात संधी देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. विद्यार्थी डिझाइनिंग, ग्राफिक डिझाईनिंग फाईन आर्ट, क्रिएटिव्ह हेड , बांधकाम क्षेत्र, तंत्रज्ञान क्षेत्र यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये डिझायनर म्हणून काम करू शकतात.
जर तुम्हाला डिझाईनिंग करायचं असेल तर शॉर्ट टर्म डिप्लोमा कोर्सेस देखील उपलब्ध आहेत. हे डिप्लोमा कोर्स करून तुम्ही प्रमाणपत्र मिळवून स्वतःचा फ्रीलान्स व्यवसाय देखील सुरू करू शकतात.
हा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना विद्यार्थ्यांना इंटरशिप देखील करावी लागते. या इंटरशिपच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःचे वेगवेगळे डिझाईन तयार करून क्लायंट समोर सादर करत असतात तसेच अनेकदा विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कला डिझाईनिंग या सर्वांचे प्रदर्शन देखील भरवले जाते.
हा अभ्यासक्रम केल्यानंतर तुम्हाला इंटरियर डेकोरेटर, इंटरियर कन्सल्टंट, क्रिएटिव्ह मॅनेजर, इंटरियर ऑडिटर, इंटेरियर प्रॉडक्ट, मॅनेजर प्रोडक्ट डिझायनर, इंटेरियर फोटोग्राफर यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात सुवर्णसंधी आहे.
फी :
जर तुम्हाला इंटरियर डिझाईनिंग हा अभ्यासक्रम निवडायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला पैसे देखील मोजावे लागतात. तुम्ही महाविद्यालय व विद्यापीठ नेमक्या तुम्हाला कोणत्या सुविधा पुरवतात यानुसार विद्यार्थ्यांकडून फी घेतली जाते. सर्वसाधारणपणे पन्नास हजार ते पाच लाख इतकी या अभ्यासक्रमाची फी असते. अनेक महाविद्यालयांमध्ये इंटरीअल डिझाईनिंगची पदवी मिळवल्यानंतर विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देखील दिले जाते.
इंटिरियर डिझाईन ही जास्त पगाराची नोकरी आहे का?
तुम्ही इंटरियर डिझाईन हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला वेतन देखील तितक्यास चांगल्या पद्धतीचे मिळते. हा एक प्रोफेशनल कोर्स असल्याने अनेक क्लायंट तुम्हाला मिळत असतात तसेच एखादे घर बंगला व काम यावर तुम्ही तुमचे दर ठरवत असतात. सर्वसाधारणपणे पन्नास हजार ते पाच लाख पर्यंतचे वेतन तुम्ही या क्षेत्रातून मिळू शकतात. तुमचे स्वतःची कंपनी असेल तर तुम्ही लाखोच्या घरामध्ये महिन्याला कमावू शकतात. अनेक जण स्वतःचे फ्रीलान्सिंग वर्क सुरू करतात असे उमेदवार देखील महिन्याला 50 ते 60000 रुपये सहज कमवतात. तुमच्या अंगी असणारी कलागुणशैली क्रिएटिव्हिटी यामुळे देखील तुम्हाला काम मिळते आणि त्यानुसार तुम्ही तुमचे दर ठरवू शकतात.