BSCIT Information in Marathi
आज आपण BSCIT Information in Marathi म्हणजेच बीएससी आयटी माहिती तंत्रज्ञान बद्दल जाणून घेणार आहोत.आपल्या सर्वांना माहिती आहे की, सध्याचे युग हे इंटरनेट व माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. हल्ली लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक प्रत्येक जण प्रत्येक कार्य करण्यासाठी संगणकाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असतो. संगणक जणू काय आपल्या हातातील खेळणेच बनलेले आहे. म्हणूनच जर तुम्हाला देखील इंटरनेट, सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग कोडींग मध्ये भविष्यात करिअर बनवायचे असेल तर तुम्हाला बीएससी आयटी हा कोर्स अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आज आपण बीएससी आयटी म्हणजे नेमके काय असते? हा अभ्यासक्रम केल्यानंतर भविष्यात आपल्याला नेमक्या करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध होतात याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत..
बीएससी आयटी म्हणजे काय ?
बीएससी आयटी म्हणजेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठांमध्ये तीन वर्षासाठी हा अभ्यासक्रम चालविला जातो. या अभ्यासक्रमामध्ये 6 सेमिस्टर असतात. प्रत्येक सेमिस्टर नुसार अभ्यास विषय देखील बदलतात. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलत जाणाऱ्या अनेक गोष्टी बद्दलची माहिती हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना देतो तसेच प्रोग्रामिंग कोडींग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, डेव्हलपमेंट, टेस्टिंग, सॉफ्टवेअर, हार्डवेअर याबद्दलच्या अनेक गोष्टींची माहिती या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना शिकवली जाते.
जर विद्यार्थ्याला बीएससी आयटी म्हणजेच माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला मान्यता प्राप्त बोर्डातून 12 (बारावी) उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याला कमीत कमी 45- 50 % मार्क असणे गरजेचे आहे तरच विद्यार्थ्याला माहिती तंत्रज्ञान या शाखेमध्ये प्रवेश घेता येऊ शकतो.
सध्या या अभ्यासक्रमाला विद्यार्थी वर्गामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याने बहुतेक विद्यापीठ व महाविद्यालय हा अभ्यासक्रम राबवित असतात. भविष्यात सेल्फ प्रोफेशनल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कोर्समुळे विद्यार्थ्यांच्या व्यवसायिक कलागुणांना देखील वाव मिळणार म्हणूनच पारंपारिक अभ्यासक्रम शिकण्याऐवजी विद्यार्थी व पालक वर्ग बीएससी आयटी सारख्या प्रोफेशनल कोर्सला जास्तीत जास्त पसंती देताना दिसून येतात.
हा तीन वर्षीय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अनेक महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये आपल्याला प्लेसमेंट देखील पाहायला मिळते. या प्लेसमेंट मध्ये विप्रो, महिंद्रा, इन्फोसिस यासारख्या नामांकित कंपन्या द्वारे विद्यार्थ्यांची मुलाखती द्वारे निवड केली जाते आणि त्यांना चांगल्या पगाराचे पॅकेज देखील मिळते म्हणूनच भविष्याच्या दृष्टिकोनातून बीएससी आयटी हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतो…
बीएससी आयटी पात्रता :
बीएससी माहिती तंत्रज्ञान या शाखेमध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याकरिता उमेदवाराला बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
बारावीला फिजिक्स (भौतिकशास्त्र) गणित, केमिस्ट्री (रसायनशास्त्र) हे विषय अभ्यासक्रमात असलेले हवेत.
मान्यताप्राप्त मंडळाकडून बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे
बारावीला कमीत कमी 45-50 टक्के मार्क उमेदवाराला असायला पाहिजे.
जर विद्यार्थी वरील पात्रता पूर्ण करत असेल तर विद्यार्थी सहजच बीएससी आयटी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो.
प्रवेश परीक्षा :
जर तुम्हाला सरकारी महाविद्यालयामध्ये बीएससी माहिती तंत्रज्ञान या शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर काही ठिकाणी तुम्हाला प्रवेश परीक्षा देखील द्यावी लागते परंतु महाविद्यालय पातळीवर देखील काहीच ठिकाणी परीक्षा घेतली जाते. अनेक ठिकाणी थेट प्रवेश देखील दिला जातो.
बीएससी आयटी केल्यानंतर भविष्यात उपलब्ध असलेल्या संधी :
बीएससी आयटी म्हणजेच माहिती तंत्रज्ञान या शाखेत प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्याला तीन वर्ष अभ्यास करावा लागतो. हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम सहा सेमिस्टर मध्ये विभागलेला असतो. या सेमिस्टर मध्ये संगणका संबंधित असणारे सर्व विषय विद्यार्थ्यांना शिकविले जातात आणि इंडस्ट्रीची जी मागणी आहे त्या पद्धतीने विद्यार्थ्यांकडून तयारी देखील केली जाते आणि म्हणूनच बीएससी आयटी ची पदवी मिळवल्यानंतर विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक करिअरच्या संधी उपलब्ध होतात.
तीन वर्षाचा पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन साठी देखील प्रवेश घेऊ शकतो.
जर विद्यार्थ्याला शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी करायचे असेल तर बीएससी आयटी क्षेत्रात प्राध्यापक म्हणून देखील स्वतःचे करिअर घडवू शकतो.
इंडस्ट्री मध्ये काम करायचे असेल तर उमेदवाराला अनेक संधी तसेच उत्तम पॅकेज देखील मिळतो..
बीएससी माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, टेस्टर, प्रोग्रामर ,बायोलॉजिकल इंडस्ट्री, टेलीकॉम फार्मा इंडस्ट्री, रिसर्च इंडस्ट्रीज, हॉस्पिटल इत्यादी क्षेत्रांमध्ये सुवर्ण संधी आहे.
बीएससी आयटी पूर्ण केल्यानंतर तुम्ही फ्रीलान्सिंग म्हणून देखील काम करू शकता. अशा वेळी नामांकित वेबसाईट कंपनीसोबत तुम्ही घरबसल्या वेबसाईट डेव्हलपमेंट, प्रोग्राम कोडिंग, नेटवर्किंग वेगवेगळ्या भाषा म्हणजेच सी प्लस प्लस ( C++ ) जावा (JAVA) , एचटीएमएल ( HTML) यासारख्या सांकेतिक भाषेमध्ये स्वतःचे वर्चस्व निर्माण करू शकता.
बीएससी आयटी विद्यार्थी किती पगार कमावतो?
बीएससी माहिती तंत्रज्ञान पदवी मिळवल्यानंतर तुमच्या अंगी असणाऱ्या कलागुणांच्या आधारावर कंपनी तुम्हाला चांगला पगार देखील देते. सर्वसाधारणपणे तीन लाख ते आठ लाख पर्यंतचे वार्षिक पॅकेज उमेदवाराला मिळते.
बीएससी आयटी म्हणजेच बीएससी माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रमात शिकवले जाणारे विषय :
हा तीन वर्षाचा पूर्ण वेळ असणारा अभ्यासक्रम आहे. या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सहा सेमिस्टर चा अभ्यास करावा लागतो. या सेमिस्टर मध्ये एका सेमिस्टर मध्ये सहा विषय असे 36 विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले असतात तसेच शेवटच्या वर्षी विद्यार्थ्यांना प्रकल्प देखील बनवण्यास सांगितले जातात. या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांना कोडींग म्हणजे सांकेतिक भाषेचा वापर करून प्रकल्प तयार करायचा असतो. सॉफ्टवेअर एप्लीकेशन कोडिंग तयार करून सिस्टीम बनवायची असते. सॉफ्टवेअर बनवल्यानंतर विद्यापीठातील तज्ञ मंडळी यांच्या उपस्थित प्रकल्पाचे मानांकन केले जाते आणि विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने मार्क देखील दिले जाते उरलेले जे विषय आहेत त्यांची विद्यापीठाद्वारे लेखी परीक्षा घेतली जाते..
BSC IT विषय
प्रथम वर्ष ( First Year)
- technical communication skills
- problem solving methodologies C++ and object oriented programming
- computer fundamentals and emerging
- Technology networking programming
- Computer Organisation and architecture
- programming in C
- Data Structure using C language
- web programming
- mathematical and statical foundation of computer science
- pratical work
द्वितीय वर्ष ( 2nd year )
- SAD software quality insurance and testing
- C++ and object oriented programming
- programming with Java and C language
- RDBMS using Oracle
- networking technology and administration
- operating system
- practical work
तृतीय वर्ष ( 3rd year)
- Advanced Java Programming
- software testing and project
- management
- network management
- information security
- practical work
बीएससी आयटी पदवी मिळवल्यानंतर तुम्ही इन्फोसिस, टीसीएस, रिलायन्स यासारख्या अग्रगण्य नामांकित कंपनीमध्ये वेगवेगळ्या पदावर काम करू शकता, त्याचबरोबर बीएससी आयटी तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भविष्यात तुम्हाला इंजीनियरिंग करायची असेल तर थेट इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला देखील तुम्हाला प्रवेश मिळू शकतो म्हणूनच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बीएससी आयटी हा अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त ठरतो जर तुम्हाला देखील संगणक तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये भविष्यात काहीतरी करायचे असेल स्वतःचे उज्वल भविष्य घडवायचे असेल तर तुमच्यासाठी हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम नक्कीच उपयुक्त ठरू शकतो.
बी एस सी आय टी कोर्स पूर्ण करण्यासाठी असणारे विद्यापीठे आणि कॉलेज :
- मुंबई युनिव्हर्सिटी
- सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी
- अमिटी युनिव्हर्सिटी नॉयडा
- सेंट झेवियर कॉलेज
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी
- यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटी
- छत्रपती शाहूजी महाराज युनिव्हर्सिटी
- गुजरात युनिव्हर्सिटी
- गुरुनानक युनिव्हर्सिटी
- आयआयटी मद्रास
- आयआयटी कानपूर
- सोफिया कॉलेज
बीएससी आयटी पूर्ण केल्यानंतर उपलब्ध असणारे जॉब प्रोफाइल :
आयटी सपोर्ट ॲनालिसिस : या पदावर कार्य करणाऱ्या व्यक्तीला कंपनीतील आयटी सपोर्ट एनालिसिस म्हटले जाते. ही व्यक्ती कंपनीतील सर्व तांत्रिक बाबी हाताळते तसेच तांत्रिक त्रुटी तांत्रिक समस्या दूर करण्यासाठी फोन, ईमेल यांच्याद्वारे संपर्कात राहते.
नेटवर्क इंजीनियर : या पदावर कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या अंतर्गत नेटवर्क संदर्भातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी हाताळले जातात. जसे की डेटा सेक्युरिटी, डेटा स्टोरेज, डेटा रिकवरी इत्यादी
आयटी कन्सल्टंट : या पदावर कार्य करणाऱ्या व्यक्तींना आयटी कंपनीतील अनेक बाबी हाताळावे लागतात जसे की इंटरनल व एक्स्टर्नल अफेयर्स, कॉम्प्युटर सिग्नल संबंधित त्रुटी तसेच एप्लीकेशन सॉफ्टवेअर कंपनी तसेच क्लाइंट यांना योग्य असणारे सॉफ्टवेअर यांच्या बद्दल माहिती पुरविणे इत्यादी..
वेब डिझायनर : या पदावर कार्य करणाऱ्या व्यक्तींना वेबसाईट संदर्भातील ज्ञान असणे गरजेचे आहे. एखाद्या कंपनीची वेबसाईट तयार करणे त्याचे लेआउट वेबसाईट साठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक गोष्टी हाताळण्याचे कार्य वेब डिझायनर करतात. क्लाइंटच्या गरजेनुसार व त्यांच्या इच्छेनुसार वेबसाईट तयार करण्याचे महत्त्वाचे कार्य वेब डिझायनर करत असतात म्हणूनच कोणत्याही कंपनीच्या यशामध्ये वेबसाईट अत्यंत महत्त्वाची ठरते.
सॉफ्टवेअर डेव्हलपर : सॉफ्टवेअर डेव्हलपर हे प्रामुख्याने कंपनीसाठी सॉफ्टवेअर बनवण्याचे कार्य करतात तसेच वेगवेगळ्या प्रकारचे एप्लीकेशन देखील तयार करत असतात.
कॉलिटी एशुरन्स अनालिटिक : या पदावर कार्य करणाऱ्या व्यक्तींना सॉफ्टवेअर व एप्लीकेशन टेस्टिंग करावी लागते, जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या गुणवत्तेबद्दल तडजड होणार नाही याची काळजी देखील घेत असतात. सॉफ्टवेअर एप्लीकेशन योग्य पद्धतीने रन होण्याकरिता कॉलिटी एशुरन्स एनालिटिक महत्त्वाची भूमिका बजावतात..
सिस्टम ऍनालिसिस : या पदावर कार्य करणाऱ्या व्यक्ती आयटी सिस्टम ची तपासणी करतात. भविष्यात लागणाऱ्या अनेक गोष्टींची तरतूद देखील करत असतात. कंपनीत लागणाऱ्या वेगवेगळ्या सॉफ्टवेअर हार्डवेअर यांच्या संदर्भातील रिक्वायरमेंट देखील सिस्टम एनालिसिस करणारे लोक निर्णय घेतात. त्यानुसारच कंपनीमध्ये वेगवेगळी तरतूद केली जाते.
वरील सर्व पदांवर कार्य करणाऱ्या व्यक्तींना कंपनीद्वारे चांगला पगार देखील दिला जातो हा पगार लाखाच्या घरात असतो म्हणूनच तुम्हाला देखील भविष्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची असेल तर बीएससी आयटी हा पर्याय तुमच्यासाठी अगदीच उत्तम ठरू शकतो.
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला फॉलो कमेंट आणि शेअर करायला विसरू नका..