BSC Information in Marathi
आज आम्ही तुम्हाला BSC Information in Marathi म्हणजेच बीएससी सायन्स बद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. मित्रांनो नुकतेच वेगवेगळ्या परीक्षांचे निकाल जाहीर झालेले आहेत. प्रत्येकाला आपल्या भविष्याचे वेध लागलेले आहे. भविष्यात कोणता अभ्यासक्रम निवडायचा. कोणत्या शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा याच्याबद्दल सगळीकडे विचार देखील केले जात आहेत. अनेक मंडळी तज्ञांकडे जाऊन मार्गदर्शन देखील घेत आहेत. अनेक विद्यार्थी पालकांसोबत कॉलेज – विद्यापीठ वेगवेगळ्या संस्था यांच्या चकरा देखील मारत आहेत आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एका महत्त्वाच्या कोर्स बद्दल सांगणार आहोत. तसे पाहायला गेले तर दहावी व बारावी झाल्यानंतर पारंपारिक पद्धतीने आई-वडील आपल्याला जास्त मार्क मिळाले तर सायन्स म्हणजे विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घ्यायला सांगतात कमी मार्क मिळाले तर विज्ञान आणि त्यापेक्षा कमी मार्क मिळाले तर आर्ट्स. अनेकदा ही साखळी आपल्याला पाहायला मिळते.
परंतु जर तुम्हाला जास्त मार्क मिळालेले असतील भविष्यात चांगले करिअर करायचे असेल तर मित्रांनो बीएससी सायन्स हा डिग्री अभ्यासक्रम आहे. या कोर्समुळे तुम्हाला भविष्यात वेगवेगळ्या संधींचा लाभ घेता येणार आहेत. आपले भविष्य उज्वल बनवता देखील येणार आहे. ही एक मोठी शाखा आहे. या शाखेमध्ये तुम्ही तुमच्या अंगी असणाऱ्या गुण कौशल्यामुळे स्वतःचे करिअर बनवू शकतात. बीएससी सायन्स करण्यासाठी तुम्हाला दहावीनंतर अकरावी बारावी सायन्स शाखेमध्ये करणे गरजेचे आहे त्यानंतरच तुम्ही पुढचे तीन वर्ष शिकून बीएससी सायन्स ही डिग्री पूर्ण करू शकता. चला तर मग जाणून घेऊया बीएससी सायन्स म्हणजे नेमकं काय असतं? बीएससी सायन्स मध्ये भविष्यात कोणकोणत्या संधी आहेत तसेच बीएससी सायन्स मध्ये वेगळे कोणकोणत्या अभ्यास क्रम आहेत ज्यामुळे तुम्ही पारंपारिक पद्धतीने कोर्स करत असतानाच व्यावसायिक दृष्ट्या देखील कसे सक्षम बनवू शकता याबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊया…
सध्या जरी माहिती तंत्रज्ञान युग असले तरी बीएस्सी मध्ये तुम्ही उज्वल भविष्य करू शकता परंतु अनेकांना बीएससी सायन्स म्हटले की फक्त तीन वर्ष अभ्यासक्रम करायचा आणि डिग्री मिळवायची इतकच माहीत असतं परंतु असे नाहीये. बीएससी मध्ये देखील अनेक शाखा आहेत आणि या सर्व शाखांचा अभ्यासक्रम वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये आवर्जून शिकवला जातो.
बीएससी भौतिकशास्त्र, बीएससी रसायनशास्त्र, बीएससी जीवशास्त्र , प्राणीशास्त्र, गणित शास्त्र, वनस्पतीशास्त्र या व्यतिरिक्त देखील बीएससी मध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यासक्रम शिकविले जातात याबद्दल फारशी अनेकांना माहिती नसते.
जे विद्यार्थी बी एस सी मध्ये आपले शिक्षण पूर्ण करतात त्यांना भविष्यात चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळते त्याचबरोबर अन्य असे काही क्षेत्र आहेत जिथे सध्याच्या दिवसांमध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळते त्याचबरोबर शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना चांगली मागणी देखील आहे.
बीएससी आयटी : हा अभ्यासक्रम करण्यासाठी 12 वी नंतर तुम्हाला तीन वर्ष बीएससी आयटी करावी लागते. हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम असून यामध्ये सहा सेमिस्टर चा अभ्यास करावा लागतो. बीएससी आयटी म्हणजेच माहिती तंत्रज्ञान या अभ्यासक्रमांमध्ये कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, हार्डवेअर, नेटवर्किंग, प्रोग्रामिंग लँग्वेज यांचा अभ्यास शिकविला जातो. या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला बारावीला मॅथ्स, फिजिक, आणि केमिस्ट्री विषय असायला हवेत तसेच कमीत कमी 45 ते 50 टक्के मिळवून विद्यार्थी उत्तीर्ण असायला हवा.
