BCA Course Information in Marathi|बीसीए कोर्से बद्दल संपूर्ण माहिती

BCA Course Information in Marathi

BCA Course Information in Marathi: बारावीनंतर खऱ्या आयुष्याची सुरुवात होते असे म्हटले जाते. आणि म्हणूनच पदवी शिक्षण पूर्ण करण्याकरिता प्रत्येक विद्यार्थी बारावीनंतर आपल्या स्वप्नांना बळ देण्याकरिता वेगवेगळ्या अभ्यास क्रमांक मध्ये प्रवेश घेण्याकरिता प्रयत्न करत असतो. आपल्या आजूबाजूला अनेक असे विद्यार्थी असतात की, ज्यांना माहिती तंत्रज्ञान कॉम्प्युटर एप्लीकेशन यासारख्या क्षेत्रांमध्ये करिअर बनवायचे असते परंतु योग्य माहिती नसल्यामुळे अनेकांना आवडता क्षेत्रात करिअर बनवता येत नाही. जर तुम्हाला देखील संगणक, सॉफ्टवेअर, एप्लीकेशन प्रोग्रामिंग लँग्वेज यासारख्या गोष्टींमध्ये आवड असेल तर आजची माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. बारावी नंतर तीन वर्षाचा एक कोर्स आहे जो कोर्स विद्यार्थ्यांना व्यवसायिक दृष्ट सक्षम बनवण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्या अभ्यासक्रमाचे नाव आहे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन म्हणजेच बीसीए.

तुम्हा सर्वांना माहितीच आहे की, सध्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. कॉम्प्युटर मोबाईल ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग या सर्वांचा अक्षरशः बाजार झालेला आहे. लहान मुलांना देखील पालक या नवीन डिप्लोमा कोर्सेस मध्ये ऍडमिशन देतात आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी कॉम्प्युटर एप्लीकेशन हे क्षेत्र अत्यंत उपयुक्त ठरत आहे. तुम्हाला देखील भविष्यात या अभ्यासाकरला यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला बीसीए बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत.

बीसीए म्हणजे काय:

बीसीए चा अर्थ म्हणजे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन. हा तीन वर्षाचा कोर्स आहे. या कोर्समध्ये प्रवेश घेण्याकरिता उमेदवाराला बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान, सूचना, नेटवर्किंग प्रोग्रामिंग, कॉम्प्युटर इंजीनियरिंग यासारख्या क्षेत्रांमध्ये स्वतःला सिद्ध करायचे आहे अशा व्यक्तींनी बीसीए करणे गरजेचे आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सॉफ्टवेअर सुरक्षा, सॉफ्टवेअर डिझाईनिंग, सॉफ्टवेअर विश्लेषण यासारख्या महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित केले जाते. एखादे सॉफ्टवेअर एप्लीकेशन कसे तयार करायचे ? त्यामागील बारकावे कसे असले पाहिजे? ग्राहकांच्या गरजेनुसार एखाद्या एप्लीकेशन व सॉफ्टवेअर कसे तयार करायचे हे देखील या अभ्यासात क्रमामध्ये शिकविले जाते. हा अभ्यासक्रम कॉम्प्युटर प्रोग्रामिंग संदर्भात जरी असल्या तरी डेटाबेस कसा तयार करायचा, डेटाबेस मधील त्रुटी, त्याची सुरक्षा त्याचे विश्लेषण प्रोजेक्ट मॅनेजमेंट यासारख्या महत्त्वाच्या बाबींवर देखील लक्ष केंद्रित केले जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विष्यात खूप सार्‍या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्याच्या काळात माहिती तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने अनेक कंपनी देखील उदयाला येत आहेत. या कंपनीमध्ये तुम्ही जर बीसीए पूर्ण केलेले असेल तर तुम्हाला लवकरच चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळू शकते.

बीसीए अभ्यासक्रमाचा उद्देश :

अनेक विद्यापीठाद्वारे हा अभ्यासक्रम शिकविला जातो. हा अभ्यासक्रम मुलत : काही तत्वांवर तसेच विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक दृष्ट्या प्रगतीसाठी व कल्याणासाठी व्हावा याकरिता तयार करण्यात आलेला आहे तसेच या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कॉम्प्युटर प्रोग्रामिंग लैंग्वेज चा विकास प्रचार आणि प्रसार व्हावा या अनुषंगाने हा अभ्यासक्रम विद्यापीठाद्वारे बनविण्यात आलेला आहे.

बीसीए डिग्री च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअरची माहिती मिळावी.सॉफ्टवेअर बद्दल उत्सुकता निर्माण होऊन व्यावसायिक करिअर बनवण्यासाठी मदत करणे.

तार्किक प्रोग्रामिंग भाषा संगणकीय क्षमता यांचा विकास करून उच्च गुणवत्ता पूर्ण शिक्षण प्रणाली यामुळे कॉम्प्युटर शिक्षणाचा दर्जा वाढविणे.

कॉम्प्युटर क्षेत्रातील नवनवीन संधी आणि संशोधन

सध्याच्या जीवनात निर्माण होणाऱ्या समस्या व त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील व उत्तम व्यावसायिक निर्माण करण्याच्या अनुषंगाने बीसीए या अभ्यासक्रमाचे निर्मिती करण्यात आली आहे.

पात्रता:

बीसीए या अभ्यासाक्रमामध्ये विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा असेल तर सर्वप्रथम त्याला बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

बारावी सायन्स मध्ये फिजिक्स, मॅथ्स आणि केमिस्ट्री विषय जर निवडले असतील तर उत्तम.

हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम आहे.

या तीन वर्षात सहा सेमिस्टर चा अभ्यास केला जातो.

या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना डेटाबेस स्ट्रक्चर प्रोग्रामिंग कोडिंग नेटवर्किंग यासारखे महत्त्वपूर्ण विशेष शिकविले जातात.

या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी काही महाविद्यालयात प्रवेश परीक्षा नियोजित केली जाते तर काही महाविद्यालयांमध्ये थेट प्रवेश देखील मिळवला जातो.

हा अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर बारावीला कमीत कमी 45 ते 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांचे वय कमीत कमी सतरा वर्ष असणे गरजेचे आहे.

बीसीए कोर्सची फी :

कॉम्प्युटर एप्लीकेशन या अभ्यासक्रमाची फी ही प्रत्येक महाविद्यालय व विद्यापीठ द्वारे वेगवेगळी घेतली जाते त्याचबरोबर महाविद्यालय व विद्यापीठ विद्यार्थ्यांना नेमक्या कोणकोणत्या सुविधा पुरवितात त्या सुविधांच्या आधारावर या अभ्यासक्रमाची फी ठरलेली असते परंतु सर्वसाधारणपणे कमीत कमी 17000 पासून ते 1 लाख पर्यंत या अभ्यासक्रमाची फी असते.

बीसीए अभ्यासक्रमात शिकविले जाणारे विषय :

Sem I

Hardware Lab
Foundational Mathematics
Digital Computer Fundamentals
Statistics I
Creative English
Introductory Algebra
Introduction To Programming Using C
PC Software Lab –
C Programming Lab –

SEM II
Communicative English
Basic Discrete Mathematics
Visual Programming Lab
Data Structures
Case Tools Lab
Data Structures Lab
Operating Systems

SEM III

Object-Oriented Programming Using C++
Software Engineering
Interpersonal Communication
Financial Accounting
Introductory Algebra
C++ Lab
Database Management Systems
Oracle Lab –
Domain Lab

SEM IV
Programming In Java
Financial Management
Computer Networks
Java Programming Lab
DBMS Project Lab
Language Lab
Web Technology Lab

SEM V

Graphics And Animation

OOAD Using UML

Python Programming Design And
User Interface

Python Programming Lab Introduction To Soft Computing

Business Intelligence Multimedia Applications

Graphics And Animation Lab
Unix Lab
Web Designing Project –
Business Intelligence Lab –
Unix Programming

SEM VI

Advanced Database Management System

Client-Server Computing
Design Analysis of Algorithms
Cloud Computing
Introduction To Soft Computing
Business Intelligence Multimedia Applications

बीसीए कोर्स शिकविले जाणारे महाविद्यालय आणि विद्यापीठे :

मुंबई युनिव्हर्सिटी
सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी
अमिटी युनिव्हर्सिटी नॉयडा
सेंट झेवियर कॉलेज
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी
यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटी
छत्रपती शाहूजी महाराज युनिव्हर्सिटी
गुजरात युनिव्हर्सिटी
गुरुनानक युनिव्हर्सिटी
आयआयटी मद्रास
आयआयटी कानपूर
सोफिया कॉलेज

बीसीए पूर्ण केल्यानंतर उपलब्ध असणारे जॉब प्रोफाइल :

  • सिस्टम इंजिनियर : सिस्टम इंजीनियर या पदावर कार्य करणाऱ्या व्यक्तीला सिस्टम मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट, कंपोनेंट रिक्वायरमेंट यांच्यावर नियंत्रण ठेवायचे असते त्याचबरोबर कंपनीमध्ये लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी गरजा त्रुटी यावर देखील लक्ष ठेवायचे असते. सॉफ्टवेअर हार्डवेअर यामधील त्रुटी व अपडेट करण्याचे कार्य देखील सिस्टम इंजिनियर ला करावे लागते.
  • कॉम्प्युटर प्रोग्रामर : या पदावर कार्य करणाऱ्या अधिकाऱ्याला कॉम्प्युटर संदर्भातील जे प्रोग्राम्स असतात त्याची निर्मिती आणि इव्होल्युशन करण्याचे कार्य करावे लागते. वेगवेगळे हार्डवेअर सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग लँग्वेज यांच्यावर कमांड ठेवण्याचे कार्य कॉम्प्युटर प्रोग्रामर करत असतो.
  • नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेशन : कॉम्प्युटर मधील सॉफ्टवेअर हार्डवेअर आणि नेटवर्क यांच्यावर लक्ष ठेवण्याचे कार्य नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेशन करत असते. नेटवर्क ग्रेट करणे नेटवर्कमधील त्रुटी शोधण्याचे कार्य या पदावर काम करणारे अधिकारी करत असतात.
  • वेब डेव्हलपर : वेब डेव्हलपर प्रामुख्याने वेबसाईट संदर्भातील सर्व माहिती वर लक्ष ठेवत असतात तसेच वेबसाईट साठी आवश्यक असणारे वेगवेगळे पेज एचटीएमएल, जावा यांच्यावर लक्ष ठेवण्याचे कार्य वेब डेवलपर करत असतात. पेज डेव्हलपिंग करून वेबसाईट कशाप्रकारे सुरळीत चालेल यावर देखील लक्ष ठेवतात.
  • वेब डिझायनर : एखाद्या संस्थेचा आरसा हा तिची वेबसाईट असते. वेबसाईटच्या माध्यमातूनच क्लाइंट वेबसाईटवर किती वेळ राहायचे की नाही हे ठरवत असतो म्हणूनच वेब डिझायनर वेबसाईट बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. वेबसाईट डिझाईन करत असताना त्याची आउटर लेय र कंपनीच्या स्ट्रक्चर बाबी, मल्टीमीडिया या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य वेब डिझायनर करतो.

पगार :

तीन वर्षाचा बीसीए कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्यू द्वारे देखील सिलेक्ट केले जाते म्हणजेच काही महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये कॅम्पस मुलाखती घेतल्या जातात. या मुलाखतीच्या माध्यमातून नामांकित कंपनी उमेदवारांची निवड करतात निवड झालेल्या उमेदवारांना योग्य ती ट्रेनिंग देऊन त्यांना पगार देखील चांगला दिला जातो. बीसीए कोर्स पूर्ण केल्यानंतर साधारणतः 4 लाख ते 50 लाख पॅकेज मिळतो.

BCA ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुढील कंपनीमध्ये जॉब सहज मिळू शकतो

Accenture
Wipro
HCL
Dell
Cognizant
TCS
Syntel
Tech Mahindra, etc

बीसीए कोर्सचे फायदे


तीन वर्षाचा बीसीए कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान संगणक क्षेत्रातील विविध संधी यांचे द्वार खुले होते. तुमच्या अंगी जर सर्जनशीलता असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये स्वतःचे वेगळे स्थान देखील निर्माण करू शकता. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर एप्लीकेशन कॉम्प्युटर सायन्स यांचे शिक्षण दिले जाते आणि हे शिक्षण सध्याच्या काळात विद्यार्थ्यांना स्वतःचे महत्त्व निर्माण करण्याकरता कारणीभूत ठरत आहे. सध्या दिवसेंदिवस वाटचालयाला इंटरनेटचा प्रचार आणि प्रसार यामुळे विद्यार्थी स्वतःच्या अंगी असणाऱ्या कलागुणांच्या माध्यमातून स्वतःचे करिअर बनवू शकता. या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मल्टी लँग्वेज सी प्लस प्लस, जावा, पायथॉन, कॉम्प्युटर एप्लीकेशन डेव्हलपिंग डेटाबेस, स्टॅटर्जी प्रोजेक्ट मॅनेजमेंट यासारख्या क्षेत्रांमध्ये सुवर्णसंधी निर्माण झाली आहे त्याचबरोबर या सगळ्यांचा हॉस्पिटल रिसर्च शैक्षणिक संस्था यामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग होत असल्याने बीसीए पदवी असणाऱ्या उमेदवारांना सध्या मोठी मागणी आहे.

बीएससी आयटी बद्दल संपूर्ण माहिती: