Police bharti Information in Marathi
नमस्कार मित्रांनो आपण ह्या लेखात Police bharti Information in Marathi मध्ये संपूर्ण माहिती पोलीस भरती बद्दल घेणार आहोत. पोलीस भरती हि भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये होते. तर आपण महाराष्ट्र राज्य मधल्या जिल्यानुसार पोलीस शिपाई भरती ची माहीती घेवुयात.पोलीस भरती मध्ये वेगवेगळी पदे अस्तात. जसे की पोलीस शिपाई,पोलीस शिपाई चालक,सशस्त्र पोलीस शिपाई या तिनी पदासाठी शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा मध्ये मिळालेले एकूण गुणाच्या आधारावर मेरिट लिस्ट तयार करण्यात येते.
आपण आता शारीरिक पात्रता,शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा अभ्यासक्रम बदद्ल माहीती घेवुयात.
पोलीस भरतील भरली जाणारी पदे
पोलीस भरतीत खालील पदे भरण्यात येतात
- पोलीस शिपाई
- पोलीस शिपाई चालक
- सशस्त्र पोलीस शिपाई
पोलीस भरती मधील महत्वाचे टप्पे
- सर्वात पहिला सरकार तर्फे पोलीस भरतीची घोषणा करण्यात येते.
- पोलीस भर्तीची जाहिरात न्युज पेपर मधून प्रकाशित केली जाते.
- आपली पात्रता पाहून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज आणि अर्जाची रक्कम भरावी लागतें.
- पात्र उमेदवारांना ग्राउंड परिक्षेसाठी बोलवण्यात येते.
- जे उमेदवार मैदानी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत त्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाते.
- मैदानी आणि लेखी परीक्षेमध्ये पास झालेल्या उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी केली जाते.
- पात्र उमेदवारांची मेरिट लिस्ट जाहीर केली जाते.
- मेरिट लिस्ट मध्ये असलेले उमेदवारांना पोलीस मुख्यालयात दोन-तीन महिने ट्रेनिंग दिले जाते.
- पोलीस मुख्यालयातील प्रशिक्षण झाल्यानंतर महाराष्ट्रातील पोलीस प्रशिक्षण केंद्रावर नऊ महिने प्रशिक्षण दिले जाते.
- ट्रेनिंग पूर्ण झाल्या नंतर त्यांना पुन्हा पोलीस मुख्यालयामध्ये विविध विभागांमध्ये रुजू करून घेतले जाते.
- सुरक्षा देणे, विविध कार्यालयाची सुरक्षा करणे, आरोपींना कोर्टात नेणे, आरोपींना आरोग्य चाचणीसाठी नेणे, शस्त्रकाराची सुरक्षा यासाठी कामे असतात.
- उमेदवारांच्या ज्ञानानुसार किंवा मधल्या काळात वशिष्ठ परीक्षा पास झाल्यास मुख्यालयातून त्यांची बदली फोर्स वन, जलद प्रतिसाद पथक, लोकल क्राईम ब्रांच पासपोर्ट डिव्हिजन, ऑक्सफर्ड या पथकामध्ये केली जाते.
अर्ज कसा भरायचा?
२०१९ पर्यन्त भरतीचा क्रम पुढीलप्रमाणे असा होता- अर्ज भरणे,मैदानी चाचणी,आणि लेखी चाचणी. २०१९ मध्ये पहिल्यांदा लेखी परीक्षा आधी आणि नंतर ग्राउंड घेण्यात आले होते.
२०१९ मध्ये एका उमेदवाराला पात्रतेनुसार एकपेक्षा अधिक फॉर्म भरता आले. पात्र उमेदवार एकाच वेळी चालक आणि बँडमन पदासाठी अर्ज करू शकत होता.आता २०१९ मधील भरती मध्ये एका उमेदवाराला फक्त एकच अर्ज भरता आला. उमेदवारांच्या विरोधानंतर हि अट कमी करण्यात आली होती.
पोलीस भरतीच्या प्राथमिक अर्जाची जबाबदारी प्रायव्हेट कंपनीला देण्यात आली आहे. यापूर्वी आणि आयबीपीएस या कंपन्यांवर पोलीस भरतीच्या प्राथमिक अभ्यास जबाबदारी सोपवण्यात आली आता जाहीर झालेल्या भरतीसाठी कोणते कंपनी आहे कंत्राट मिळणार आहे हे अद्यापही निश्चित झालेल्या नाही. पोलीस भरतीमध्ये रिकाम्या जागांची संख्या हजारांमध्ये असते. तर अर्जांची संख्या ही लाखांमध्ये असते एक उमेदवार फक्त एकच अर्ज करू शकतो. अर्ज भरताना खालील गोष्टी लक्षात घ्यावे लागतात;
वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर नमूद केलेल्या वेळेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे आवश्यक आहे.
अर्जासोबत रक्कम भरणे ही गरजेच आहे.
- कोणत्या जागेसाठी अर्ज भरला जातोय, ते योग्य रीतीने निवडावे.
- आपण ज्या कोणत्या सामाजिक गटात मोडतोय त्या गटाच्या पदाची निवड करावी. उदाहरणार्थ खुल्ला गट, राखीव गट भूकंपग्रस्त इत्यादी.
अर्ज सोबत उमेदवारांना तीन कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- शैक्षणिक पात्रता गुणपत्रिका
- रहिवासी दाखला
- आणि राखीव गटात मोडत असल्यास त्याचे जात प्रमाणपत्र.
जर आपण विशिष्ट पदांसाठी अर्ज भरत असाल तर त्या संबंधित कौशल्य प्रमाणपत्र देखील जोडावे लागते. उदाहरणार्थ चालक पदासाठी अर्ज करताना आपल्याला वाहन चालक परवाना जोडणे आवश्यक आहे.
- मुलींचे लग्न झालेले असल्यास तर त्या मुली च्या लग्नानंतर नाव बदललेले असल्यास त्याचा दाखला जोडावा लागतो.
- जर उमेदवार प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असल्यास सरकारी अधिकृत दाखला जोडणे आवश्यक आहे.
उमेदवारांना जिल्हा न्याह अर्ज भरणे गरजेचे आहे महाराष्ट्रातील अनेक उमेदवार स्वतःच्या जिल्ह्यात सोबतच मुंबई जिल्ह्याचा देखील अर्ज भरत असतात, कारण मुंबईमध्ये पदांसाठी रिक्त जागेची संख्या जास्त असते.
पात्रता
- मुले आणि मुली अशा दोघांनाही रिक्त पदासाठी अर्ज करता येतो.
- मुलींसाठी स्वतंत्र जगाची तरतूद केली आहे आणि त्याचा जाहिरातीमध्ये उल्लेख केलेला असतो.
वय
- उमेदवारांचे वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असावे.
- खुल्या वर्गासाठी वय 28 वर्षापेक्षा जास्त असू नये. एससी एसटी आणि ओबीसी इत्यादी राखीव प्रवर्गातील उमेदवार 33 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात.
उंची
- मुलांची उंची ही 165 सेंटीमीटर पर्यंत असणे आवश्यक आहे.
- सशस्त्र पोलीस दलासाठी मुलांची उंची १६७ सेंटीमीटर पर्यंत असते आवश्यक आहे.
- आणि मुलींची आहे उंची ही 150 cm पर्यंत असणे आवश्यक.
वजन
- मुलांचे वजन कमीत कमी 50 किलोग्राम तरी असावे.
- मुलींचे वजन कमीत कमी 45 किलो ग्राम असावे.
शिक्षण
बारावीची परीक्षा पास असणे गरजेचे आहे.
ड्रायव्हर आणि बँडसमन पदासाठी उमेदवाराने दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेले असावे.
कौशल्य
उमेदवार जर ड्रायव्हर पदासाठी अर्ज करत असेल तर त्या उमेदवाराकडे वाहन चालक परवाना असायला हवा.
बँडसमन या पदासाठी अर्ज करताना उमेदवाराला यादीत नमूद केलेल्या वाद्यांपैकी एखादं वाद्य वाजवण्याची कला असणे आवश्यक आहे. वाद्या प्रशिक्षण देणाऱ्या नोंदणीकृत संस्थेचे प्रमाणपत्र सुद्धा असणे आवश्यक आहे.
कोण्त्याही पध्दतीने दिव्यंग आणि अपंग व्यक्तीला शिपाई पदासाठी अर्ज करता येणार नाही.
पोलीस भरतीसाठी तयारी कशी करायची?
पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी असते. लेखी परीक्षा असते. त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे आणि लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी ची तयारी करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी सुद्धा भरपूर असतो.
शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा दीडशे मार्कांची असते. शारीरिक चाचणीला पन्नास गुण असतात तर लेखी परीक्षेला 100 गुण असतात.
मुलांसाठी
- गोळा फेक 15 गुण गोळ्याचे वजन सात किलो 50 ग्रॅम असते. साडेआठ मीटर अंतरा पुढे गोळा फेकायचा असतो.
- 100 मीटर धावणे पंधरा गुण कट ऑफ वेळ 11:50 सेकंद
- सोळाशे मीटर धावणे २० गुण कट ऑफ वेळ पाच मिनिटे दहा सेकंद.
मुलींसाठी
- गोळा फेक 15 गुण असतात. आणि गोळ्याचे वजन चार किलो इतके असते सहा मीटर अंतराच्या पुढे गोळा फेकायचा असतो.
- 100 मीटर धावणे पंधरा गुण आणि वेळ कट ऑफ वेळ चौदा सेकंद.
- 800 मीटर धावणे वीस गुण कट ऑफ वेळ दोन मिनिटे 50 सेकंद
सराव कसा करावा
- पोलीस भरतीसाठी जी मैदानी चाचणी असते त्यासाठी दररोज धावण्याचा सराव करणे गरजेचे आहे त्यातून स्टॅमिना वाढू शकतो.किमान सहा महिने कधीही सराव केला पाहिजे.
- धावण्याच्या सराव करण्यासोबत शारीरिक कसरत आणि वजन उचलण्याचा सराव सुद्धा करायला पाहिजे.
- रात्री किमान सात तास झोप घ्यावी, कारण पूर्ण झोप घेणे आवश्यक आहे शरीरासाठी लवकर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावावी.
- चांगला आणि उत्तम आहार घ्यावा आहारात हरभरा, चना, हरभरा, डाळी, अंडी यांचा समावेश केला तर उत्तम.
लेखी परीक्षेचे स्वरूप
पोलीस भरती मध्ये लेखी परीक्षा ही शंभर मार्कांची असते. परीक्षेसाठी अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, आणि सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, अभ्यासक्रमामध्ये या विषयांचा समावेश असतो. प्रत्येक विषयाला 25 गुण असतात. परीक्षा ही दीड तासाची असते.
प्रत्येक विषयामध्ये कोणत्या गोष्टीची तयारी करणे गरजेचे आहे
अंकगणित
संख्या प्रकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी, सरळव्याज, सरासरी, लसावी मसावी, गुणोत्तर प्रमाण, अपूर्णांक, काळ काम वेग, नफा तोटा, वर्गमूळ, कोण क्षेत्रफळावरून प्रश्न, इत्यादी वरती प्रश्न विचारले जातात.
बुद्धिमत्ता चाचणी
अक्षरमाला, सांकेतिक लिपी, अंकमालिका, दिनदर्शिका, आकृती, नातेसंबंध, दिशा, फूटप्रश्न व इतर घटक असतात.
मराठी व्याकरण:
मराठी भाषा, उगम शब्दांच्या जाती, वर्णमाला, समास, संधी विभक्ती, अलंकार, वाक्प्रचार, शुद्धलेखन, समानार्थी विरुद्धार्थी शब्द इत्यादी.
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी:
महाराष्ट्र, भारतातील ठिकाण, नद्या, पर्वतरांगा, राजधान्या, जगाचा भूगोल, चालू घडामोडी, राज्यघटना, ऐतिहासिक घटना इत्यादी गोष्टीवर सामान्य ज्ञान व चालू घडामोडी प्रश्न विचारले जातात.
तयारी कशी करावी
पोलीस भरतीमध्ये शारीरिक चाचणी आणि मानसिक तयारी हे दोन्ही देखील फार महत्त्वाची गोष्ट आहे. व्यायाम आणि अभ्यासाबरोबर मन शांत ठेवणे हे अत्यंत गरजेचं आहे व जर तुमची शारीरिक तयारी असेल आणि मानसिक तयारी नसेल तर तुम्हाला फार कठीण पडेल. मी स्वतः पोलीस भरती पाच वेळा दिली आहे माझा अनुभव या लेखात सांगत आहे. रोज अभ्यास करणे सुद्धा फार आवश्यक आहे. आज अभ्यास केला उद्या करणार नाही सोमवारपासून अभ्यास करणार एक तारखेपासून अभ्यास करणार असे करू नका.
- दररोज वर्तमानपत्रे वाचली पाहिजे
- मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका असतील तर ते सोडवावे.
- अभ्यास करताना महत्वाच्या नोंदी वहीमध्ये लिहून ठेवणे.
- गणित सोडवण्याचा सराव दररोज करावा.
दरवर्षी परीक्षेमध्ये 70 टक्के गोष्टी सारख्याच असतात फक्त प्रश्नाचं स्वरूप बदललेला असतो 30 टक्के प्रश्न नवीन माहितीवर आधारित असतात. जर तुम्ही जास्त सिरीयस असाल पोलीस बनण्यासाठी तर जवळच्या पोलीस प्रशिक्षण अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊ शकता जेणेकरून नेमका अभ्यास क्रम काय आहे ते तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला मिळेल.
पोलीस भरतीसाठी तयारी करणे अर्ज भरणे मैदानी चाचणी लेखी परीक्षा अंतिम यादी लागणे. प्रशिक्षण असं पूर्ण कालावधी लक्षात घेतल्या नंतर पोलीस शिपाई म्हणून लागण्यासाठी रुजू होण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी जातो.