बीएससी कॉम्प्युटर सायन्स : बीएससी कॉम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला बारावी सायन्स असणे गरजेचे आहे. तसेच मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री विषय घेऊन बारावीला कमीत कमी 40 ते 50 टक्के पास असणे गरजेचे आहे. हा तीन वर्षाचा कोर्स असून सहा सेमिस्टर चा अभ्यास केला जातो. हार्डवेअर सॉफ्टवेअर, एप्लीकेशन, नेटवर्किंग लैंग्वेज यांचे शिक्षण दिले जाते.
बीएससी कॉम्प्युटर एप्लीकेशन: बीएससी कॉम्प्युटर एप्लीकेशन या शाखेत प्रवेश घेताना विद्यार्थ्याला कॉम्प्युटर संदर्भातील वेगवेगळे एप्लीकेशन, नेटवर्किंग, डेटाबेस स्टोरेज, डेटाबेस स्ट्रक्चर, वेब नेटवर्किंग यासारखे कॉम्प्युटर संदर्भातील विषयी शिकविले जातात तसेच या शाखेमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला बारावी सायन्स उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
बीएससी ॲनिमेशन : सध्या मोठ्या प्रमाणावर ॲनिमेशन, ग्राफिक डिझाईनिंग, व्हिडिओ एडिटिंग यासारख्या क्षेत्राला मागणी आहे आणि म्हणूनच बारावीनंतर बीएससी ॲनिमेशन हा कोर्स देखील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. या कोर्समध्ये तुम्हाला ग्राफिक डिझाइनिंग, व्हॉइस मॉड्युलेशन, टेक्नॉलॉजी मॉड्युलेशन यासारखे विषय शिकविले जातात.
बीएससी एग्रीकल्चर : आपल्या सर्वांना माहिती आहे भारत देश हा कृषिप्रधान देश असला तरी शेती संदर्भातील माहिती मिळवण्यासाठी अनेकांना उत्सुकता असते आणि म्हणूनच ज्या विद्यार्थ्यांना शेती विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रात करिअर करायचे आहे अशांसाठी बीएससी एग्रीकल्चर हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना तीन वर्ष शेती संदर्भातील माहिती तसेच विषयाचे ज्ञान दिले जाते, त्याचबरोबर वेगवेगळ्या संशोधन संस्था, कृषी संस्था येथे कृषी अधिकारी म्हणून देखील तुमची नेमणूक होऊ शकते.
बीएससी बायोटेक्नॉलॉजी :
बीएससी बायोटेक्नॉलॉजीला देखील सध्या मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. वेगवेगळ्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये तसेच रीसर्च इंडस्ट्रीमध्ये बीएससी बायोटेक्नॉलॉजी पूर्ण केलेल्या उमेदवाराला चांगला पॅकेज देखील मिळतो. या शाखेमध्ये जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला बारावी सायन्स उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बायोटेक्नॉलॉजी मध्ये तुम्हाला गुणसूत्र शास्त्र जीवसूत्र शास्त्र या संदर्भातील अनेक विषयांचा अभ्यास शिकविला जातो.
बीएससी मायक्रोबायोलॉजी : बीएससी मायक्रो बायोलॉजी हा तीन वर्षाचा कोर्स असून या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला मायक्रोबायोलॉजी तसेच संशोधन संदर्भातील आवश्यक विषय शिकविले जातात तसेच आपल्या सर्वांना माहितीच असेल की कोरोना काळाच्या दरम्यान अनेक मोठ्या प्रमाणावर औषधे संशोधन केली गेली. जर तुम्हाला देखील फार्म ड्रग इंडस्ट्रीमध्ये रस असेल तर बीएससी मायक्रोबायोलॉजी तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.
बीएससी फूड टेक्नॉलॉजी: हा अभ्यासक्रम सध्या मोठ्या प्रमाणावर विचारात घेतला जातो तसेच बीएससी फुल टेक्नॉलॉजी डिग्री मिळवलेल्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही आंतरराष्ट्रीय तसेच शासकीय खाद्यपदार्थ संस्थेमध्ये अन्न अधिकारी म्हणून काम करू शकता. खाद्यपदार्थ अन्नपदार्थ, चाचणी, सुरक्षा संशोधन यांचा अभ्यास बीएससी फूड टेक्नॉलॉजी मध्ये शिकविला जातो.
बीएससी नर्सिंग:
बीएससी नर्सिंग या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्याकरिता बारावी सायन्स उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. हा तीन वर्षाचा कोर्स असतो. हा नर्सिंग कोर्स केल्यानंतर तुम्ही कोणत्याही खाजगी किंवा शासकीय रुग्णालयात नर्स किंवा ब्रदर म्हणून काम करू शकता. या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला वैद्यकीय चाचण्या, वैद्यकीय संशोधन, वैद्यकीय बाबी इत्यादींचे शिक्षण दिले जाते. हा कोर्स सध्या अनेक महाविद्यालयांमध्ये चालविला जातो आणि त्याचबरोबर त्याच महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी देखील मिळते आणि म्हणूनच जर भविष्यात तुम्हाला नर्सिंग क्षेत्रात करिअर करायचा असेल तर बीएससी नर्सिंग हा उत्तम कोर्स ठरू शकतो.
कौशल्ये:
जे विद्यार्थी भविष्यात बीएससी सायन्स करणार आहेत त्यांच्या अंगी काही गुण कौशल्य असणे गरजेचे आहे त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे सध्या संशोधन मोठ्या प्रमाणावर केले जाते म्हणूनच संशोधनाची समस्या व त्याचे सूत्रीकरण, समस्या ओळखण्याचे ज्ञान, गणित शास्त्र तार्किक शास्त्र संगणकाचे ज्ञान, रसायनशास्त्राचे ज्ञान आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडी यांचे ज्ञान इत्यादी कौशल्य विद्यार्थ्यांच्या अंगी असणं गरजेचं आहे.
सध्या वेगवेगळ्या महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये बीएससी सायन्स व त्यांच्या अंतर्गत असलेल्या विविध अभ्यासक्रमाचे नियोजन चांगल्या पद्धतीने केले जाते आपल्या आजूबाजूला असे अनेक महाविद्यालय असतात जेथे तीन वर्षाचा अभ्यासक्रम अगदी उत्तम पद्धतीने शिकविला जातो.
या शैक्षणिक संस्थेमध्ये बीएससी सायन्स मधील महत्त्वाचे कोर्स शिकवले जातात
- मुंबई विद्यापीठ
- सावित्रीबाई फुले विद्यापीठ,
- कलकत्ता युनिव्हर्सिटी
- मराठवाडा विद्यापीठ
- गुजरात युनिव्हर्सिटी
अशा विविध ठिकाणी बीएससी सायन्स अभ्यासक्रम शिकविले जातात..
भविष्यकालीन संधी:
जे उमेदवार बीएससी सायन्स पदवी प्राप्त करतात त्या उमेदवारांना भविष्यात चांगल्या ठिकाणी नोकरी देखील प्राप्त होते. अनेक महाविद्यालय व विद्यापीठे कॅम्पस इंटरव्यू च्या माध्यमातून मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांची निवड करतात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन व योग्य ते प्रशिक्षण देऊन त्यांना दरमहा चांगला पगार देखील देतात तसेच बीएससी सायन्स पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना साधारणतः तीन लाख ते 50 लाख पर्यंत वार्षिक पॅकेज दिला जातो. इन्फोसिस, आयटी पार्क, टीसीएस रिलायन्स, फार्म इंडस्ट्री, हॉस्पिटल अशा विविध क्षेत्रात बीएससी सायन्स पूर्ण केलेल्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
बीएससी नंतर पुढे काय ज्या उमेदवारांचे शिक्षण पूर्ण झालेले आहे त्यांना भविष्यात वेगवेगळ्या करिअरच्या संधी हमखास उपलब्ध होतात नंतर तुम्ही मास्टर कोर्स देखील करू शकता त्याचबरोबर मास्टर्स एमबीए, एमसीए, हा पर्याय देखील तुम्हाला खुला आहे. जर तुम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये करिअर करायचे असेल तर अशावेळी एमएससी केल्यानंतर तुम्ही महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून देखील रुजू होऊ शकता त्याचबरोबर भविष्यात बीएससी व एमएससी करून पीएचडीचे शिक्षण पूर्ण करून डॉक्टरेट देखील मिळवू शकता. शैक्षणिक क्षेत्रात करिअर करायचा असेल तर तुम्हाला नेट सेट हा देखील उत्तम पर्याय आहे. मास्टर केल्यानंतर तुम्ही बीएससी सायन्स मध्ये नेट सेट चा अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता त्यानंतर तुम्हाला शिक्षण क्षेत्रात आवश्यक त्या करिअरच्या संधी उपलब्ध हमखास होऊ शकतात.
बीएससी सायन्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा देखील अभ्यास करू शकता अनेक स्पर्धा परीक्षा मध्ये बीएससी सायन्स अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात त्याचबरोबर एनडीए सेल्फ डिफेन्स यासारख्या डिफेन्स म्हणजेच सुरक्षा सैनिकी क्षेत्रामध्ये देखील बीएससी सायन्स ला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
अशाप्रकारे बीएससी सायन्स मध्ये तुम्ही शिक्षण घेऊन पुढील शैक्षणिक व व्यावसायिक प्रवास सुखकर करू शकता अशाच प्रकारच्या विविध माहितीसाठी तुम्ही आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका.
हे पण वाचा: